Skip to main content

काही रेखाटने...

लेखक पल्लवी यांनी शनिवार, 21/03/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
Hee paahataach baalaa Aai Left Hand Of Hitler : Priller J ***सगळी चित्रं कुठून वा कुठून कॉपी केलेली आहेत...सध्या फक्त बघुन काढायचा प्रयत्न..***

मी एक व्यसनी..

लेखक योगी९०० यांनी शनिवार, 21/03/2009 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
सहज मनात आले. मि.पा. शी गट्टी होण्याआधीचा माझा दिनक्रम कसा होता आणि मि.पा. नंतरचा कसा आहे ह्यावर लिहायचे ..( हं म्हणजे शादीसे पहले आणि शादी के बाद या चालीवर ) आधी एका इतर मराठी संकेतस्थळावरचे लेख वाचायचो. तसे ३/४ दिवसातून एकदा ते स्थळ उघडायचो आणि जे जे काही नवे लेख आहेत ते वाचायचो, प्रतिक्रिया द्यायचो. कधीही स्वतः एक म्हणून लेख लिहीला नाही. लोकं प्रतिक्रिया देणार नाहीत असे वाटले. तसेच मराठी टंकायचा कंटाळा आणि शुद्ध लिहायची (एकही इंग्रजी शब्द नको) धास्ती. त्यामुळे त्या स्थळाशी जेमतेम ओळख झाली. पुर्वी माझा दिनक्रम असा असायचा... (मि.पा.

माणुस का प्राणी

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 21/03/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
Humans are nonsense. The problem with the humans is that they have a functional brain which thinks beyond eating, sleeping and mating unlike animals. And any thing that is functional will have its own dysfunction. घरातील माणसाकडुन अत्याचारीत मुलीच्या त्रासाला बघुन खंतावलेल्या आणि उदास झालेल्या मला साहेबांनी धीर दीला होता. साल १९७८. माणुस हा मुळात एक प्राणीच. पण प्राण्यात कुठे बलात्कार होतात. तीथे तर उलट मादी ला आपला साथीदार निवडण्याचा हक्क असतो. अपंग शाळेतील मुलींवर शिक्षकांच्या बलात्काराला काय म्हणावे?

चित्कला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शनिवार, 21/03/2009 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आदिमाया ती आदिशक्ती स्वयें चित्कला मायमुक्ती ज्ञानराज सोपान मुक्तीचा साधन ते अवघे निवृत्ती मन मारुनी उन्मन करावे ज्ञानराया शिकवली युक्ती त्याग मायेचा मार्ग प्रभुचा मिटविली चांग्याची भ्रांती अहं नाम्याचा कच्चे मडके गोरा म्हणे ती स्वयं भक्ती क्लेश साहुनी क्षमा करावी मुक्ती म्हणे मग मिळे शांती नभात तेजें ज्योत उजळली माय चित्कला मुक्त जाहली विशाल

माझं थोबाड... भाग- ०

लेखक दशानन यांनी शनिवार, 21/03/2009 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
" एकदम आपल्या आजोबांवर गेलं आहे नाही बाळ, त्यांच्या सारखच नाक, त्याच्या सारखेच डोळे" - मावशी म्हणाली, मी जेव्हा जन्मलो तेव्हा. (हे परवा परवा मावशीने सांगितले व खालील मामाचा पण संवाद.) " कार्ट, एकदम बाबाच्या वळणावर गेलं आहे, केसं बघ कशी आहेत ह्याची उंदरा सारखी, वसावसा अंगावर येतो, नाही जमनार, ह्याचं व माझं नाही जमणार कधी " मामा.

जिंकला रे जिंकला !

लेखक दशानन यांनी शनिवार, 21/03/2009 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
भारताने न्युझीलंडचा दहा गडी राखून पहिल्या टेस्ट मध्ये विजय मिळवला ! जवळ जवळ ३३ वर्षानंतर भारत न्युझींलंड मध्ये टेस्ट मॅच जिंकला आहे ! सचिनच्या १६० धावांची खेळीने व हरभजनच्या फिरकी मुळे हा मोठा विजय भारतला मिळाला ! पुढील दोन्ही टेस्ट जिंकुन भारताने न्युझीलंडचा सुफडा साफ करावा ही आशा !!! जय हो !!