Skip to main content

शाकाहार :- काही नवीन पैलु

लेखक मन यांनी शनिवार, 10/05/2008 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला. ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही. मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय. मुळात, बहुतांश सर्व सस्तन प्राणी आणी पक्षी ह्यांचे प्रामुख्याने शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्गीकरण करता येते. जे प्रामुख्याने वनस्पती खातात, ते शाकाहारी. जे प्रामुख्याने इतर वनस्पतींशिवाय इतर सजीव(प्राणी,पक्षी )भक्ष्य म्हणुन खातात(स्वजातीतील् सुद्धा) ते मांसाहारी. माझे काही तर्क, निरिक्षण आणि वाचनातील् काही भागानुसार मानवी शरीरा बद्दल हे विचारः- १.एकाच प्रवर्गातील किंवा परीवारातील(स्पेसीज् किंव

रंगीत मिरच्या - रेसिपी सुचवाल ?

लेखक ईश्वरी यांनी शनिवार, 10/05/2008 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच एका परिचितांनी एक रन्गीत पाकीट दिले...भेट म्हणून. Mixed hot chilli peppers असे त्यावर लिहीले होते. ह्य पाकीटामधे रंगीबेरंगी , जरा जाडसर आणि लांबट आकाराच्या ३५-४० मिरच्या होत्या.

दुसरी संधी

लेखक मुक्तसुनीत यांनी शनिवार, 10/05/2008 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रात्री पडल्यापडल्या झोपायच्या काही क्षण आधी सरलेल्या वर्षांचा आढावा मनात नकळत घेतला जात होता. सतत बदलत असणार्‍या आपल्या आयुष्यातल्या चढउताराकडे पाहताना प्रश्न पडत होता : बापरे , तोच का मी हा ? हेही झाले आपल्याबाबतीत , नाही का ? "कहां कहां से गुजर गये" या सारखे विचार येत होते. सर्वच गोष्टी काही काळवंडून टाकणार्‍या नव्हत्या. काही आनंदाचे क्षण होते , काही चिमूटभर यशाचे , काही रोमांचक प्रसंगही. झोप लागता लागता एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवली : "लाईफ इज ऑल अबाऊट सेकंड चान्सेस" - अर्थात "दुसर्‍यांदा मिळणारी संधी हाच तुमच्या आमच्या आयुष्याचा स्थायिभाव आहे".

विडंबन

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 10/05/2008 00:03 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम गझल

फक्त मी नावास कर्ता शेष आता
बायको ही लांडगा मी मेष आता

केस पिकले, दात पडले, भिंग सजले
केव्हढा बदलून गेला वेष आता

म्हैस ही बसते, पुन्हा उठतेच कोठे!!
आणि लाजेचा न उरला लेश आता

नाते ना 'ते' राहीले

लेखक भ्रमर यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझी ही कविता जवळपास एक वर्षापूर्वी लिहीली होती. कवितेचा वरील विषय लोकसत्ताच्या 'चतुरा' या मासिकाने दिला होता व त्यावरुन मला ही कविता सुचली होती. परंतू दिरंगाई केल्याने कविता पाठविली नाही. बिचारी माझ्या वहीत अशीच पडुन होती. मिसळपावमुळे तिला प्रकाशात येता आले. कविता लिहिण्याआधी तिची थोडी पार्श्वभूमी सांगणे आवश्यक वाटते.
Taxonomy upgrade extras

मी गेल्यावर

लेखक पुष्कराज यांनी शुक्रवार, 09/05/2008 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
मी गेल्यावर वि़झुनी जातील रत्नदीप आकाशी मी गेल्यावर थांबून राहील वीज तशी मेघाशी मी गेल्यावर पोर्णिमेसही चंद्र यायचा नाही मी गेल्यावर रवी तळपूनी तेज द्यायचा नाही मी मी माझे किती कल्पना किती मानसी वेड गेल्यानंतर सरणावरती दोन क्षणांचा खेळ शूरवीर बलशाली राजे किती जाहले येथे स्मरण तयांचे या जगताला कुठे आज रे होते नररत्नांची ही पहा अवस्था काय आपुले आहे आपुल्यानंतर कशास वेड्या नाव आपुले राहे चैनीमध्ये दिवस संपला धुंदीमध्ये राती भोगून भोगून क्षीण जाहली आयुष्याची ज्योती तरीही वाटे मनास माझ्

लग्न लवकर जमण्यासाठी थोडे इंग्रजी आलेच पाहिजे....

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 09/05/2008 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
(प्रस्तावना : लग्न ही एखाद्या व्यक्तीच्या, कुटुंबाच्या आणि समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते. त्यात कळत नकळतच काही आशय निर्माण होत जातात. या सामाजिक अभिसरण प्रक्रियेत भाषा हा कसा प्रभावशाली भाग बनत आहे यासाठी अनुभवजन्य प्रसंगातून घेतलेला हा मागोवा.) ही गोष्ट अंदाजे २५/३० वर्षांपूर्वीची घडलेली आहे. आमच्या मामा आणि मावश्यांचे एक बरे मोठे असे कुटुंब होते. ( त्यातले बरेचसे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत. ) तर अश्याच एका सुट्टीमध्ये माझी सर्व भावंडे, मी आणि माझी आई माझ्या मामाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मामाकडे गेलो होतो. मामा आणि माझ्या ५ मावश्या अश्याच गप्पागोष्टी करत होते.

तुझ्यावीना मी कसा जगलो (भाग - १)

लेखक नि३ यांनी शुक्रवार, 09/05/2008 19:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज समीरचे कामात लक्षच लागत नव्ह्ते आज ऑफीसमधे पुन्हा त्याला so called analysis of code चे काम मिळाले होते.जेव्हा तो कंपनी मधे कामावर रुजु झाला होता तेव्हा तो खुप उत्सुक होता काही चांगले काम करण्याकरीता पण खुपलवकरच त्याला वास्तवाची जाण आली. सॉफ्टवेअर कंपनी म्हणजे एक मॄगजळ आहे जे दुरुणच चांगले वाटते हे तो लवकरच जाणुन चुकला. तर तो पुन्हा तेच crap work करत बसला होता.सेकंड शिफ्ट होती (दुपारी २.०० ते १०.३०) ह्या शिफ्ट चा एक फायदा जरुर असतो कि हे PL,ML लोक चांगले आपल्या सोयीनुसार जनरल शिफ्ट मधे येतात(सकाळी ९.०० ते६.००)आणि ६ वाजता निघुन जातात.

एक कोड्न

लेखक मुन्गी यांनी शुक्रवार, 09/05/2008 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
एक लहान मुल्गा आम्बा खाउन कोय रस्त्या वर फेकतो , तोच एक नास्तिक माणुस रस्त्या वरुन चालत येतो , त्या कोई वर सरपट्तो आणि डोके फुटुन मरण पावतो | दुस्र्‍या दिवशी पुन्हा तो मुलगा तसेच कोय रस्त्या वर फेकतो (असतात काही डाम्बिस पोरं, असो ) , मग एक पुजारी तेथून निघतो , तोही रपट्तो आणी डोके आपट्तो , पण त्याला काहीच होत नाही ... का ? - कारण जाको राखे सांईया मार सके ना कोय !
Taxonomy upgrade extras