Skip to main content

चंद्रशेखर आजाद - २७ फ्रेब. १९३१

लेखक दशानन यांनी शुक्रवार, 27/02/2009 08:57 या दिवशी प्रकाशित केले.
असा शुर ना झाला कधी ना होईल ! चंद्रशेखर आजाद ह्यांनी आजच्या दिवशीच देशासाठी आपले प्राण दिले.. ! ज्याचे नाव घेताच अंगावर रोम उभे राहतात.... च्या मृत्यु नंतर देखील इंग्रजांना त्यांच्या पार्थिव देहाला हात लावायची हिंमत होत नव्हती असा हा मर्द गडी फक्त फितुरी मुळे जिवानिशी गेला... !

(ह्यापुढे) आंतरजालावर वावरताना...

लेखक देवदत्त यांनी शुक्रवार, 27/02/2009 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
आपणां सर्वांचा आंतरजालावर वावर खूप वाढला आहे. माहितीचा खजिना, विपत्रे, बँकेची कामे, खरेदी व इतरही फार कामांकरीता आपण आंतरजालाचा पूरेपूर फायदा घेत असतो. भरपूर वेळा आपल्याला सूचना मिळत असतात की आंतरजालावर वावरताना बँकेचे, खरेदी करण्याचे संकेतस्थळ वगैरे ठिकाणी सुरक्षितता का व कशी ठेवावी, इतर सुरक्षितता म्हणजे कोणत्याही संकेतस्थळावर स्वतःची खाजगी माहिती देताना नीट चौकशी करून घ्यावी इत्यादी इत्यादी. ह्यावर भाष्य करण्याचा किंवा सल्ला देण्याचा माझा बिलकुल विचार नाही. माझा रोख आहे तो इतर गोष्टींवर, नुकत्याच वाचनात आलेल्या... १.

जीव झाडाले टांगला...!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 27/02/2009 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला..! यशवंत देवांनी संगीत दिलेलं आणि उत्तरा केळकरांनी गायलेलं हे अप्रतीम गाणं इथे वाचा, इथे ऐका! खोपा हे वास्तविक सुगरणीचं घर, घरटं! त्या घरट्याला झोक्याची किती सुंदर उपमा बहिणाबाईंनी दिली आहे! एखाद्या घरट्याला तुम्हीआम्ही झोका, झोपाळा असं म्हणू शकतो का हो? परंतु बहिणाबाई त्याला किती सहजपणे झोक्याची उपमा देतात!

काही ग्राफिटीज् - 'पण अंतिम नाही.'

लेखक राज-निती यांनी गुरुवार, 26/02/2009 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सरकार गरीबांना डोक्यावर 'छप्पर' देणार, जर मतदारांनी 'कौल' दिला तर. 'चोर-पोलिस' हा आता खेळ राहिला नाही , ही एक 'वास्तवता' आहे.

गोभी मांचुरियन

लेखक चटपटीत यांनी गुरुवार, 26/02/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य मांचुरियनसाठी कोबी १/२ कि कॉर्न फ्लावर २ मध्य्म वाट्या आलं लसुण मिरची पेस्ट हवी तेवढी. मीठ चवीपुरते. मैंदा २ मोठे चमचे. तळ्ण्या पुरते तेल. ग्रेव्ही तेल १चमचा. टोमॅटो सॉस ४ मोठे चमचे. रेड चिली सॉस २ मोठे चमचे. सोया सॉस १ मोठे चमचे. कृती :- कोबी मोठा चिरुन मिक्सर मधून बारिक करावा. त्यामधे मैदा व मावेल तेवठा कॉर्न फ्लावर घाला. आलं लसुण मिरची पेस्ट हवी तेवढी टाका. मीठ घालून भजीच्या पीठापे़क्षा जरा घट्ट भिजवून छोटी भजी तळावी.(गॅसला अग्नी लावून म्हणजे पेटवून) ग्रेव्ही (ग्रेव्ही साठी गॅस मोठा करुनच करावे ) तेल गरम करुन त्यात आलं लसुण मिरची पेस्ट १ चमचा टाका.

सुक्ष्म बदल

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 26/02/2009 18:06 या दिवशी प्रकाशित केले.
"तुम्हाला 'रुटिन' चा कंटाळा येत नाही का हो सर" लिफ्ट मधे इती १२ वा माळा वय वर्षे ३५ असलेल्याना सुद्धा रुटीन चा कंटाळा. तरी बरे दरवर्षी दोन वेळा ऑफिस खर्चाने भारत दर्शन नक्की असते. त्याला पण रुटीनमुळे कंटाळले की काय असा प्रश्न डोक्यात आला. तसा रुटीन च्या कंटाळ्याबद्द्ल मला रुटीनली प्रश्न विचारला जातो. आणि मी सुद्धा रुटीन उत्तरे देतो. १. रुटीन कुणाला चुकले आहे. २. रुटीन मधेच आनंद शोधायचा. वगैरे वगैरे. असो. काल चिरंजीवांचा २२ वाढदिवस. ऑफिसमधे बायकोचा फोन आला. येताना एक छोटा वॅनिला कप घेउन या. मी आईस्क्रीम टाळतो. घसा सांभाळावा लागतो.

तिचे-प्रति-बींब

लेखक JayGanesh यांनी गुरुवार, 26/02/2009 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
आयुषयाच्या सुंदर अश्या वळणावर, जे प्रतिबींब बघीतले होते, ते तुझेच होते आणी तुझेच राहील. आणखी सुचवा...

नवी ओवी

लेखक त्रास यांनी गुरुवार, 26/02/2009 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
जे का रंजले-गंजले, तया तेल-पाणी करुनी सोडिले...||०||

मालवणी गजाल.

लेखक प्रतिभा बिवलकर यांनी गुरुवार, 26/02/2009 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या कणकवलेक राणे नांवाचे डॉक्टर आसत.सगळे राणे आता रावराणे नाव लावतत.ह्यो रावराणे दाक्तर ,त्याका लहानपनापासून बगीतलेलो.त्याचो बापूस कणकवलेच्या सोमवारच्या बाजारात नारळ विकत होतो.ह्यो पोरगो चांगलो शिकलो.मुंबईक इलो. एमबीबीएस झालो. गांवात इलो.एक दवाखानो थाटल्यान.दोन वर्षात तीन मजली दवाखानो घातल्यान. झाला काय? मी आता सत्तर वर्षाचो..मे महिन्यातसगळ्या कुटुंबाक घेवन कणकवल्येक गेलय.आंबे खाल्लय.गरे खाल्लय,काजूगर,काजू खाल्लय.पोटात चावरी वाटाक लागली.सगळी म्हणाली.तुमी रावराणे डॉक्टराकडे जावा.मी गेलंय. डॉक्टरान पाच दिवसांचा औषध दिल्यानी.सगळा औषध घेतलंय पण चावरी कमी नाय.तीन इंजीक्शना झाली. तरी फरक नय.