Skip to main content

तुला कापते रे तुला कापते

लेखक मूखदूर्बळ यांनी बुधवार, 21/01/2009 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
(ग दि मा, राजाभाऊ आणि बाबुजींची क्षमा मागून 'तुला पाहते रे तुला पाहते' ह्या अजरामर गीतचे स्वैर विडंबन लिहीण्याचा प्रयत्न ) तुला कापते रे तुला कापते तुझी पर्स माझ्या मनी राहते जरी साधीभोळी तुला कापते तुझ्या पगाराचा जीवा ध्यास लागे तुझ्या मिळकतीने मनी खर्च जागे तुझ्या कार्डने मी मॉल नाहते किती भाग्य थोर ह्या साधेपणीही दिसे वस्तू निद्रेत जागेपणीही उगी का वाण्याचे बील वाढते कधी बोका पाहतो का बडग्याला पती न्याहळी का कधी शेजारणीला लाटणे घेऊनी मी सदा राहते (चू भू द्या घ्या )
Taxonomy upgrade extras

सत्याचे प्रयोग

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 21/01/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
तुला मैत्रीणी किती रे? तात्यानी माझ्या चिरंजिवाना प्रश्न विचारला. त्याने काय उत्तर दिले ते कळाले नाही. कारण 'बिस्किट आंबाड्यांचा" ताजा घाणा आणायला किचन मधुन हाक आली होती. वैधानिक इशारा: 'सत्याचे प्रयोग' व्यावसायिक्(प्रोफेशनल) ट्रेनिंग असल्याशिवाय करु नयेत. अनुभव नसेल तर 'त्वांड फुटते'. हा इशारा डब्ल्यु. डब्ल्यु. एफ. च्या पैलवानांच्या इशार्-याच्या धर्तीवर वाचावा. वरील प्रष्न तात्यानी माझ्या घरी अचानक ठरलेल्या 'अल्पोपहार कट्टा' वर विचारला. त्याचे उत्तर त्याने काय दिले हे परत विचारणे मला बरोबर वाटले नाही. गरज पण वाटली नाही. आता त्याच्या प्रश्नांची उत्तरे मी कशाला संभाळू? त्याचा मुखत्यार तो.

तुझ्या रुपातुनी दर्शन घडते...

लेखक अंकुश चव्हाण यांनी बुधवार, 21/01/2009 13:55 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या रुपातुनी दर्शन घडते निर्मात्याच्या कलाकृतीचे. दिपविणारे तेज पसरले, जगी तुझ्या या मुखकमलाचे. जुलफांच्या ह्या छायेखाली, सुवर्णरूपी बहार आली. अंधारमयी अवकाशात या, पहा ही गोड चांदणी उगवली. धनुष्यकारी भ्रकुटिखाली नयन कमल ते दोन लाजरे. भासती जसे ते दोन तारे विशाल गगनी लुकलुकणारे. आरक्त अधर अन् कपोल तुझे तृशार्त मनाला सुखविणारे. दन्तपंक्ती जणू भासती, हंस नभी ते विहरणारे.

Laptop घेण्यासाठी मदत हवी

लेखक मोहन यांनी बुधवार, 21/01/2009 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी मला माझा सध्याचा Laptop बदलायचा आहे. Mackbook की Dell ( Studio /XPS) अश्या द्विधा मनस्थितीत आहे. मुख्य कारण Mackbook करता ३०/४०% जास्त किंमत द्यावी का? ऊगाच तर ब्रांड्च्या मागे जावून जास्त पैसे देत नाही ना हा मुद्दा आहे. आता मुंबईत Appleची विक्री पश्चात सेवा आहे त्यामुळे तो प्रश्न नाही. तज्ञ मिपाकर काही मदत करु शकतील का ? मोहन

सुवर्णप्रभा..

लेखक प्राजु यांनी बुधवार, 21/01/2009 06:11 या दिवशी प्रकाशित केले.
लाल केशरात रंग खेळते पहाट खास दिव्य तेज फाकताच जागली दिशांत आस... तारकांत लोपली निशा उषेस पाठवून अग्निरंग होत धुंद पूर्व रेखिते नभांस... सूर्य बिंब लाल बुंद भेदते तमास पूर्ण विश्वतीर पेटताच जाहला सुवर्ण भास... वाहताच वात मंद , मंद मंद गंध धुंद सांडताच पारिजात भूवरी पडेल रास... थेंब थेंब पाकळ्यांत आळसांत चिंब चिंब का जपून पाकळीत ठेवलेय मोतियास? ... सागरात गाज आणि लाट जात उंच उंच गारवा हवेत आणि वेड लागते मनांस... पंचमात तान घेत आज कोकिळा स्वरांत मोहरून आम्रही सुगंधितो चराचरास...
Taxonomy upgrade extras

बेलफास्ट---- मदत हवी आहे.......

लेखक मन यांनी मंगळवार, 20/01/2009 22:56 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो.... बेलफास्ट(नॉर्दन् आयलंड) या ठिकाणाबद्दल कुणाला अधिक माहिती आहे काय? तिथे प्रथमच पाठवण्यात येत आहे. आमच्या टीम पैकी अजुन तरी कुणीही तिथं गेलेलं नसल्यामुळं; कसं जावं, कुठं उतरावं ह्याची माहिती मिळाली तर फार बरं होइल. निदान चांगल्या B&B ची किंवा तात्पुरत्या निवासाची (सुरुवातीच्या काही दिवसांकरीता)माहिती हवी आहे. पोस्ट कोड BT13BT च्या जितक्या जवळ जागा मिळेल तितकं बरं होइल. आपलाच मनोबा....

हुरडा पार्टी!

लेखक आपला अभिजित यांनी मंगळवार, 20/01/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
jamkhed trip 004 एका मित्राच्या निमंत्रणावरून शनिवार-रविवारी जामखेडला (जि. नगर) त्याच्या शेतात गेलो होतो.

संवाद दोघींचा

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 20/01/2009 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
ओ राणी सरकार उठा उठा ६. ३० वाजले ! ए थांब ना प्रगती ! झोपू दे ना ५ मिनिटे अजून ! अजिबात नाही या तुझ्या अशा आळशीपणामुळे आजकाल तुला आवरायला रोजच उशीर होतो आणि मग शेवटी गडबड करत नीट न आवरता तशीच जातेस. घाणेरडी बरं बरं असू दे ! अगं असू दे काय राणी म्हणून मिरवतेस ना ? आम्ही तुझ्या मैत्रिणी बर्‍या म्हणायच्या तुझ्यापेक्षा हो बाई .बास कर तुझी वटवट. जाते मी आवरायला ! राणी आजचा दिवस लक्षात आहे ना ? का गं? आज आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असतो ! कुणाचा ? अग विसरलीस ? इंद्रायणीचा गं ! हो खरंच की ! बर झालं आठवण केलीस ते . नाहीतर रोजच्या सारखं लोणावळ्याला फक्त वडापाव घेऊन निघालो असतो दोघी.