बहर
नुकताच तुझ्या आठवणींचा बहर
मजला पुरता वेढुन गेला
भरदार फुललेला गुलमोहोर
पावसान पुरा झोडुन गेला !!
कळेल तुला त्या तेथे दुरवर
आठवांचा पायरव वाजुन गेला
आवरताना चांदणे हे शुभ्रतर
रात माझी जागवुन गेला !!
निनाद्ताना पावसाची सर
मजला पुरता झींगुन गेला
कधि ना तुला कळ्णार
गंध तुझा हा वेडावुन गेला!!
सुचेता सुळे
Taxonomy upgrade extras
मिसळपाव