Skip to main content

मुखवास

लेखक शुभान्गी यांनी शुक्रवार, 30/01/2009 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
जलजिराच्या गोळ्या. साहित्य:१टे स्पून काळी मिरी, १००ग्रॅम विलायची, ५०ग्रॅम दालचिनी, ५० , १/२टे. स्पून काळे मीठ, ३टे स्पून आमचूर पावडर, १टे स्पून सुन्ठ्पावडर, १/२टे. स्पून हिन्ग, २टे. स्पून साधे मीठ, ५टे. स्पून पिठीसाखर कृती :काळी मिरी,विलायची,दालचिनी, लवन्ग भाजून पावडर करुन घेणे. सगळे साहित्य मिसळून परत एकदा मिक्सर फिरवा. सगळे एका बाऊल मधे घेऊन गुलाबपाणी घालून गोळ्या बनवा. बडीशेप साहित्य: अर्धा किलो मोठी बडीशेप्,दोन टे.स्पून मीठ,एक टे.स्पून हळ्द्,लिन्बू टूटीफ्रुटी,बडीशेप गोळ्या, किसलेले खोबरे कृती: गार पाण्यात हळ्द, मीठ, लिन्बू कालवा. ते पाणी बडीशेपेला लावा.

एका रानवेड्याची शोधयात्रा

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमेघ कुंटे या एका रानवेड्याची जंगलातली मुशाफ़िरी.....! ख-याखु-या जंगलपुत्रासारखं राहून.... जे अनुभवलं ते सहजसुंदर शैलीत लेखकानं रेखाटलंय. "काही पुस्तकं वाचायची नसतात, तर अनुभवायची असतात" असं म्हणतात ते अगदी खरंय. मिलिंदनं हे पुस्तक जरुर वाच असं सुचवलं तेव्हा ह्या पुस्तकात काहीतरी जबरी असणार ह्याची खात्री होती.... आणि झालंही तसंच ह्या पुस्तकासोबत आपण अक्षरश: जंगलात वावरतो. जंगल, निसर्ग ह्यावर मनापासून प्रेम करणा-या ह्या "कृ्ष्णमेघा"ची लेखन शैली इतकी ओघवती आहे ना...की आपण कधी त्याच्या सोबत जंगलात निघतो ते कळतंच नाही. अतिशय मधुर आणि अलंकारिक भाषा !

गरमा-गरम कुर्मा (फोटोसह)

लेखक नीरजा यांनी गुरुवार, 29/01/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य १. फ्लॉवर- १ वाटी २. बटाटा - १ ३. गा़जर - १ ४. टोमॉटो - २ ५. कांदा - २ ६. अलं-लसूण पेस्ट - एक चमचा ७.गरम मसला तेल, मीठ, तिखट, कोथिंबीर इ. गरम मसाला - एक चमचा धने, अर्ध चमचा जिरे, २/३ मिरी, २ लवंगा, दालचीनी तुकडा, सुक खोबरं छोटा तुकडा आणि एक चमचा तीळ+खसखस इ. तेल न घालता हलके परतुन घ्या. कृती : १. कांदा, टोमॉटो आणि गरम मसाला याची एकत्र पेस्ट करुन घ्या. २. तेल गरम झाल्यावर तिखट आणि वरील पेस्ट घालून तेल सुटेपर्यंत परता. ३. बारीक चिरलेले फ्लॉवर, बटाटा आणि गाजर वरील मिश्रणात घालून शिजवा. ४.

मराठी भाषा व शब्दनिर्मीती

लेखक मराठी शब्द यांनी गुरुवार, 29/01/2009 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
  • भाषा
कोणतीही भाषा त्यातील स्वर व व्यंजने ह्यापासुन तयार झालेल्या शब्दांमुळे वाक्यांपर्यंत पोहोचते. भाषेत जितके जास्त शब्द तितकी तिची समृद्धी जास्त. त्यातही हे शब्द जर एक स्वतंत्र व नेमका अर्थ प्रतित करणारे असतील तर त्या भाषेचे सामर्थ्य अधिकच जाणवते. माझ्या माहितीप्रमाणे "आप" ह्या शब्दाचा अर्थ पावसाच्या थेंबाच्या ढगांपासून पृथ्वी पर्यंत पोहोचण्याच्या मधल्या स्थितीसाठी वापरला जाऊ शकतो. त्यानंतर त्याचे "पाणी" होते. हे शब्द समृद्धीचे एक ऊदाहरण. "एसोटेरिक" हा इंग्लिश शब्द "एखाद्या विषयाचे खास ज्ञान व आवड असलेल्या काही व्यक्तींचा समुह" यासाठी वापरतात.

मोठ्यांचं लहान मन

लेखक संगीतनहुष यांनी गुरुवार, 29/01/2009 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
२६ जानेवारीचा "लिटिल चाम्प्स"कार्यक्रम ऐकला. सावरकरांची गीते आणि हृदयनाथ स्वतः आठवणी व अधिक माहिती सांगणार त्यामुळे अपेक्षा निर्माण झाल्या होत्या. जयो ऽ स्तुते हे आपणा सर्वांचे आवडते गाणे आले. काही म्हणा, मंगेशकरांनी गायल्यापासून हे गाणे जणू मंगेशकरांचेच झाले आहे. पण तरीही वाट पहात होतो, हृदयनाथ या गाण्याची चाल व संगीत कोणी कधी केले हे सांगतील, तिच्याविषयी अधिक टिप्पणी करतील याची. खरे तर हे सांगायला लागता कामा नये पण एक पिढी बदललेली आहे, लोकांच्या स्मरणातून ही गोष्ट गेली आहे. फार वर्षांपूर्वी एक सारंगिया होता, त्याचे नाव मधुकर गोळवलकर.

लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी...

लेखक नीलकांत यांनी गुरुवार, 29/01/2009 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म,पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी
मराठीच्या या अभिमान गितासाठी एक प्रकल्प श्री कौशल श्री. इनामदार हाती घेत आहेत. या प्रकल्पाची माहिती सर्व मराठी लोकांना व्हावी एवढ्या साठी येथे देत आहे. या विषयी सविस्तर माहिती मराठी अस्मीता या संकेतस्थळावर आहे.

सारेगमप आणि प्रजासत्ताक दिन

लेखक माझी दुनिया यांनी गुरुवार, 29/01/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला. नुकत्याच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बर्‍याचश्या भारतीयांना ही नुसतीच सुट्टीची मजा उपभोगण्यापलीकडे जाऊन देशप्रेम व्यक्त करण्याकरीता योग्य संधी वाटली. देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वेळी झी मराठी ने सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केले. एक तर या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. लहानच काय पण मोठेही या कार्यक्रमाच्या आधीन झालेले आहेत. त्यातूनही दुग्धशर्करा योग म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्ष बाळासाहेब मंगेशकरांनी मांडली आणि प्रत्यक्षातही आणली.

उन्मुक्त

लेखक जयवी यांनी गुरुवार, 29/01/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
देहफुले उमलवून मुक्त तू उन्मुक्त तू तुफानी प्रीत सरी उधळूनी रिक्त तू झेलूनी तुझा प्रपात नखशिखान्त नाहते प्रणयाचा मी मरंद मनमुराद चाखते दाहक कोसळ तुझा उतरतो नसानसात मदहोशी पसरते गात्रातून अंतरात वितळते मिठीत मुग्ध बेहोषी धुंद धुंद उन्मेषी श्वासांची लयकारी मंद मंद जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras

स्वप्न एखादे जणू...

लेखक मिल्या यांनी गुरुवार, 29/01/2009 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
चार चौघांसारखे आयुष्य माझे चालले चार चौघांसारखे त्यालाच मी ही कोसले स्तब्ध आहे केवढे पाणी तुझ्या डोहातले स्वप्न एखादे जणू आतून आहे गोठले घेतल्या काढून त्यांनी शृंखला पायातल्या वाटले मी मुक्त झालो; पाय तोवर तोडले दोष हा त्यांचा कसा? जर टाळले त्यांनी मला मीच मूर्खासारखे मुद्दे विरोधी मांडले मी किती ठोठावले पण दार ते उघडेच ना का असे माझ्यावरी माझेच मन रागावले? हाय! छळवादी किती आहे सुखाचे फूल हे मी पुरा कोमेजलो तेव्हाच का ते उमलले? पत्थराला धडकुनी फुटल्या किती लाटा जरी भंगले नाही तरी नाते कधी त्यांच्यातले ह्याचसाठी सामना करण्यास घाबरतो तुझा पंच, खेळाडू, नियम! सारे तुझ्या गोटातले
Taxonomy upgrade extras

राझ - द डोकेदुखी कंटीन्युज...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 29/01/2009 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
काल कुठुन अवदसा आठवली आणी तो राझ नावाचा शिनिमा बघितला असे झाले आहे ! हा राझ नक्की हॉरर आहे, मर्डर मिस्ट्री आहे का सस्पेन्स थ्रिलर आहे हे शेवट पर्यंत राझच राहाते. भट (घाटावरले न्हवेत) आणी सुरी द्वयी ला नक्की काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. अतिशय बाष्फळ आणी मुर्ख प्रसंगांची मालिका म्हणजे राझ असे वर्णन करता येईल. सुरुवात एकदम मुंग्या आणणारी (डोक्याला नाही तर हाता पायांना), कोणीतरी एक मरणासन्न माणुस एका गोर्‍या परदेशी माणसाला सांगत असतो की आता सगळे मरणार, 'तो' कोणालाही सोडणार नाही.