साडेतीन शहाणे
आपण नेहमी साडेतीन शहाण्यांबद्दल ऐकतो. कोण होते हे साडेतीन शहाणे?
माझ्या कुवतीनुसार याचे उत्तर शोधायचा प्रयत्न केला. हे साडेतीन शहाणे म्हणजे पेशवाईच्या काळातील जिवा, सखा, विठा, नाना.
१. सखा : सखारामबापू बोकील - पेशव्यांचे कारभारी - थोरल्या माधवरावांचे प्रथम कारभारी पण राघोबादादांचे खास
२. जिवा: जिवाजीपंत चोरघडे - नागपूरकर भोसल्यांचे कारभारी
३. विठा: विठ्ठल सुंदर - हैद्राबादच्या निजामाचा वजीर
४. नाना: नाना फडणवीस/फडणीस - पेशव्यांचा कारभारी
यातील नाना फडणवीस प्रकृतीने अगदीच क्षीण असल्याने प्रत्यक्ष युध्दात भाग घेत नसत. त्याने कधीही तलवार गाजवली नाही.
मिसळपाव