मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

धमु चे लग्न..एक शहिद दिवस..

केशवसुमार · · काथ्याकूट
तर मंडळी आज एजून एक योध्दा धारातिर्थी पडला शहिद झाला ( आमच्यात आला) कस काय झाले आपल्या धमुचे लग्न? कोण कोण मिपाकर जमले होते? लग्ना आधीचा मिसळ कट्टा कसा झाला? धमु आणि धमी ने कुठले उखाणे घेतले? आणि इथे फोटो कोण देणार ?**** वृतांत कोण लिहिणार?**** बाकी बरेच प्रश्न आहेत ते धमुला नंतर विचारेन ;)

वाचने 7631 वाचनखूण प्रतिक्रिया 19

आनंदयात्री 08/07/2008 - 19:51
हे घे वृत्तांताचे स्टार्टर .. मेन कोर्स तात्यांकडुन ..
  1. मी, नीलकांत, डोम, ईन्या असे आम्ही लोक कार्यालयात पोचलो.
  2. मनिष आधीच आमची वाट पहात होता.
  3. सधरादेपा चे दर्शन थोड्याच वेळात झाले.
  4. स्वारी अंमळ बावरलेलीच होती. कोणी चल म्हटले की चलत होती, बस म्हटले की बसत होती. आमच्याशी नजरानजर झाली की लगेच स्मितहास्य देत होती.
  5. मग दाढे, मास्तर या लोकांशी भेट झाली, ही लोकं पण यंगस्टरच आहेत
  6. अशाच आमच्या गप्पाटपा चालल्या मग बराच वेळ, तेव्हड्यात आम्ही थोडे पक्षीनिरीक्षण करुन घेतले
  7. मग दस्तुरखुद्द तात्या, पेठकर काका काकु आले. ओळख पाळख झाली. मी आनंदयात्री सांगितल्यावर "अरे तुच का तो असे म्हणाले"
  8. मंगलाष्टके सुरु झाल्यावर कोनता भटजी सुंदर गातोय हे तात्यांनी ओळखले अन सांगितले.
  9. शेवटचे मंगलाष्टक संपता संपता आम्ही जेवणाच्या रांगेत पहिल्या नंबराला होतो
  10. आम्रखंड पुरी अन गुलाबजाम दाबुन हाणले.
  11. जेवतांना पण गप्पा मस्त रंगल्या. तात्यांनी अंतरजालिय राजकारणावर थोडेसे बौद्धिक घेतले, मधे मधे विनोदांची मस्त फोडणी होती.
  12. मिपाकरांनी लै गृप फोटो काढले, पब्लिक मधे फुल्ल हवा झाली होती की कोण ही गँग म्हणुन !
  13. मग धम्या अन धमी ला शुभेच्छा द्यायला स्टेजवर गेले सगळे. थोडे थोडे करुन गेलो. दरवेळेसच्या गृपमधे एक तरी हेवीवेट टाकायचा असा रुल केला होता.
  14. मी स्टेज वर धमीला "धमी" म्हणुन संबोधले
  15. गिफ्ट कोणीही दिले नाही, गटणेनी बोका आणला होता.
  16. तेव्हढ्यात विजुभाउंनी "भिंतीचा रंग ओला आहे ...." अशी काहीतरी पुणेरी पाटी शोधुन काढली.
  17. मग हळुहळु गप्पा टप्पा करत गर्दी पांगली.

प्राजु 08/07/2008 - 19:54
चला थोडक्यात का होईना वृतांत समजला. तात्या, आता सविस्तर कधी लिहिताय?? आणि फोटोही टाका... बघू तरी धम्या त्या लग्नाच्या शाही वस्त्रात दिसतो कसा ते?? - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

वरदा 08/07/2008 - 19:59
सॉलीड उत्सुकता आहे...तात्या टाका बरं का लवकर व्रुत्तांत्... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

विसोबा खेचर 08/07/2008 - 20:11
आत्ताच अंमळ दमून, थकून भागून पुण्याहून आलो आहे. थोडा श्वास तरी घेऊ द्या. कामधंद्याची काही कामे अजून करायची बाकी आहेत तेवढी करतो अन् फोटू टाकतो. नीलकांताने मला अजून काही फोटू पाठवायचे बाकी आहेत, त्यांचीही वाट पाहतो आहे. जाता जाता, सख्या गटणेचा एक किस्सा सांगून जातो... हा सख्या गटणे म्हणजे अंमळ वल्लीच आहे. हे पोरगं मध्यमउंचीचं, काळंसावळं परंतु स्मार्ट अन् तरतरीत चेहेर्‍याचं आहे. एकमेकांशी परिचय सुरू होता. आमचे डॉ प्रसाद दाढे हा अगदी सरळ मनाचा अन् सज्जन माणूस. तो मोठ्या आत्मीयतेने सख्या गटणेला आपली ओळख करून देऊ लागला - "नमस्कार. मी डॉ प्रसाद दाढे!" आता यावर सख्या गटणेने दिवे ओवाळावे अशी डॉक्टरांची अपेक्षा नक्कीच नव्हती. परंतु काहीतरी पोझिटिव्ह रिसपॉन्स तरी सख्याकडून नक्कीच अपेक्षित होता. परंतु सख्या कसला! "बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच त्याला म्हणायचं असावं! वर म्हटल्याप्रमाणे डॉ दाढे बिचारे पडले सज्जन अन् साध्या स्वभावाचे. सख्याकडून इतका थंड रिस्पॉन्स येईल अशी त्यांना अपेक्षाच नव्हती. त्यामुळे सख्याच्या त्या "बरं बरं!" ने डॉक्टरांचा चेहेराच पडला, ते थोडे खजील झाल्यासारखे वाटले अन् त्यावर मी अन् मास्तर खो खो हसलो! अंमळ गंमतीशीरच प्रकार घडला तो! :) असो, बाकी, फोटू टाकीन तेव्हा थोडीफार कॉमेन्ट्री करीनच... :) आपल, (मराठी आंतरजालीय धुरंधर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आनंदयात्री 08/07/2008 - 20:17
>>"बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच त्याला म्हणायचं असावं! =)) =)) =))

In reply to by विसोबा खेचर

मुक्तसुनीत 08/07/2008 - 20:17
ये तो सिर्फ ट्रेलर हुवा ! मेन पिक्चर का इंतजार है !! :-)

In reply to by विसोबा खेचर

कुंदन 08/07/2008 - 20:43
कदाचित डॉ नी , सख्या पक्षीनिरीक्षण करण्यात गर्क असताना ओळख करुन दिली असेल .....

प्रकाश घाटपांडे 08/07/2008 - 20:18
तात्यानु लई दमलाय ; तव्हा "श्रमपरिहार " होउन जाउं द्या! प्रकाश घाटपांडे

विजुभाऊ 08/07/2008 - 20:19
बरे झाले रे गटण्या तू तिथे आलास ते... तुझ्या वात्रटलिखाणामुळे सगळे मीच "सखाराम गटणे " नावाने लिहितोय असे म्हणत होते तुझा फोन आला तेंव्हाही तात्या मला हेच म्हणत होता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

केशवसुमार 08/07/2008 - 20:24
तो गटणे होता की विजूभाऊंनी गल्लीतला कोणी तरी धरून आणला होता.. स्वत। वर संशय नको म्हणून? मला अजून डाऊट आहे.. (सावध)केशवसुमार..

In reply to by केशवसुमार

मुक्तसुनीत 08/07/2008 - 20:29
सखाराम गटणे = लखोबा लोखंडे = विजुभौ शा .......! =))

टारझन 08/07/2008 - 20:38
>>"बरं बरं!" असा इतका थंड रिस्पॉन्स सख्याने दिलान की जणू काही "हो का? आपण डॉ दाढे का? मग मी काय करू??" असंच >>>>त्याला म्हणायचं असावं! दाढे गटण्याच्या शत्रुपक्षातले तरं नव्हे ? :? फोटु पटकन चढवा (स्वगत : एक वेळ धमू नसला चालेल पण, गुलाबजाम सज्जित थाळी बघायला मिळावी हा नेक हेतू) जामूनप्रेमी) कु ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by टारझन

विसोबा खेचर 08/07/2008 - 21:25
(स्वगत : एक वेळ धमू नसला चालेल पण, गुलाबजाम सज्जित थाळी बघायला मिळावी हा नेक हेतू) बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर! :) धम्याच्या लग्नातला मेनू सर्व मिपाकरांना मिळावा या हेतूने 'आजची खादाडी' या सदरात फोटू टाकण्याकरता 'वाढलेल्या सबंध पानाचा फोटू काढ' असं मी मुद्दामून यात्रीला की कुणाला तरी सांगितलं होतं! आता लवकरच तो फोटू मुखपृष्ठावर टाकतो म्हणजे सगळ्यांना त्याचा आस्वाद घेता येईल.. :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

टारझन 08/07/2008 - 21:41
>>>बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर! मला ही धम्याला बघायची अतुरता लागली आहे... माझा वाईट हेतू नव्हताच! भावना प्रकट करण्यात चुक झाली... जाहीर माफी !! फोटो बघण्यास (धम्या-धमीचे) ऊतावळा ) कु ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

In reply to by विसोबा खेचर

टारझन 08/07/2008 - 21:42
>>>बाबारे, मला मिपाकरांची काळजी आहे बर! मला ही धम्याला बघायची अतुरता लागली आहे... माझा वाईट हेतू नव्हताच! भावना प्रकट करण्यात चुक झाली... जाहीर माफी !! फोटो बघण्यास (धम्या-धमीचे) ऊतावळा ) कु ख
तू भारी ...तर मी लई भारी...
http://picasaweb.google.com/prashants.space

शितल 08/07/2008 - 21:18
बरे झाले रे गटण्या तू तिथे आलास ते... तुझ्या वात्रटलिखाणामुळे सगळे मीच "सखाराम गटणे " नावाने लिहितोय असे म्हणत होते लै भारी पण गटाण्याला बघुन तुमच्या वरचा सशय कमी झाला असे म्हणायचे आहे का.

पावसाची परी 09/07/2008 - 10:37
हा हा हा हा सगळ्यान्निच छान लिहिलय

अन्या दातार 10/07/2008 - 02:08
उत्तम चालले आहे. स्वगतः च्यायला, काहीतरी काम काढून पुण्याला धमुच्या लग्नाला जायला हवं होतं