तेथे कर माझे जुळती !
मूळचे केरळचे रहिवासी असलेले रेनिल्सन आणि निशा आपल्या तीन वर्षे वयाच्या मुलीबरोबर घरी परत जात होते.प्रवासात त्यांच्या गाडीला अपघात झाला त्यात निशा जागीच ठार झाल्या. रेनिल्सन यांना अनेक फ्रॅक्चर्स झाली. छोट्या तमन्नाला जबर दुखापत झाली. डॉक्टरांनी तमन्नाला ब्रेन डेड घोषित केले. ही घटना 20 जानेवारीची.
पत्नी अपघातात गेलेली, स्वत: मणिपाल येथील हॉस्पिटल मधे जखमी अवस्थेत अशा परिस्थितीत देखील रेनिल्सन यांनी अपूर्व मनोधैर्य दाखवत स्वत:चे दु:ख बाजूला ठेवून तमन्नाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला.
मिसळपाव
मराठी भावसंगीताला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणारे, एक अत्यंत प्रतिभावान संगीतकार!
त्यांना या वर्षी भारत सरकारचा 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर झाला आहे! मिपा परिवारातर्फे या अनवट कलाकाराचे मन:पूर्वक अभिनंदन..! त्यांची उत्तमोत्तम गाणी आम्हाला यापुढेही ऐकायला मिळोत हीच सदिच्छा!
(हृदयनाथप्रेमी) तात्या.