Skip to main content

अखेर धमाल्याचं 'वाजवा रे वाजवा' वाजलं! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 08/07/2008 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी, आज सकाळीच शिवाजीनगर स्टेशण (भें.. शुलेची ऐशीतैशी!) व परिसरात 'मुंबईहून कुणीतरी बडी असामी येणार आहे बॉ!' अशी लोकांची चर्चा चालली होती. कारण डॉक्टर दाढे आणि पेठकर आपापल्या गाड्या घेऊन महामहीम तात्यासाहेब अभ्यंकरांना प्रेमाने उतरवून घ्यायला आले होते. हां, आता आपण आपलं स्वत:ला महामहीम वगैरे म्हणून घ्यायचं, अहो पण कसला आलाय डोंबलाचा महामहीम? या दीडदमडीच्या तात्याला त्या शिवाजीनगगर फलाटावरचं कुत्रंदेखील ओळखत नव्हतं! :) तर ते असो.. ! ठरल्याप्रमाणे पेठकरशेठ, तात्या अन् डॉ प्रसाद दाढे काटा किर्र् मध्ये मिसळ खायला गेले. मिसळ बाकी खरोखरंच फसकिल्लास होती.

"अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 08/07/2008 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
"अत्तरातल्या सुगंधापेक्षाही त्या मागे एक उदात्त मेसेज होता तो मला कळाला." "करून हे एव्हडे सारे कुणी जरी पडे आजारी सेवेच्या कर्तव्या सारखे कर्तव्य वाटे फारच न्यारे" मी अंधरीहून हुतात्माचौकाला जाणारी बस घेवून सकाळीच काही कामासाठी जात होतो.शिवाजी पार्कला स्नेहा चढताना पाहिली.मला पाहिल्यावर माझ्या जवऴच्या सिटवर येवून बसली.बऱ्याच वर्षानी आमची भेट झाली होती.माझा मित्र शरद गडकरीची ही एकुलती एक मुलगी.अरूण कामत बरोबर लग्न झाल्यावर ती अमेरिकेला गेली.खूप वर्षानी ती पण शरदला बघायला म्हणून आली आहे असं तिच्या कडून कळलं.

स्वप्नविश्वाचा विरह...

लेखक वेदश्री यांनी मंगळवार, 08/07/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
कधी सकाळचा गजर वाजून सांगतो की, "उठा, आवरा, ऑफीसला जा... " आणि आपले मात्र ढिम्म हलायचे मन नसते. इत्तके मस्त स्वप्न पडत असते की ते सोडून ऑफीसला जायचे म्हणजे कैच्याकैच असे वाटावे. ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घ्यावी आणि असेच अनादीअनंत काळासाठी आपण आपल्या स्वप्नात रममाण व्हावे अशी अनावर इच्छा होते. फोन करायलाही स्वप्नातून बाहेर पडवत नाही. स्वप्नात मन रमवावे वाटत असतानाही का कोण जाणे मनाचे अर्धेअधिक लक्ष मात्र त्या मेल्या पुढेपुढे सरकणाऱ्या काट्यासोबत टिकटिक करत फिरत राहते. जी दोलायमानता शेवटी असह्य होऊन तिरीमिरीत उठून आवरून ऑफिसला जावेच लागते.

धमु चे लग्न..एक शहिद दिवस..

लेखक केशवसुमार यांनी मंगळवार, 08/07/2008 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आज एजून एक योध्दा धारातिर्थी पडला शहिद झाला ( आमच्यात आला) कस काय झाले आपल्या धमुचे लग्न? कोण कोण मिपाकर जमले होते? लग्ना आधीचा मिसळ कट्टा कसा झाला? धमु आणि धमी ने कुठले उखाणे घेतले? आणि इथे फोटो कोण देणार ?**** वृतांत कोण लिहिणार?**** बाकी बरेच प्रश्न आहेत ते धमुला नंतर विचारेन ;)

गर्दी

लेखक छोट्या यांनी मंगळवार, 08/07/2008 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
एक रस्ता , आणि माणसं. खुप माणसं, कळपासारखी. एवढ़ी माणसं असुनही रस्त्यावर फारसा गोंधळ नाही. आपापले सामान घेउन जो तो चालतोय ... फक्त चालतोय. रस्त्याला थोडा उतार आहे , रस्ताही रुंद, मग चालणंही सोप्प झालयं. गर्दीलाही उत्साह आलाय, उतारबघुन. काहीजण जात्याच मजबुत आहेत, मग त्यांचा वेग अजुन वाढतो ... त्यांच्या नकळत. त्यांना समजत नाही की बाकीचे का हळू चालतायेत. स्वतःशीच हसत चालत रहातात, दुसर्यावर. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सापाच्या आकाराचे चर... नागमोडी पण समांतर. चर मोठे गूढ़.

प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं? दिपक पासे

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 08/07/2008 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
बरिस्तात जाऊन Coffie प्यायची की CCD तला थंड चहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? कधी Mc'd चा बर्गर खा नाहीतर मल्टिप्लेक्स मध्ये जाऊन एखादा पिक्चर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? तिला घेऊन खडकवासला की कार काढून लोणावळा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? दररोज फोन calls आणि SMS करावे लागतील तिला? प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? प्रेम हा विषयच आमचा कच्चा ह्याचा कोचिंग क्लास असेल कुठे तर पाहा प्रेमात पडायचं म्हणजे काय करायचं कोणी सांगेल का मला? अहो, ह्या कसल्या प्रेमात पडायच्या ना ना तऱ्हा प्रे

चाहूल

लेखक मनीषा यांनी मंगळवार, 08/07/2008 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे हसू आरशात आज आहे चांदण्याची, बरसात आज आहे | मिटले कसे कमलदल अलगद बंदिवान त्यात, भ्रमर आज आहे | घुमती आसमंती नाद पैंजणांचे सूर-लयीत हरवले, जग आज आहे | उमटती हळूवार तरंग जळावरी विश्व हे रजनीच्या, अधीन आज आहे | सळसळती पाने, रान सारे जागे सर्वांगी भिनलेला, गंध आज आहे | नयनी उमटे लाली, मन धुंदावलेले स्वप्नांची मज, चाहूल आज आहे |

पहिली शेर, दुसरी सव्वाशेर, नवरा पावशेर.

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 08/07/2008 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
झाला बुवा एकदाचा तो बहुप्रतीक्षित घटस्फोट! किती ग वाट बघायची त्यासाठी? किती वेळा देव पाण्यात ठेवायचे? (त्यांना सर्दी-पडसंच नव्हे, आताशा न्युमोनिया पण व्हायला लागला होता...) त्याच्या `बाहेरख्याली'पणाबद्दल तिनं जाहीर संशय घ्यायला सुरवात केलीच होती. परदेशी माणसांबरोबरचं लफडंही चव्याट्यावर आण्लं होतं. तरी त्याला काही शुद्ध नव्हती. त्याचं वेगळंच गणित सुरू होतं. त्याला घरचं अन्न गोड लागेनासं झालं होतं. बायकोने भरवलेलं आधी जे अम्रुत लागायचं, ते आता कडू जहर लागायला लागलं होतं. तुला घटस्फोट घ्यायचा तर घे, मी `बाहेरख्याली'पणा सोडणार नाही, असंच त्याला सुचवायचं होतं.

रोठ

लेखक वैशाली हसमनीस यांनी मंगळवार, 08/07/2008 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
:SS साहित्य--एक वाटी बारीक रवा,बारीक चिरलेला कांदा,मिरची व कोथिंबीर,एक वाटी आंबट ताक,मीठ,पाव टी स्पून खायचा सोडा(पूड),एक चमचा तेल,निर्लेपचे भांडे कॄती---रवा घेऊन त्यात ताक व थोडे पाणी घालून फेटावे, नंतर कांदा,मिरची व कोथिंबीर घालावी.अर्धा तास मिश्रण तसेच ठेवावे.भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून घ्यावें. नंतर मिश्रणात सोडा घालून ते एकवार फेटून लगेच भांड्यात ओतावे.ओव्हनमध्ये किंवा गॅसवर १० ते १५ मि.ठेवावे.मिश्रण फुगून येइल.ताटात ते घेऊन वड्या पाडाव्यात.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावे. झटपट नाश्ता तयार!