घरटे २
माझी नजर आपसूकच अपराध्यासारखी खाली गेली. कारण, मी त्याच्यासाठी काहीही करू शकलो नव्हतो.
करणार तरी काय? ती समोरची जमीन एका बिल्डरला विकल्या गेली होती. तेथे आता अपार्टमेंट बनणार होते. मी घरात आलो अचानक मन भूतकाळाकडे आकर्षिल्या गेलं. वेळेच्या रथाची चाके उलटी फिरू लागली........
त्यावेळी मी नुकताच सायनरला राहायला आलो होतो. अंजली अजून पाळण्यात होती. नवीन बांधकामाचे व्रण अजून शिल्लक होते.
दिवाळीमध्ये रंगकाम केल्यामुळे येणाऱ्या एका वेगळ्याच सुगंधाची अनुभुती तेथे येत होती.
मिसळपाव
