Skip to main content

असंही व्हॅलेंटाइनचं सेलिब्रेशन...

लेखक मनस्विता यांनी सोमवार, 15/02/2021 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
उगवला प्रेमिकांच्या सोहळ्याचा दिन वाजत गाजत त्याच्या हृदयाची वाढली होती धडधड तिच्याही काळजात होत होतं लकलक कारण तो होता ट्रेडमिलवर धावत आणि तिच्या लेकीच्या व्हॅनचा हॉर्न होता वाजत दिले तिने त्याला आवर्जून फूल पण होतं ते डब्यातलं कोबीचं फूल निघाला मग तो एकटाच लॉंग ड्राईव्हवर कारण होतं त्याचं ऑफिस नगर रोडवर पोहोचला एकदाचा तो ऑफिसला होतीच 'ती' तिथे सोबतीला सुरु झालं त्याचं आणि तिचं गूज म्हणला तो तिला दिवसभराची राणी माझी तूच तिचाही 'तो' होता घरात सोबतीला देईना तिला एकही क्षण फुरसतील कॉम्प्युटरची सिस्टीम होती त्याची 'शिरीन' अन घरकामाचा रगाडा तिचा 'फरहाद' मावळला दिनकर अन झाला त

एखादं तरी फूल!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/02/2021 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे (दिनांक १९ फेब्रुवारी २०२१ च्या शिवजयंतीच्या मुहुर्तावर माझी ‘सायको’ नावाची कादंबरी इचलकरंजीच्या ‘तेजश्री प्रकाशना’कडून प्रकाशित होत आहे. त्या कादंबरीतील विशिष्ट अंश दिनांक १२ फेब्रुवारी २०२१ च्या ‘अक्षरनामा’त प्रकाशित झाला. तोच आजच्या ब्लॉगवर...) : गावातील मंदिराचा पार. पारावर जीवन, प्रताप, मधुकर, आत्माराम, कडू दिसतात. आत्माराम, कडू हे खाली बसलेले तर जीवन, प्रताप, मधुकर पारावर उभे आहेत. कडू अजूनही दारुच्या नशेत आहे. पण नशा बरीच उतरलेली दिसते. बाजीराव शेट मागे एका कोपर्‍यात बसलेले दिसतात. आत मंदिरात काही माणसं आणि बायाही दिसतात दुरुन. बाहेर अधून मधून पाऊस पडतो.

मुर्ख

लेखक कर्नलतपस्वी यांनी सोमवार, 15/02/2021 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्याच्या उतरणीला सगळे बोट दाखवतात तु किती मुर्ख आहे म्हणून सारे हीणवतात माणुसकीच्या नात्यानं जमेल तेवढे करत होतो स्वतःच्या स्वार्था आधी जबाबदारीला पुढं ठेवत होतो तीच जबाबदारी आता मुर्खपणा ठरते ज्यानां आधार दिला त्यांच्याच कडुन कळते जेव्हां चुकत होतो तेव्हां बरोबर म्हणायचें गणित नाही कळाले आता बरोबर वागताना मार्क शुन्य पडले आता काय उपयोग हे सगळं बोलून जेव्हा हातातले सारे पक्षी गेले उडून मेल्या सगळ्या भावना बोथट झाल्या संवेदना पण आतला माणुस काही मरत नाही माणुसकीचा लळा काही सुटत नाही शहाण्यांच्या जगात हे आसचं चालायच "शहाण्या" लोकां कडून कस जगायचं हे नव्यानं आता शिकायचं माणुसकीच्या

धम्मालपंती प्रवेशिका – ४

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 15/02/2021 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
४. मिपा आयडी ढब्ब्या यांचा मुलगा राघवेंद्र देशपांडे (वय ८). एक चित्र. चित्राचं नाव : बर्ड्स आय - विंटर लँडस्केप

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रांचे सादरीकरण अ १ पान १ ते ५

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 15/02/2021 01:00 या दिवशी प्रकाशित केले.

अध्यायनिहाय श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राचे सादरीकरण - अ १ ...पान १ ते ५

संत साहित्य, विशेषतः औलिया संत चरित्राच्या पोथ्यांचा देवघरात ठेऊन रोज किंवा परिपाठाने, सप्ताह किंवा पारायण करण्यासाठी उपयोग केला जातो. त्या लेखनातील अदभूतता इतरांना आलेले अनुभव आणि श्रद्धा भाव याच्या प्रभावाने पोथी साहित्याकडे ‘खाजगीत श्रद्धेने उपयोगात आणायची बाब’ असे संबोधून चिकित्सकपणे कमी पाहिले जाते. पारायणासाठी किंवा रोजच्या नित्यनियमातून वाचनाला ठराविक जागेचे, वेळेचे, सोवळे, भोजनादि बंधन येते.

मुक्त

लेखक सरीवर सरी यांनी रविवार, 14/02/2021 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही..
काव्यरस

जाधवगड,जेजुरी व मयुरेश्वर एक धावती भेट 

लेखक गोरगावलेकर यांनी रविवार, 14/02/2021 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरोब्बर एक वर्षांपूर्वी म्हणजे १४ फेब्रुवारीला मैत्रिणीच्या मुलाच्या लग्नानिमित्ताने मोरगावला जाणे झाले होते. लग्नाची वेळ थोडी वेगळीच होती. ना सकाळचा ना संध्याकाळचा असा दुपारी ४ वाजून ११ मिनिटांचा मुहूर्त होता. मुंबईहून गाडीने साडे तीन चार तासात पोहचणे शक्य होते. पण असाही संपूर्ण दिवस तर जाणारच होता म्हणून आमच्याबरोबर येणाऱ्या स्नेह्यांशी चर्चा करून सकाळी लवकरच निघून वाटेत जमेल ती ठिकाणे बघत मोरगावला पोहचायचे ठरवले. मार्ग ठरला नवी मुंबई-पुणे-सासवड-जाधवगड-जेजुरी-मोरगाव व रात्री परत माघारी.

वाजवा रे वाजवा

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 14/02/2021 20:05 या दिवशी प्रकाशित केले.
वाजवा रे वाजवा.    'आता सावध सावधान समयो' लग्नात शेवटचे मंगलाष्टक सुरू होते ."वाजंत्री बहु गलबला न करणे"ही ओळ सुरू झाली की बाहेर उभे असलेले  बॅंडवाले सज्ज होतात.भटजींनी "शुभमंगल सावधान"म्हटले, की बॅंडचा दणदणाट सुरू होतो.बहुतेक वेळा,कानठळ्या बसवणारा, असह्य होणारा ; क्वचित सुरेल स्वरांची,मधुर गाण्याची रिमझिम करडणारा .वाजंत्री कसेही असोत;पूर्वीतरी, लग्नकार्यात बॅंड अनिवार्य वअत्यावश्यक असे.लग्नाच्या आधीचे दिवशी नवर देवाकडचे लोक (वर्हाड) येतात,तेव्हा त्यांचे स्वागतासाठी  बॅंड तयार हवाअसे.नाही तर त्यातल्या काही लोकांना तो अपमान वाटे.त्यांचे स्वागत, वाजत गाजत होणे आवश्यक असे.

कण

लेखक अनुस्वार यांनी रविवार, 14/02/2021 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
नदीच्या प्रवाहात दोन अनोळखी आणि दूरचे दगड एकमेकांना भेटावेत तशी माणसांच्या समुद्रातील आपली भेट. जिथे भेटलो तिथेच नदीचा सागर झाला. निदान आपल्यापुरते तरी नवीन दगडांवर आदळणे थांबले. पूर्वी आधार शोधणारे हात आता एकमेकांच्या आधाराला सज्ज होते. माणसांची स्वयंभू नदी तशीच वाहत होती. मनाला वाटलं तेव्हा आपणही प्रवाहात पुन्हा मिसळायचो, पण आता आवडत्या वळणावर क्षणभर विश्रांती घेताना प्रवाहाच्या मागे पडायची फिकीर नसायची. मातीत रुजलेल्या बी सारखा मी तुझ्यातून अंकुरत होतो. ना मला वाढायचं होतं ना फळाफुलांनी बहरण्याची आस होती. धरतीतून उगवलेला अंकुर आकाशाच्या ओढीनेच वाढत असतो.