आणखी एक समुपदेशन
लेखनप्रकार
http://www.misalpav.com/node/6371
http://www.misalpav.com/node/6418
गेल्या आठवड्यात मंदी आणि जागतीक मंदीचा सर्वसामांन्यांवर होणारा परीणाम याची बरीच चर्चा आपण सगळ्यांनी केली.प्रभू सरांनी एक प्रातिनीधीक स्वरुपाचे उदाहरण दिले होते.समस्या मला समजली ती अशी होती.
पुढच्या दोन वर्षात आणि त्यानंतर येणार्या साधारण दोन वर्षात येणार्या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद कशी करायची.?
मी वर उल्लेख केलेल्या चर्चाप्रस्तावाच्या आणि त्यात आलेल्या प्रतीसादाच्या आधाराने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे.
१ :आता लक्षात घ्या की मंदी आहे हे खरं आहे ,येते आहे हे खरं आहे पण ती एका रात्रीत अंगावर कोसळणार नाही आहे.
मंदी हळूहळू पकड घेते. चड्डीचे इलास्टीक एका दिवसात ढिलं पडत नाही तसंच कुठल्याही आर्थीक परीस्थीतीचं असतं.येणार्या दिवसाचे संकेत बरेच दिवस आधी मिळत असतात.त्यासाठी आवश्यकता असते ती प्रोऍक्टीव्ह उपचाराची.आततायी स्वरुपाचे बदल एकाएकी करावे अशी अपेक्षा नाही.उदा:शेती करणे.घरातली गाडी टॅक्सी सारखी वापरणे /वापरायला देणे.परंतू वेळ पडल्यास काही कठोर निर्णय घेण्याची मनाची तयारी ठेवणे गरजेचे आहे.अशा वेळी बरेच जण काहीतरी करू या अशा नादात नव्या खड्ड्यात पडत असतात.उदा :मल्टीलेव्हल मार्केटींग च्या एखाद्या स्कीममध्ये सहभागी होणे.लक्षात घ्या मार्केटींग शेती करण्याइतकेच कठीण आहे.ते कौशल्य आत्मसात करायला बरीच वर्षे लागतात.तेव्हा असे निर्णय घेण्याआधी तारतम्याने विचार करावा.
तयारी करायला बराच वेळ मिळतो हे मला म्हणायचे आहे.
२ :येणारी मंदी पुढची चार वर्षंच राहील असे काहीही नाही.
कदाचीत दोन वर्षात रीव्हायवल होईल .कदाचीत पाच वर्षं लांबेल.काही गोष्टी भारतातल्या लक्षात घेतल्या तर येणारा काळा कालखंड सुसह्य होण्याची शक्यता आहे.
अ) आपला डोमेस्टीक सेव्हींगचा रेट जगात इतर देशापेक्षा जास्त आहे.
आ) आपल्या गरजा कमी खर्चाच्या आहेत.(पी.एल. ४८० चा गहू खाउन लोकसंख्येतत काही कमी नाही.ह.घ्या.)
इ)येणारे सरकार स्थिर राहीले तर आर्थीक धोरणात बरेच पॉजीटीव्ह बदल दिसून येतील.
हे बदल कशा स्वरुपाचे असतील ?
स्थिर सरकार तात्पुरत्या स्वरुपाचे बदल आणणार नाही.(ऍड हॉक मेजर्स नसतील) कायम स्वरुपी निर्णय घ्यायला वाव मिळाल्यावर कुठल्या सेक्टरमध्ये खरच आणि गुंतवणूक करायची याचा निर्णय सरकारला सहज घेता येतो.त्यामुळे अनाठायी खर्चाला कात्री लागून दरडोई उत्पन्न सावरले जाईल.
ई) इराकचे युध्द बंद झाले तर बाकीच्या देशातली मंदी आटोक्यात येईल त्याचा फायदा आपल्याला होईल.
३ :आता आपण प्रभू सरांनी दिलेल्या समस्येकडे पाहू या.बॅकेत शिल्लक : ५५००० जाव़कः महीना ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता. +१०००० घरखर्च
पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
महीना : ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता.९अजुन ५ वर्ष चालणार)
महीना: ४००० इतर खर्च (अचानकखर्च, रेल्वे पास एखादी बियर वगैरे)
बचतः महीना २ हजार
येते दोन वर्षातले जादा बोझः ११वी १२ वी सायन्स साठी महीना ५०००/-
इंजीनीयरींगला ऍडमिशन मिळाल्यावरचा वाढीव खर्च दोन वर्षानंतर महीना ९०००/-
१) ८००० घराचा इ.एम.आय + ७००० गाडीचा हफ्ता.+ ३००० फ्लॅट फर्निचर करता घेतलेल्या कर्जाचा हफ्ता = एकूण १८००० रुपये कर्जफेडीपोटी जात आहेत.
यापैकी प्रत्येक कर्ज रीस्ट्रक्चर करावे.कर्जाची मुदत वाढवून घ्यावी. परीणामी कर्जफेडीचे वर्षं वाढली तरी ताबडतोब कॅशफ्लो वाढेल.भारतात बर्याचशा सरकारी बँका हा बदल करण्यास नाखूष असतात.ह्याचे मुख्य कारण म्हणजे बँकात हे करायला वेळ जातो.परंतू एकदा अकाउंट एन.पी.ए. झाल्यावर (नॉन परफॉर्मींग ऍसेट) बदल करणे जास्त कठीण होते.हा बदल केल्यावर कॅशफ्लो साधारण सात ते आठ हजारानी वाढेल.म्हणजे हातात वर्षाला ऐंशी हजार शिल्लक राहतील.
२) पॉलीसी प्रिमियमः २००० (दोन लाखाची मनीबॅक) १००० (५ लाखाची टर्म) ३००० (मुलाची आणि बायकोची मिळुन सुमारे ३ लाखाची एंडावमेंट) एकंदरीत प्रिमीयम ६०००
बर्याच वाचकांनी पॉलीसी बंद करणाया सल्ला दिला आहे .त्यामुळे वर्षाकाठी बहात्तर हजार वाचतील असा होरा आहे.यात संभावना बर्याच आहेत.
अ) वेळेआधी पॉलीसी बंद केल्यामुळे विम्याचे संरक्षण मिळणार नाही.
आ) हातात पॉलीसीची डिस्काउंटेड वॅल्यु येईल.
इ) मंदी टळल्यावर पुन्हा विमा घ्यायला गेल्यास विमा मिळेलच याची खात्री नाही.(वय वाढलेले असेल.शारीरीक व्याधी वर आल्या असतील.)
आता असं बघा की पॉलीसी सरेंडर न करता कॅश फ्लो वाढवता येतो.
तो कसा ते पाहू या: पहीली पायरी: विम्यात क्लेम कन्सेशनची तरतूद आहे का याची पडताळणी करा.
क्लेम कन्सेशन म्हणजे विम्याचे हप्ते नाही भरले तरी विम्याचे संरक्षण चालू राहते.असे जर असेल तर पावणेदोन वर्षं हप्ते नाही भरले तरी चालेल.हातात वाढीव रक्क्म बहात्तर हजार रुपये.
दुसरी पायरी : हप्ते नाही भरले तरी पॉलीसीचे हप्ते जेव्हढी वर्षं भरले असतील त्या प्रमाणात विमा चालू राहतो.ह्याला पेडअप वॅल्यु असं म्हणतात.(एकूण विमा= पेडअप वेल्यु +ऍक्रुड प्रॉफीट्स)
तिसरी पायरी : पेडअप पॉलीसीच्या ९०% कर्ज कधीही मिळू शकते.हे कर्ज घेउन त्यातून एकरकमी टर्म इन्शुरन्स घ्यावा.बाकीच्या पैशातून विज, सोसायटी, गॅस ,टेलीफोन यांची वर्षभराची तरतूद एकरकमी भरावी.फायदा सहा ते सात टक्के.(मानसीक ताण १०० % दूर राहतील.) विमा कंपन्या पसिशाचा तगादा करत नाहीत .व्याज वेळेवर भरावे.अन्यथा फोरक्लोजर होऊ शकते.
३) गाडी काढून टाकावी का ?
जर घसारा पूर्णपणे वापरला असेल तर गाडी विकायला हरकत नाही.घरात वृध्द माणसे आहेत की नाहीत याचा उल्लेख नाही.राहण्याची जागा शहरापासून दूर असेल तर गाडी अत्यावश्यकही असेल.
गाडी भाड्यानी लावणे ही मोठ्ठी चूक ठरेल.खाजगी गाडी टॅक्सी म्हणून वापरायची झाल्यास परमीटचा वाढीव खर्च येतो.गाडीच्या इन्शुरन्सच्या काँट्रॅक्टचे उल्लंघन होईल ते वेगळेच.
४) ह्या सदगृहस्थांच्या प्लॅनींग मध्ये एक मोठी कमतरता आहे ती म्हणजे मेडीक्लेमचा
अभाव.मेडीक्लेम अत्यंत आवश्यक असतानाही(आधीचा अनुभव पदरात असताना )
थोडक्यात काय तर रीस्ट्रक्चरींग केले तर वाढीव कॅश फ्लो तर एंजीनीअरींग शिक्षणाचा खर्च भरून काढेल.
५) बॅकेतले पंचावन हजार हाताशीअसलेले बरे पण ते मुदतबंद करावे. वार्षीक रुपये दोनशे पन्नास भरून बर्याच बँका एक लाखाचा जीवन विमा देतात.मेडीक्लेम बँकेच्या स्किम मधून घेतल्यास स्वस्त पडेल.
हे सगळे बदल घडवून आणले आणि काही बदल जर नाही केले तर या नियोजनाचा काही फायदा होणार नाही.
जीवनमानात बदल घडवून आणणे ऐच्छीक आहे पण ते सक्तीचे होण्याआधी करावे.जीवनमान प्रिमीयम एंडचे असेल तर त्यात काटछाट करावी लागेल.पहेल्या दर्जाचा पास दुसर्या दर्जाचा करावा असे मी नाही म्हणणार कारण त्याचा कार्यालयीन कामावर परीणाम होतो.(मुंबईत)मिशा कापून मुडदा हलका होत नाही हे पण आहेच.
मनोरंजनासाठी एटीफाईव्ह टू वन सिक्स्टीफाईव्ह असा फरक करावा.पहीला पेगचा रेट आहे तर दुसरा क्वार्टर सिस्टीमचा आहे.(ह.घ्या.)
थोडेसे शेतीसंबंधी :महसूल खात्याच्या नियमाप्रमाणे शेतजमीन फक्त शेतकर्याला घेता येते.शेतकरी होण्याचे प्रमाणपत्र कलेक्टर देऊ शकतात.खर्च आहे.ह्यात एक प्रयोग मी करून पाहीला होता.शेती करायची जमीन विकत न घेता वार्षीक भाड्यानी घेतली. त्यात तुळशीची लागवड केली.तुळस ढोरं खात नाहीत. किड कमी पडते. वर्षभर विकली जाते.साप्ताहीक रजेला मित्रांसोबत जायला एक कारण मिळते.
मंदीच्या काळात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुढत न बसता आपले नातेवाईक ,मित्रपरीवार
यांच्या कायम संपर्कात रहावे.विचाराची देवाणघेवाण करीत रहावे.तोपर्यंत तेजीची सकाळ येतेच येते.
वाचने
6160
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
रामदासजी
संपुर्ण
अत्यंत
सल्ला
उत्तम सल्ला
In reply to उत्तम सल्ला by सुनील
परतफेड
_/\_
उत्तम
चांगले समुपदेशन सर
In reply to चांगले समुपदेशन सर by सहज
+१
In reply to चांगले समुपदेशन सर by सहज
1+|
In reply to चांगले समुपदेशन सर by सहज
1+|
In reply to चांगले समुपदेशन सर by सहज
फ्लेक्सीबीलिटी बाय डिफॉल्ट
जबरदस्त!!!
शेतिचे प्रयोग
विमा पॉलिस्या!
रामभाऊ, उत्
In reply to रामभाऊ, उत् by विसोबा खेचर
लग्न
This is to certify that Shri. रामदास, टवाळ नाहीत
In reply to This is to certify that Shri. रामदास, टवाळ नाहीत by chipatakhdumdum
कुशल खेळाडू