अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)
तर मंडळी,
आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! :)
तर ते असो.. !
ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती.
मिसळपाव