जागतिक महिला दिन..अन् बिच्चारे पुरुष ! :(
जागतिक महिला दिन आला की, स्त्रियांच्या प्रश्नांची,समस्यांची, त्यांच्या प्रगतीची मांडामांड सुरु होते.मग काही तक्ते,संशोधन, निष्कर्षे आणि त्या स्थितीतून स्त्री बाहेर यावी यासाठीच्या नियोजनांची चर्चा होते. ती चांगलीच गोष्ट. स्त्रीची अधिक प्रगती व्हावी याबद्दल शंकाच नाही पण तिचा पहिला प्रश्न असतो की पुरुषांच्या जोखडातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. तिला पुरुषांइतकेच स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. लग्न हा मूर्खपणाचा कळस आहे, पुरुषांनी स्त्रियांवर कायमची मालकी हक्क गाजवण्याचा तो एक कट आहे.
मिसळपाव