राम राम मंडळी,
आजपर्यंत मिपावर अतिलघुकथा, पाककृती वगैरेच्या स्पर्धा झाल्या.सर्व मिपाकरांनी त्यात उत्साहाने भाग घेतला, अंमळ मजा आली..
ते पाहून मिपाकरांमध्ये अजून एक लघुनिबंध स्पर्धा घ्यायची असे आम्ही ठरवले आहे.
विषय - मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण.
मोजून दहा ओळी..
निबंधाच्या शेवटी,
"...आणि मिपाचे शुद्धलेखनविषयक धोरण शेवटी ठरले एकदाचे..!"
हे वाक्य येणे आवश्यक आहे...
निबंधात,
"शुद्धलेखनाचे डुढ्ढाचार्य" हा शब्द एकदा तरी आलाच पाहिजे.
"फाट्यावर मारणे.." या क्रियापदाचा वापर एकदा तरी करणे आवश्यक आहे. जसे, फाट्यावर मारले, फाट्यावर मारतो, फाट्यावर मारीन.. इत्यादी..!