Skip to main content

तू पुन्हा केव्हा जरी...!

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 25/03/2009 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णींची सुरेख गझल तू म्हणे केव्हातरी...! ........................................... तू पुन्हा केव्हा जरी...! ........................................... ... आज मज थोडी उशीराने सकाळी जाग आली! कालच्या रात्री जराशी वारुणी मी जास्त प्याली! रोज मी माझ्या मनाला सांगतो की आज नाही... आणि संध्याकाळ होता बारची मी वाट चाली! चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा... प्रश्न बापाने तिच्या हा टाकला होता निकाली!

"मिसळपाव" - काही सूचना (अधिक सदस्योपयोगी होण्यासाठी...)

लेखक वाचक यांनी मंगळवार, 24/03/2009 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सुहृदहो... माझा बराच वेळ मिपा वाचण्यात जातो. मला खात्री आहे इतरांचा ही जात असणार. त्या वेळाचा जास्तीतजास्त इफेक्टीव्हली वापर व्हावा म्हणून हा काथ्याकूट ! कुठल्याही संकेतस्थळावर, विशेषतः जे नियमित अद्ययावत होत रहाते, त्यावर सर्वात महत्त्वाची माहिती ताबडतोब मिळावी असा उद्देश, प्रयत्न असतो. मिपाही त्याला अपवाद का असावे ? संस्थळावर येणार्‍या वाचकांचे दोन गट - एक नियमित आणि दुसरे (क्वचित किंवा) प्रथमच येणारे. (त्यातही वाचनमात्र असलेले) ह्या दोघांना उपयोगी पडतील अशा गोष्टी मुख्यपॄष्ठावर असाव्यात अशी अपेक्षा.

शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही?

लेखक अजय भागवत यांनी मंगळवार, 24/03/2009 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
शाळांमधे क्रियेटीव्हीटी जोपासली जात नाही? ही २० मिनिटांची फित मुलांच्या क्रियेटीव्हीटी क्षमतेबद्द्ल अनेक चांगले मुद्दे मांडते. ज्या खुस्खुशीत लयीने श्री.

प्रतिक्षा.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 24/03/2009 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिक्षा.....! प्रतिक्षेत सखे तुझ्या.. कसे मन.. सैरभैर झाले.... ओठांवर मग.. तव विरहाचे.. आर्त गीत उमटले... नकळत होई भास पुन्हा ग... तव स्पर्शाचा क्षणोक्षणी.... मंद चंदनी गंध तुझा मज... लावी पिसे ग.. मनोमनी.. आतुर तव भेटीला नभ.. मृग थेंब बनुनी बिलगले.. ओठांवर मग ....... [१] वाटे मजला सौधामध्ये... असशील बहुधा तु अजुनी... वळूनी बघता होई हसे.. मज चंद्र खुणावे..तो गगनी... त्या बिंबातुन तव प्रतिमेचे... रुप निशी प्रकटले... ओठांवर मग .......[२] रेशीमस्पर्शी मीठीत तुझीया...वाटे मज मी.. स्वर्गी असे.. तुझ्या नि माझ्या प्रीतिचे गे... सुंदर घरकुल मनी वसे.. परि ना कळले..
Taxonomy upgrade extras

सूर भैरवीचे

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 24/03/2009 19:42 या दिवशी प्रकाशित केले.
मज छेडती अवेळी ते सूर भैरवीचे करती अगम्य खेळी ते सूर भैरवीचे भिजुनी तुझ्या स्मृतिंनी माझ्या मनात ओली ती रात्र पावसाळी अन् सूर भैरवीचे भुलवून या मनाला मज दूर दूर नेती हलकेच सांजवेळी ते सूर भैरवीचे माझ्या मनातली मी गीते दिली तरीही गाती तुझ्याच ओळी ते सूर भैरवीचे स्वप्नात साद देते मज पैलतिरी इवले घर एक चंद्रमौळी अन् सूर भैरवीचे घननीळ सावळ्याची ती पावरी घुमावी श्रवणात अंतकाळी, जणु सूर भैरवीचे
Taxonomy upgrade extras

(सगळ्यांसाठी..)

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 24/03/2009 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
अवलिया साहेबांच्या गंभीर कवितेमुळे काही सुचेनासे झाले मग हा गंभीर्पणा दुर करण्यासाठीच हे विडंबन अवलिया साहेब.

वारा

लेखक विनायक पाचलग यांनी मंगळवार, 24/03/2009 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स............ हाय, मी वारा मला ओळखले नाही, हा कसे ओळखणार बरे! बरेच दिवस भेटच नाही आपली. अहो तुम्ही ५ वर्षाने आलेल्या राजकारण्याला ओळखू शकत नाही तसे मला तरी कसे ओळखणार... अगोदर मी अदृश्य त्यात मी काय कोणत्या पोस्टर वरून वगैरे पण दर्शन देत नाही त्यामुळे मला ओळखायचा प्रश्न येत नाही,....................... हा आता बघा आता ओळखलंत ना , हा एवढे बोचत आहे म्हटल्यावर ओळखणारच. हा तोच तो तुम्हाला बोचणारा मी वारा.. काय पण दिवस आलेत मला माझी ओळख सांगायला तुम्हाला त्रास द्यावा लागतोय..

खंत

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 24/03/2009 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
बोलली नाहीस कधी न सांगताच पण काही मज उमजली होती सखे तगमग अलवार तूझी मिटल्यास पापण्या तू पण रुद्ध डोळ्यांमधली मज जाणवली होती आतुरता व्याकुळ तूझी मिटलेल्या ओष्ठकळ्या कबुलणार नाहीस तू सखे ओळखली होती मुग्ध हळवी प्रीत तूझी वृंदावन डोळ्यांमधले तू गं राधा कृष्णमयी गोकुळात विरघली होती मुक नि:शब्द वेदना तूझी विषप्याला अमृत झाला श्यामखुळी तू वेडी मीरा कृष्णात मिसळली होती स्निग्ध शांत चेतना तूझी मज कळली नाही कशी खुण आपल्या नात्याची सखे मीच हरवली होती धुंद ओढाळ मुरली माझी विशाल

प्रादेशिक पक्षांचे पीक आवरण्यासाठी

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/03/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
देशात गेल्या काही वर्षांत प्रादेशिक पक्षांचे वाढते वर्चस्व राष्ट्रीय पातळीवर फार अडचणीचे ठरत आहे. लोकसभेसारख्या राष्ट्रीय निवडणुकीत स्थानिक मुद्दे महत्त्वाचे ठरून हे पक्ष राष्ट्रीय पक्षांवर मात करून लोकसभेत पोहोचत आहेत. बरे लोकसभेत येऊनही ही मंडळी ज्या मुद्यांवर निवडून आली, ते सोडवितात असेही नाही. पण ते मुद्दे उपस्थित करून हंगामा करण्याचे काम मात्र करतात. (याचा अर्थ ते मुद्दे महत्त्वाचे नसतात, असे नाही.) ५४३ सदस्यांच्या आपल्या लोकसभेत बहूमताचा जादुई आकडा गाठण्याच्या नादात या पक्ष्यांना भलतेच महत्त्व येऊन घोडेबाजार तेजीत येतो. मग एक दोन खासदार असलेल्या पक्षांनाही 'भाव' येतो.