Skip to main content

धर्म

लेखक चेतन१२३प यांनी रविवार, 08/03/2009 23:02 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म! बाजारातुन भाजी घेऊन ये लवकर. पावशेरच आण. हे घे पैसे. उठ बघु लवकर." आईच्या बोलण्याने धर्म लेख अर्धवट सोडुन उठला. आईने टेबलवर ठेवलेले पैसे आणि पिशवी घेऊन तो घरातून खाली मान घालूनच बाहेर पडला. काही वेळापुर्वीच तो कॉलेजमधुन परत आला होता. कॉलेजमध्ये आज परत त्याचा सर्वांनी अपमान केला होता. तो सहन न झाल्याने धर्माने दु:खाश्रु ढाळले होते. माझ्या आयुष्यातच हे सर्व का घडतं? हा प्रश्न त्याला पडला होता. अल्पभाषी असणाऱ्या त्याला पदोपदी अवमान सहन करावा लागत होता. शरीराने क्रुश म्हणुन सगळॆ त्याला सुपरमॅन म्हणत. आजतर संपुर्ण वर्गासमोर एका मुलीने त्याला सुपरमॅन म्हणुन हिनवले होते.

मराठी सिनेमा

लेखक चेतन१२३प यांनी रविवार, 08/03/2009 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!! क्रुपया एखादी अशी साइट सुचवा जेथे मराठी मोव्हिचे "टॉरंट" मिळु शकेल. तसेच शक्य असल्यास अतिशय विनोदी असलेल्या नविन मराठी मोव्हिचे नावही सुचवा........

चिकन बिर्याणी स्टेप बाय स्टेप....

लेखक गणपा यांनी रविवार, 08/03/2009 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज परत रैवार, कोंबडीचा घातवार . लवंगीतै नी शोनुतैंनी दोन कोंबड्या आधीच कापलेल्या हैत. आम्ची बी एक गोड मानुन घ्या. कच्चा माल : १ कोंबडी, ३ कप बासमती तांदुळ (१०-१५ मिनिट भिजवलेला), गरम पाणी (तांदळाच्या दुप्पट). प्रत्येकी २ चमचे हळद, मससाला/लाल तिखट, आल पेस्ट, लसुण पेस्ट, २ मोठ्ठे कांदे लांब उभे कापुन. खडा मसाला, जो मिलळेल तो. (माझ्याकडे दालचीनी , काळीमिरी, चक्रीफुल इतकच होत.) ३ चमचे बिर्यानी मसाला.

टोपण नांवे

लेखक अरुण वडुलेकर यांनी रविवार, 08/03/2009 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावर किंवा अन्यत्रही लेखन करणारे टोपण नांवाने कां लिहितात?

मी

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 08/03/2009 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी मुक्त तरीही बन्धनात मी फुलाफुलाच्या स्पन्दनात मी मंद ज्योत ती मीच तेवती, विरघळणा-या चन्दनात मी कधी मीरेची एकतारी मी कधी राधेच्या मन्थनात मी वससी माझ्या अंतरात तू, अविरत तुझिया चिंतनात मी कळी पाकळी फुलवित जाते जणु भ्रमराच्या गुन्जनात मी पारिजातकापरी शिंपिले सौख्य तुझ्या रे अंगणात मी तुझ्या प्रीतीचा चन्द्र जडविला नक्षत्रांच्या कोंदणात मी भाग्यदैवता, तुलाच जपले भाळावरच्या गोंदणात मी! महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Taxonomy upgrade extras

समाजस्वास्थ्य

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी रविवार, 08/03/2009 14:30 या दिवशी प्रकाशित केले.
समाजात काही उपक्रम चालु असतात. काही बंद पडतात काहींचे पुनरुज्जीवन होते. अशाच एका उपक्रमाची माहिती देत आहे. समाजस्वास्थ्य या नुकत्याच चालू झालेल्या ट्रस्टचा मी हितचिंतक आहे. माझे मित्र डॉ प्रदीप पाटील या समाजस्वास्थ्य द्वैमासिकाचे संपादक आहेत. काही सुचना असल्यास स्वागतार्ह आहेत. माझ्यापर्यंत पोहोचवल्यास मी त्या ट्रस्टला पोहोचवीन.
समाज स्वास्थ्य
मानव समुहात राहतो. समाज घडवतो. समाज टिकवतो. समाज टिकवताना तो अनेक प्रश्नांना तोंड देत जगतो. त्या त्या प्रश्नांची सोडवणुक करताना आचार- नीती नियम -संस्कृती उदयास येतात.

बिन्धास प्या!

लेखक सहज यांनी रविवार, 08/03/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ प्रेरणा गोखलेसाहेबांची सुरेख कविता व गुत्यातील सहपेताडांनी असेच चढवले म्हणून मी प्यायला घाबरत नाही बिन्धास्त पितो..! चढली मला जास्ती, तर खुशाल लटपटतो..! लुडकणे आहे तसा, प्राणिजात स्वभाव सोबर रहावे वाटणे हा खोटा अहंभाव विदेशातली पिण्यासाठी असते अपुली धडपड त्यात झाली भाववाढ तर वाढते कि हो तडफड असेल जर हे खरे तर कशास लाजायचे मिळाली पहिल्या धारेची तरच व्होट द्यायचे घोट घेता हळुहळू डोळे मिटुन घेतो मावळताच रविराजा मी फुल्ल आउट होतो सुर्याने मावळावे म्या पामराने लुडकावे याला काय गड्यानो, कोणी पाप म्हणावे..
Taxonomy upgrade extras

लोकसभा निवडणुका २००९: पूर्व भारतातील परिस्थितीविषयी माझा अंदाज

लेखक क्लिंटन यांनी रविवार, 08/03/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसभा निवडणुकांच्या अंदाजाच्या चौथ्या आणि शेवटच्या भागात वळू या पूर्व भारताकडे.या लेखात मी पुढील राज्यांविषयी लिहिणार आहे-- बिहार, झारखंड, छत्तीसगड,ओरीसा,पश्चिम बंगाल आणि आसाम. पूर्वोत्तर भारतातील इतर लहान राज्यांविषयी मला जेवढे माहित आहे त्या आधारावर लिहितो. १) बिहार राज्यात एकूण जागा ४० आहेत. राज्यात नितीशकुमारांचा जनता दल (संयुक्त)-भाजप युती विरूध्द लालूंचा राष्ट्रीय जनता दल-काँग्रेस युती विरूध्द पासवानांचा लोक जनशक्ती असा तिहेरी सामना रंगेल. पासवान निवडणुकीसाठी यु.पी.ए. बरोबर जाणार की नाही हे १००% स्पष्ट नाही.

पुस्तक परिचय -"काबूल इन विंटर"

लेखक विंजिनेर यांनी रविवार, 08/03/2009 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
"मी अफगाणिस्तानात आले ते बाँबहल्ले थांबल्यानंतर लगेचच... ११ सप्टेंबरच्या हल्ल्यानंतर मी सुन्न झाले होते. (अमेरिकन सामर्थ्याची जणु प्रतिकं असणार्‍या) वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या इमारती जमीनदोस्त झाल्यावर आलेलं हरवलेपण मनात घर करून बसलं होतं. ... जॉर्ज बुशच्या सरकारने ह्या हल्ल्यावरचा उपाय म्हणजे हजारो मैल दूर असलेल्या, अनेक दशकांच्या युद्धांनी उध्वस्त झालेल्या एका अफगाणिस्तान नावाच्या देशावर हल्ला करणं हाच आहे असं जेव्हा जाहिर केलं, तेव्हा मात्र त्या मुजोरी बादरायण संबधाने माझ्या मनातल्या भीतीची जागा संतापाने घेतली...