संडे स्पेशल (गरमागरम सुप्स)
सूप ही एक अत्यंत पोषक व चवदार डिश आहे. शिवाय करायला अगदी सोपी आणि पचायला हलकी. डाएट फूड म्हणून विषेश लोकप्रिय.
१.गाजर आणि कोथिंबीरीचे सूप
साहित्यः
४ टे.स्पून बटर
३पातीचे कांदे स्लाईस करून
४५० ग्रॅम गाजर
१ टे.स्पून धने पावडर
५ कप पाणी किंवा चिकन स्टॉक
१/२ कप गोड घट्ट दही
चवीनुसार मीठ, मिरपूड
२-३ टे.स्पून सजावटी साठी कोथिंबीर
एका मोठ्या पातेल्यात बटर गरम करा. त्यात पातीचे कांदे,गाजर घालून चांगले परतवा.झाकण ठेऊन १० मि. शिजवा, भाज्या मऊ झाल्या पाहिजेत्.धनेपूड घालून १मि.परतवा. स्टॉक घालून मीठ व मिरपूड घाला. उकळी आल्यावर मंद आचेवर२० मि.
मिसळपाव