Skip to main content

आरक्षण!

लेखक अजिंक्य यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
आरक्षण! अतिशय ज्वलंत विषय!! तसं आरक्षण सर्वच ठिकाणी पाहावयास मिळतं. पण माझा रोख(?) आहे, तो शैक्षणिक आरक्षणावर..... माझा स्वतःचा अनुभव सांगतो : माझी ऍडमिशन झाली तेव्हा, माझा मित्र (जो ओबीसी आहे) त्याचीही ऍडमिशन झाली. त्याला माझ्यापेक्षा कमी गुण असूनही, त्याला युनिव्हर्सिटी मध्ये जागा मिळाली, पण मला मिळू शकली नाही. माझा मित्रावर राग अजिबात नाही. अजूनही आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. पण, हे कितपत योग्य आहे? शैक्षणिक बाबतीत, प्रवेशाच्या वेळी, गुण हाच निकष मानला जावा असं मला वाटतं. आरक्षण असायला काहीच हरकत नाही.

समर्पण..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 02/05/2008 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिया तुझ्या प्रितीमध्ये हृदय माझे गुंफले, रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... हिरवाईचा पल्लव, पसरून काठावरी मोहक कटी मिरवी, ती सरीता तटावरी आज तिचे देहभान, सागरातच गुंतले.. रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... चंद्र लाघव पाहूनी, मौज कोण वेडावली घेण्या कवेत बिंबाला, नभाकडे झेपावली, त्या प्रितीच्या खेळामध्ये, अस्तित्व तिचे संपले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... स्पर्श तुझा निशिगंधी, श्वास माझा थांबला तनू वेडी बावरली, शब्दही ओठी थांबला मिठीत घेत मजला, अधर माझे चुंबिले रोमरोमी माझ्या सख्या चांदणे बघ शिंपले... - प्राजु

मराठी अभ्यास परिषद संकेतस्थळ

लेखक आजानुकर्ण यांनी शुक्रवार, 02/05/2008 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
  • मराठीचा सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रयत्न करणे.
  • लोकव्यवहारात मराठीचा वापर होण्यासाठी प्रचार करणे.
  • ज्ञानव्यवहारात मराठीला प्रतिष्ठा प्राप्त करून देणे.
  • मराठी भाषकांच्या भाषिक गरजा पूर्ण करणे
या उद्दिष्टांसाठी काम करीत असलेल्या 'मराठी अभ्यास परिषदेच्या' संकेतस्थळाचे काल मंगल महाराष्ट्रदिनी उद्घाटन झाले. सन्माननीय मिसळपाव सदस्य श्री.

"महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने...."

लेखक वाचक यांनी शुक्रवार, 02/05/2008 06:37 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सर्वात प्रथम सर्वांना "महाराष्ट्र् दिनाच्या' शुभेच्छा ! चर्चेस कारण असे की 'लोकप्रभा' मधला हा लेख --- "महाराष्ट्र धर्म" अतिशय संतुलित लेख वाटला. वास्तविक श्री. राजू परुळेकर हे तसे पाहीले तर 'सेना' गटातले पण तरी सुद्धा त्यानी 'शिवसेनेच्या' पदरात तिच्या चुकांचे माप घातले आहे. सध्याच्या 'राज ठाकरे' कृत आंदोलानामुळे सर्व सामान्यांना नक्की कुठली बाजू घ्यावी हे कळेनासे झाले आहे. एकीकडे 'उत्तर भारतीय दादागिरी हटवा' हे पटते पण त्याच बरोबर 'ती हटवण्याचा' मार्ग तितकासा पटत नाही.

प्राजूचा धिक्कार असो...:)

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 02/05/2008 01:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाची एक सन्माननीय सदस्या प्राजू, हिचा आम्ही धिक्कार करत आहोत...! आज कोल्हापुरात प्राजूच्या घरी 'कोल्हापुरी तांबडा रस्सा-पांढरा रस्सा आणि चवदार कोंबडी' असा मोठा न्यारा बेत होता. प्राजूने समस्त नॉनव्हेजखाऊ मिपाकरांना ही मेजवानी झोडण्याकरता स्वत:च्या घरी प्रेमाने, आग्रहाने बोलवणं तर सोडाच, परंतु सदर पाकृचा तेवढा फक्त फोटूच मिपाच्या मुखपृष्ठाकरता पाठवून मिपाकरांची रीतसर आणि कोल्डब्लडेडली बोळवण केली आहे! :) एवढंच नव्हे, तर आज या संदर्भात तिच्याशी फोनवर माझं प्रत्यक्ष बोलणंही झालं तेव्हादेखील तिने केवळ 'मुखपृष्ठाकरता फोटू पाठवत आहे' एवढंच सांगितलं!

पूर्ण कविता हवी आहे...

लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 01/05/2008 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
"कुटुंबवत्सल इथे फणस हा कटिखांद्यावर घेऊन बाळे पुसिते त्याला कुशल मुलांचे गंगाजळिचे बेत आगळे " हे कडवे असलेली इंदिरा संत यांची एक कविता आहे,कुणाला आटवतेय का ?असल्यास द्यावी.
Taxonomy upgrade extras

बहु असोत सुंदर संपन्न की महा....

लेखक उदय ४२ यांनी गुरुवार, 01/05/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,आज महाराष्टर् दिन्...आपण सर्व मराटी जन या राज्याला ,आपल्या भाषेला प्रणाम करुया.तुम्हा सर्वांना शुभेच्छा!

लुब्रा स्वभाव

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 01/05/2008 12:16 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा महेश यांची संदर प्रायोगिक कविता/गझल लुब्रे पडाव

भरला बघून पेला मी हंगरून गेलो
गोडीत पेग उष्टा मी लंगरून गेलो

शंका कुणा न आली की आत काय आहे
ग्लासास स्टिलच्या  या मी ड्रिंकरून गेलो!

काठीजरी करी या बघण्यात मग्न पोरी
लुब्रा स्वभाव माझा, मी यंगरून गेलो

मज लागले कळाया सारे तिचे इशारे
भलताच अर्थ कळता मी गांगरून गेलो

आनंदयात्रिकाला सलाम आणि प्रबोधनकर्त्याला दंडवत

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 01/05/2008 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्रदिनाच्या मुहूर्तावर महाराष्ट्रातल्या दोन महापुरुषांचा 'महाराष्ट्रभूषण' हा खिताब देऊन सन्मान करण्यात येणार असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. या दोन्ही व्यक्ती महाराष्ट्राला भूषणभूत आहेत हे सर्वांना माहीतच आहे. कविवर्य मंगेश पाडगांवकर नेहमी प्रसिध्दीच्या झोतात असल्यामुळे त्यांचे नांव सर्व मराठीभाषिकाच्या चांगल्या परिचयाचे आहे, तर डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांनी प्रसिध्दीपासून दूर राहून समाजाचे प्रबोधन करण्याचे सेवाव्रत गेली चौसष्ठ वर्षे अव्याहतपणे चालवले आहे.