Skip to main content

ही तान कधीची..!

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
ही तान कधीची..! ============================== ध्यानी तरळती क्षण काही ही याद कशाची.. मनी झंजावती लहरी काही ही गाज कुणाची.. रानी पसरती भास काही ही रात कधीची..? तनी अंकूरती फुटवे काही ही आस कशाची.. घनी गर्जती कल्लोळ काही ही काच कुणाची.. पानी ओसरती आवेग काही ही काट कधीची..? भानी उमलती किरणे काही ही हाक कशाची.. बनी झिळमिळती थेंब काही ही साथ कुणाची.. कानी शहारती गीते काही ही तान कधीची..? ही तान कधीची..! ============================== स्वाती फडणीस .......... २०-११-२००८

(विचारणा)

लेखक चेतन यांनी शुक्रवार, 19/12/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
स्वाती ताइंची संवेदना!! वाचुन नको त्या संवेदना!! जाग्रुत झाल्या. आणी पडले विडंबन लाल भडक तर्रीवाली तिखट मिसळ... खाल्ली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या लाव्हारसा सारखीच दिसते.. लाल! तिखट रस्स्याचा रसरसता रंग दाखवणारी.. जिभेचे चोचले पुरवणारी.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे सात्विक बुळबुळीतपणच वाईट..! सोसत नसुनही खाल्ल्यावर वारंवार लागते ना घाई.. ही तर फक्त संपलेली... आतडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा होइल..
Taxonomy upgrade extras

हारापरी हौतात्म्य हे ज्यांच्या गळा साजे

लेखक सर्वसाक्षी यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.
दिनांक ९ ऑगस्ट १९२५ रोजी ’८ डाऊन’ गाडीवर लखनौ पासोन सुमारे चौदा मैल अंतरावर काकोरी ते आलमनगर दरम्यान सायंकाळी साडेसातच्या सुमारास हिंदुस्थान प्रजासत्ताक संघटनेच्या १० धाडसी शिलेदारांनी दरोडा घालुन सरकारी तिजोरी लुटली आणि साम्राज्य हादरले. हा घाला गाडीतुन वाहुन नेल्या जाणाऱ्या तिजोरीवर नव्हता तर ब्रिटीश साम्राज्यावर होता. या धाडसी क्रांतीकारकांनी जणु सरकारी खजिना लुटुन सरकारला आव्हान दिले होते. हा दरोडा अत्यंत विचार्पूर्वक ठरविलेला व सुनियोजित होता. एकदा हुतात्मा पंडीत रामप्रसाद बिस्मिल शाहजहानपूरहुन लखनौला जात असताना वाटेत त्यांनी या गाडीत सरकारी खजीना चढवताना पाहिला.

तुला शिकविन चांगलाच धडा..

लेखक योगी९०० यांनी शुक्रवार, 19/12/2008 02:42 या दिवशी प्रकाशित केले.
माझा एक चतूरपणाचा (?) अनुभव.. अभियांत्रिकी पदवी घेतल्यावर मद्रास येथे नोकरी निमित्त रुजू झालो. घरापासून दुर आणि त्यात खिश्यात पैसा खुळखूळत असल्याने थोडाफार माज आला होता. वाट्टेल तसे पैसे उधळायचो. अर्थात दारू, सिगारेटवगैरे व्यसनापासून दुर होतो. मुख्यतः कपडेलत्ते, हॉटेल ,चित्रपट पहाणे, हिंडणे आणि छानछोकीत राहणे..यातच बराच पैसा खर्च होत होता. अशा माझ्या राहणीमानामुळे बर्याच लोकांनी मला हेरले असावे. मुद्दाम माझ्याशी मैत्री कर, मला खर्च करायला लाव असे काहीजण करायचे. पण थोड्याफार अनुभवांनंतर मी अश्या लोकांना दूर ठेवू लागलो. पण काही हेकेखोर पाठच सोडायची नाहीत.

झोका...

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 19/12/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेला उंच वर, नाही थार्‍यावर खाली झरझर, आला झोका.. अंगणी बांधला, झाडाले टांगला मैत्रीने सांधला, एक झोका.. आंदोलने वेडी, निसर्गाची खोडी मारावीशी दडी, घेत झोका.. झुले पाण्यावरी, होडी नी नावाडी वल्ह असे मारी, देत झोका.. गुंजन करीतो, फ़ुलाशी रमतो भवर हसतो, घेत झोका.. पाखरांचे गाणे, आभाळ दिवाणे पाऊस बहाणे, देई झोका.. इंद्रधनुष्य ते, क्षितिजी रंगते भुईला सांधते, देते झोका.. पाण्याचे तरंग, पाहूनिया दंग माझे प्रतिबिंब, घेते झोका.. पिकावर जाई, बांधावर गाई मन माझे घेई, पुन्हा झोका.. आशेचा हिंदोळा, दु:खाचा उमाळा किती नाना कळा, दावी झोका.. जीवनाचा खेळ, गेला किती काळ नाही त्याचा मेळ, असा झोका.. -

संवेदना!!

लेखक स्वाती फडणीस यांनी शुक्रवार, 19/12/2008 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
संवेदना!! =================================== शुष्क.. निबर काळी.. बोथट खपली.. बघितली आहेस कधी? ती ज्वालामुखी नंतरच्या मुरमाड जमिनी सारखीच दिसते.. राठ! जखमेचा रसरसता लाल रंग लपवणारी.. जागच्या जागी गोठलेली.. तिच टोचते.. जखमेच्या ठणक्यापेक्षा जास्त! त्या भळभळत्या वेदने पुढे.. हे निःसत्व दगडपणच वाईट..! कातळी लाव्ह्याच्या प्रस्थरांवरही फुटते ना पालवी.. ही तर फक्त खपलेली... कातडी.. ! गळून जाणारी. गळेलच..!!! मग पुन्हा हसेल.. संवेदना!! मिरवेल वीरश्री!!!.. =================================== स्वाती फडणीस..... ०३-१२-२००८
Taxonomy upgrade extras

संत-सत्पुरुषांच्या सामाजिक योगदानाचे निकष

लेखक लिखाळ यांनी गुरुवार, 18/12/2008 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सत्पुरुषांचे कार्य काय? अथवा अमुक एका संताने समाजासाठी काय केले? अश्या तर्‍हेचे प्रश्न आपल्याला अनेकदा पडतात. आपण जर कुणा सत्पुरुषाला, संताला मानत असू, पूजत असू तर असे प्रश्न आपल्याला विचारले जातात. याबद्दल थोडा उहापोह करावा आणि आपली मते जाणून घ्यावीत असे वाटल्याने हा चर्चा प्रस्ताव मांडत आहे. समाज कार्य म्हणजे अनेकदा समाजाचा भौतीक विकास करण्यासाठी प्रयत्न असे वाटत असते. तर दुसरा एक पैलू म्हणजे मानसिक-भावनिक-शारिरीक पातळीवरची मदत. समुपदेशन, वैद्यकीयसेवा, स्वच्छता वगैरे साठी प्रबोधन इत्यादी. या सेवा समाजातल्या व्यक्तींना सरळ दिसतात आणि त्या नोंद करण्याजोग्या सुद्धा असतात.

जिम

लेखक भिडू यांनी गुरुवार, 18/12/2008 22:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या जिम मधे (म्हणजे माझी नाही, मी ज्या जिम ला जातो ती) एक से एक नमुने आहेत. एक मुलगा आहे त्याच्या सर्व वस्तू ब्रॅंडेड असतात्,त्याचे कपडे,शूज सोडा,घाम पुसायचा नॅपकिन पण 'नाईके' चा आहे. त्या मानाने व्यायाम यथातथाच करतो. दुसरा एक जण तर पुर्ण नटुन थटुन येतो.डोक्याला हेड बँड(केस डोळ्यावर येतात म्हणॅ),हाथाला रीस्टबँड,कानात आयपॉड्,हाथात ग्लोवस्,पायाला नी पॅड्.(नशीब abdomen guard, चेस्ट पॅड घालुन येत नाही ते).अजुन एक बाई आहे(चांगली जाडजूड आहे). एके दिवशी ती चक्क कॅमेरा घेवुन आली आणी ट्रेनर ला म्हणाली कि माझा ट्रेड मिल वर धावताना फोटो काढ.

गूढ...थरारक....भीती वाटेल अशी भुताटकी

लेखक अनंत छंदी यांनी गुरुवार, 18/12/2008 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
व्यंकूचा भयकथेचा धागा पाहून मनात एक विचार आला. आपल्यापैकी कित्येकांचा भूते असण्यावर विश्वास नसेल तर कित्येकजण छातीठोकपणे त्यांना, त्यांच्या नातेवाईकांना, परिचितांना भुताटकीचा अनुभव आल्याचे सांगतील. तर असे काही अनुभव असतील तर लिहा. काल्पनिक भयकथेपेक्षा हे अधिक रोमांचक वाटतील.

यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... भाग २

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 18/12/2008 17:05 या दिवशी प्रकाशित केले.
तर मंडळी आता आम्ही आमच्या लेखाचा दुसरा भाग मोठ्ठ्या आनंदाने, उत्साहात आणि नेहमीच्याच जोशात प्रसिद्ध करत आहोत. पण पहिला पार्ट कुठे आहे असे विचारुन आम्हाला अडचणीत नका आणु. पहिला भाग तुम्हाला " यशस्वी प्रतिसादकर्ता होण्यासाठी काय करावे ... " येथे पहायला मिळेल. ह्याच लेखाला तुम्ही पर्यायाने टारुबाबाच्या "अवांतर प्रतिसादांवर उपाय ह्याचाही "भाग-२" म्हणु शकता. असो.