Skip to main content

कानडी पद्धतीचे सांबार

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 22/01/2009 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याच इमारतीमध्ये रहाणार्‍या माझ्या कानडी मैत्रिणीने ही खास त्यांच्या पद्धतीच्या सांबाराची पाकृ सांगितली. हे अस्सल कर्नाटकी सांबार आहे. इडली बरोबर तेथील लोक हेच सांबार खातात.

आणखी एक भोंडला

लेखक मूखदूर्बळ यांनी गुरुवार, 22/01/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
श्री समीरसूर ह्यांचे 'सत्य' म ला उलगडले ( http://www.misalpav.com/node/5443 ) हे काव्य वाचले आणि आम्हाला पण काहीतरी खरडायची खुम खुमी आली . आणखी एक भोंडला पोलीस कोठडीत असलेले श्री राजु आणि त्यांच्या सहकार्‍यानी नुकताच एक बेमौसमी भोंडल्याचा कार्यक्रम केला.
Taxonomy upgrade extras

पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर

लेखक शंकरराव यांनी गुरुवार, 22/01/2009 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
मला ना कळे का ?... हे जग माझा मत्सर करे जरी पाखरे आम्ही सर्व एकाच भूमीवर चरे प्रतिसादांच्या साखळीत शब्दाला शब्द जोडले गेले जूळता जूळता मिपावर नाते मध्येच मन माझे रुसले कोणी सांगे समजून घ्या अन कोणी हलके घ्या पण मग सांगा माझ्याच संगे का असे घडे ? नावात माझ्या काय आहे जे इतके का टोचले ? उत्तर शोधण्यासाठी मग मी आत्मपरिक्षण केले द्वेष मत्सर दूर पळाले मिपाकरंशी नाते जूळले कळाले मर्म मला जेंव्हा मन माझे स्वछ झाले शंकरराव प्रेरणा आदरणीय वाहीदा
Taxonomy upgrade extras

सुभाषित संग्रह

लेखक सुवर्णा यांनी गुरुवार, 22/01/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना बरीच छान सुभाषिते शिकले होते. तेव्हा पाठही होती. त्यातली आता बरीचशी आठवत नाहीत. म्हणुन ती कुठे तरी संग्रहीत करण्याची गरज भासली. पूजा आणि मी हा प्रयत्न करतॊ आहॊत... १) पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम्‌ । मूढै: पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधीयते ॥ अर्थ - या पृथ्वीवर फक्त तीन रत्ने आहेत. पाणी, अन्न आणि सुभाषिते.

रायगडची प्रसिद्ध पोपटी

लेखक A1April यांनी गुरुवार, 22/01/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडची प्रसिद्ध पोपटी कुकरमध्ये १ किलो वालाच्या गावठी शेंगा + मीठ + मसाला + ओवा + अंडी + बटाटा + रताळी + चिकन + कांदे मिक्स करणे. यामध्ये पाणी मुळीच टाकू नये, सगळे पदार्थ वाफेवर शिजतात. गॅसवर ३ शिट्ट्या द्याव्या. हा पदार्थ गरम गरम खायचा. सॉलीड, जबरदस्त टेस्टी लागतो. तुम्हाला नक्की आवडेल. मला तुमचे अनुभव जरूर सांगा. माझ्या तोंडाला लिहितानाच पाणी सुटले आहे. हा पदार्थ गावामध्ये मडक्यामध्ये शिजवतात. शहरामध्ये मडके मिळणार नाही म्हणून कुकर वापरावा. AJIT THAKUR a1april@rediffmail.com

छोट्यांसाठी वॉलपेपर

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 22/01/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे. बालगीते मस्त एन्जॉय करते. तिच्यासाठी बालगीतातील/ नर्सरी रिम्स सिडी तील तयार केलेले काही वॉलपेपर तीला खुप आवडतात. ही घ्या काही तुमच्या कडील छोट्यांसाठी.

(ठुमरी)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/01/2009 13:53 या दिवशी प्रकाशित केले.

पुलस्तिंची सुरेख  ठुमरी ऐकली आणि आमच्या लेखणीने पुन्हा ठेका धरला

उधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाही

मास्तर म्हणती चविष्ट आहे हे  प्रौढांचे शिक्षण
'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

सोशीक..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/01/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
संपली जवळीक ना ! तूसुद्धा अगतीक ना ! आत लाव्हा घुसळतो वरुन सारे ठीक ना ! फावले त्यांचे कसे ? भेकडांचे पीक ना ! काय दुःखाला हवे ? आसवांची भीक ना ! भाव आहे चांगला वेदनेला वीक ना ! कान का किटले असे ? तेच ते बौद्धीक ना ! रांग नाही दर्शना, हरपला लौकीक ना ! जिंकल्या दैवासही दाद द्याया शीक ना ! जीवना माझ्यापरी, हो जरा "सोशीक" ना ! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras