Skip to main content

जागतिक महिला दिन..अन् बिच्चारे पुरुष ! :(

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी शनिवार, 07/03/2009 21:35 या दिवशी प्रकाशित केले.

               जागतिक महिला दिन आला की, स्त्रियांच्या प्रश्नांची,समस्यांची, त्यांच्या प्रगतीची मांडामांड सुरु होते.मग काही तक्ते,संशोधन, निष्कर्षे आणि त्या स्थितीतून स्त्री बाहेर यावी यासाठीच्या नियोजनांची चर्चा होते. ती चांगलीच गोष्ट. स्त्रीची अधिक प्रगती व्हावी याबद्दल शंकाच नाही पण तिचा पहिला प्रश्न असतो की पुरुषांच्या जोखडातून स्त्री मुक्त झाली पाहिजे. तिला पुरुषांइतकेच स्वतंत्र स्थान मिळाले पाहिजे. लग्न हा मूर्खपणाचा कळस आहे, पुरुषांनी स्त्रियांवर कायमची मालकी हक्क गाजवण्याचा तो एक कट आहे.

कैरीचे रायते

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 07/03/2009 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
ही पा.क्रु. माझ्या आजी कडून मी शिकले मी, अनेक वेळा केली पण तिच्या हाताची चव नाही आली कधी मी केलेल्या रायत्याला. बेळ्गाव , कर्नाटक या भागात करतात असे रायते. तशी थोडी त्रासदायक आहे. पण म्हणतात ना, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर, तसंच जर चवीचे खायचे असेल तर थोडे कष्ट ही घ्यायला हवेत. २ कच्च्या (कडक हव्या, मऊ नकोत.) कै-या, १ वाटी भाजलेल्या दाण्याचे बारीक कूट, ५ ते ७ हिरव्या मिरच्या, बुटुक भर चिंच, चवी पुरता गूळ, मीठ, फोडणी करीता तेल, मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्याची पाने ८ ते १० प्रथम कै-या कुकर मधे २ ते ३ शिट्ट्या करून उकडून घ्या. कै-या गार झाल्या की साली, गर वेगळा करा.

उपवासाचा बेत!

लेखक मिना भास्कर यांनी शनिवार, 07/03/2009 20:46 या दिवशी प्रकाशित केले.
वरइचा भात :) १ वाटी वरईचे तांदूळ, ३ ते ४ हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ चवी पुरते, फोडणी साठी तुप प्रथम वरईचे तांदूळ निवडून , धुवून घ्या. एका पातेल्यात २ ते ३ चमचे तुप टाका, गरम झाल्या वर जिरे, हिरव्या मिरच्या बारीक चिरून टाका. नंतर धुतलेले वरईचे तांदूळ टाकून छान परतून घ्या. दोन वाट्या पाणी टाका. चवी नुसार मीठ घाला. भात शिजत आला म्हणजे झाकण टाका, गॅस बंद करा. वाफेवर भात मुरू द्यात.

नवीन पुस्तक

लेखक क्रान्ति यांनी शनिवार, 07/03/2009 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
नागपूरच्या श्याम पेटकर यांच ऋतूस्पर्श हे एक अत्यन्त सुन्दर निसर्गवर्णनपर लेखांच पुस्तक. ऋतू ख-या अर्थान अनुभवायचे तर ते गावाकडेच! त्या अनुभवांचा घरात बसून अनुभव देणार चित्रण लेखकान या लेखांमध्ये केल आहे. प्रत्येक लेख वाचताना आपण मनाने त्या ठिकाणी आहोत अस वाटत रहात. नुकतीच डिसेंबरमध्ये पुण्यात या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. नागपूरच्याच विजय प्रकाशनच हे नितांतसुन्दर पुस्तक संग्रही असावच अस आहे. "वसन्त भुलीला भुलून शिशिरात निमूटपणे गळून पडणा-या पानांना...." लेखकान हे पुस्तक अर्पण केल आहे. एकदा तरी वाचाव आणि पुन्हा पुन्हा वाचतच रहाव अस अप्रतिम पुस्तक आहे.

नोकरी करणारी स्त्री किंवा व्यवसायात नवर्‍याला मदत करणारी स्त्रीचे खरोखरच स्वतंत्र आहे.

लेखक चटपटीत यांनी शनिवार, 07/03/2009 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या महिला दिन म्हणून सगळीकडे साजरा होणार पण खरेच आज ती स्वतंत्र आहे. तिचे माहेर खुप श्रीमंत नाही पण खाउन पिउन सुखी. चार बहीणी लग्न होउन चांगल्या घरी गेल्या. आई नाही ती पहील्या वेळेस गरोदर असताना नवव्या महिना चालू असताना अचानक गेली. लग्न झाल्यावर एक वर्ष व्यवस्थित गेले. तिचा नवर्‍याचा कॉम्प्युटर व्यवसाय ती पण त्यात त्याला मदत करती . दोघांचा प्रेम विवाह आई वडिलांच्या समंतीने झाला. एकाच जातीचे असल्याने बरेच रीतीरिवाज एक. तिचे सासरचे तीन मजली घर शिवाय भावासारखे दोन दिर. त्यांची लग्ने होवून ती परगावी असतात.

आवडलेले पुस्तक...फॉर हिअर ऑर टु गो

लेखक भडकमकर मास्तर यांनी शनिवार, 07/03/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ॊर हिअर ऒर टु गो लेखिका अपर्णा वेलणकर मेहता प्रकाशन पृष्ठ संख्या २८६ http://kharedi.maayboli.com/shop/product.php?printable=Y&productid=16335 या पुस्तकाला नुकताच एक पुरस्कार मिळाल्याची बातमी वाचली... अमेरिकेवरचे पुस्तक म्हणजे काही ठराविक कल्पना मनात घेऊन वाचायला सुरुवात केली होती. पण हे पुस्तक वेगळे आहे. हे एक टिपिकल ठराविक प्रवासवर्णन नाही.... ( अबब, केवढ्या त्या उंच इमारती अन केवढे ते गुळगुळीत रस्ते...

केनेडी स्पेस सेंटर, फ्लोरीडा

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 07/03/2009 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
मागील वर्षी ह्याच काळात फ्लोरीडाला एका संमेलनाला जायचा योग आला होता. फ्लोरीडा ह्याभूभागाचे वैशिष्ठ्य म्हणजे, भारताच्या अक्षांश/रेखांशाच्या अगदी मागच्या बाजूला तो येतो. फ्लोरीडाला उतरतांना तेथील मुख्य भूभागापासून विलग झालेली एका पट्टीसारखी भूरचना दिसते.

आणखी एक समुपदेशन

लेखक रामदास यांनी शनिवार, 07/03/2009 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/6371 http://www.misalpav.com/node/6418 गेल्या आठवड्यात मंदी आणि जागतीक मंदीचा सर्वसामांन्यांवर होणारा परीणाम याची बरीच चर्चा आपण सगळ्यांनी केली.प्रभू सरांनी एक प्रातिनीधीक स्वरुपाचे उदाहरण दिले होते.समस्या मला समजली ती अशी होती. पुढच्या दोन वर्षात आणि त्यानंतर येणार्‍या साधारण दोन वर्षात येणार्‍या मुलाच्या शिक्षणाच्या खर्चाची तरतूद कशी करायची.? मी वर उल्लेख केलेल्या चर्चाप्रस्तावाच्या आणि त्यात आलेल्या प्रतीसादाच्या आधाराने माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. १ :आत

निवडाव तरि कोनाला??

लेखक आपलाभाउ यांनी शनिवार, 07/03/2009 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,आता निवडनुका जाहिर झाल्या,पन आपन मत तरि कोनाला देनार????????? "धर्म निरपेक्ष "म्हनुन फुट पाडनाय्रा कोग्रेस ला.................... का निवडनुका आल्यावर "राम "म्हननार्या भाजप ला........................ का ४० वरशा पासुन "मराटी "च्या मुद्यावरुन आपल्यालाच खानाय्रा शिवसेनेला....................... का शेति सोडुन " क्रिकेट" बघनाय्रा रा.कोग्रेस ला.................... का शिवसेनेचि जुनि दारु नव्या लेबल खालि विकनाय्रा मं. न्.से. ला............................ प्रतिक्रिया नक्कि लिहा.........बघु उद्याचा भारत काय विचार करतो....... कळावे.......आपला नम्र आपलाभाउ

क्षण

लेखक जागु यांनी शनिवार, 07/03/2009 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
क्षण क्षण जगावे आयुष्य हे वसूल करावे जीवनात क्षण समजू नका प्रत्येक क्षणात आहे जीवन सुखाचे क्षण, दु:खाचे क्षण सुखात आनंदे डुंबायचे दु:खातही तितकेच रमायचे क्षण असतात प्रेमाचे, विरहाचे प्रेम क्षणात साठवायचे विरहात त्यांना स्मरायचे क्षण हे मौजेचे, कंटाळ्याचे मौजेमध्ये उधळायचे कंटाळ्याला सावरायचे क्षण असतात रागाचे, लोभाचे रागामध्ये जळायचे लोभामध्ये साधायचे क्षण असतात रुसण्याचे, मनण्याचे रुसताना तट्ट फुगायचे मनताना थोडे आखूडच व्हायचे क्षण असतात कष्टाचे, विसाव्याचे कष्ट करत धगधगायचे विसावा घेत शांत व्हायचे.
Taxonomy upgrade extras