ऊन हळदीचे आले.....
ऊन हळदीचे आले.....
मे महिन्यातली दुपार. कामानिमित्त डेक्कनला जायचं होतं. ऊन नुसते मी (खरंतर आम्ही!) म्हणत होते. कमी गर्दी म्हणून कर्वे रोड ऐवजी प्रभात रोडने निघालो. उन्हाने जीव हैराण झाला होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. थंडगार नीरा प्यावी असा विचार आला... आणि अचानक तो दिसला!!! सगळे विसरून मी पहातच राहिलो. उन्हाच्या तडाख्याचा विसर पडला. दुपारचा तीव्र सूर्यप्रकाश पिवळ्या फुलातून खाली पडेपर्यंत कोवळा होऊन जात होता. झाडाखालची जमीन तर पिवळी धमक झाली होती. वाहवा! हाच तो राजवृक्ष बहावा. फुलांनी गच्च बहरून आलेला बहावा पाहून मन अगदी मोहरून गेलं.
मिसळपाव