विस्मरणात गेलेला कारागीर - लोहार
मीत्रानों एकदा राजस्थान मधे ट्रेनिंग मधे असताना सीमावर्ती भागात गाडी घेऊन दुसर्या डिटँचमेन्टला भेट द्यायला चाललो होतो. गाडी मीच चालवत असताना अचानक जोरात खडखडाट झाला व गाडीचा दरवाजा दुर फेकला गेला. तसाच दरवाजा गाडीत टाकला आणी पुढे निघालो. थोड्याच अंतरावर एक छोटीशी वस्ती दिसली, म्हटलं बघाव काही मदत मीळतीय का?
दोन तीन बैलगाड्या, मोकळे आजुबाजुला नसलेले गवत चरत आसलेले बैल, चार सहा वेगवेगळ्या वयाची पोर. रस्त्याचे कडेला काही पुरूष लोखंडी शेतीची आवजार बनवत होते तर बायका तात्पुरती बनवलेल्या चुलीवर जेवण बनवत होत्या.
मिसळपाव