Skip to main content

ताजे व उत्तम मासे कोठे मिळतील ?

लेखक मि.इंडिया यांनी शुक्रवार, 03/04/2009 13:40 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व सदस्यांना नमस्कार कोकणात कोणकोणत्या बंदरांवर ताजे व उत्तम मासे मिळतात हे कोणी सांगू शकेल का ? मी काही दिवसांपूर्वी पापलेटटचा एक ढीग लिलावात घेतला होता. असे उत्तम मासे मला पुण्यात कधीही मिळालेले नाहीत. मिपावरील जुने व जाणते मत्स्याहारी सदस्य ही माहिती पुरवू शकतील असे वाटते. प्रदीप

कशाला हवा कसबला वकील

लेखक राहुल सरकार यांनी शुक्रवार, 03/04/2009 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असणारा जीवंत आरोपी अजमल कसाब याचे वकीलपत्र घेण्यावरून सध्या वाद सुरू आहे. अंजली वाघमारेंनी त्याचे वकीलपत्र घेतल्यानंतर शिवसेना तसेच अन्य मंडळींनी त्यास तीव्र आक्षेप घेतला. मात्र हे वकीलपत्र घेण्यावर अंजली वाघणारे ठाम आहेत. कोणताही खटला न्यायालयात उभा राहण्यासाठी आरोपीला वकील असणे आवश्यक आहे. कसाबला वकील दिला नाही तर हा खटलाच उभा राहणार नाही व खटलाच उभा राहिला नाही तर कसाबला शिक्षा कशी होणार असे आपली घटना सांगते म्हणे, असा युक्तिवाद करण्यात येत आहे.

शब्द

लेखक जागु यांनी शुक्रवार, 03/04/2009 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
वाटते तुझ्यावर काही लिहावे मनातील भावनांना कागदावर निरखावे न्याहाळताना तुला, तंद्रित जावे सहवासी तुझ्या वाहवून यावे. शब्द शब्दांना जुळवून घ्यावे सुगंधी रचनी तुला हुंगावे शाईतून तुझे प्रेम पाझरावे. मखमली लालीत तुला पसरावे. वाचताना तुज ओठ हसावे डोळ्यांतून भाव पाझरावे दाखवताना तुज हे शब्द तुझ्या ओठचा शब्द व्हावे.
Taxonomy upgrade extras

नाहि बरे...

लेखक jenie यांनी शुक्रवार, 03/04/2009 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
अप्सारानी श्वापदाना भाळाणे नाही बरे.. माणसानी माणसाना टाळणे नाही बरे.. चुकवली जरी उत्तरे नशिबाने कधी.. वेदनानी वेदनाना जाळणे नाही बरे.. दाखावली 'करुणा' पारध्याने कधी.. हरिणानी पारध्याला नीहाळणे नाही बरे.. नाकारली जरी कवीता रसीकानी कधी.. अक्षरानी अक्षराना हेटाळणे नाही बरे.. ग्रिष्र्माच्या झेलुन ज्वाळा सावली झाले कधी.. श्रावणाच्या ऐनवेळीचे वागणे नाही बरे.. अज्ञाताच्या गर्दिला तु वाहतो श्रद्धांजली.. यादीत त्या नाव माझे गाळणे नाही बरे.. मेलो जरि असलो आम्ही कधी काळी .. असे सहज आम्हाला तुम्ही विसरणे नाही बरे.. स्वर्गाच्या ऐवजी नरकत गेलो आम्ही कधी .. नावाच्या अलीकडे 'स्व' लावणे नही बरे..

चौक न्हाण

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 03/04/2009 10:29 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ पहाटे साडे चार वाजता.. स्थळ : महाराष्ट्रातील / विदर्भातील/ मराठवाड्यातील कुठलेही एक घर पण या घराचं वैशिष्ठ्य असं की या घरातल्या सु(?)पुत्राचं लग्न ठरलेलं आहे. आज सकाळी त्याचा चौक न्हाणाचा कार्यक्रम आहे. चौक न्हाण म्हणजे काय ते मला वाटतं स्पष्ट करण्याची गरज नाहीये. बहुतेक मराठी माणसाला (विशेषत: विवाहित व्यक्तीला चौक न्हाण हा शब्द चांगलाच माहीत असतो.) तरीही काही अज्ञानी पुरुषांसाठी म्हणुन सांगतो. आयुष्यभर येता जाता मोठ्या भावाच्या टपल्या, बोलणी , मार, शिव्या वगैरे वगैरे खाल्लेल्या लहान बहिणींसाठी या सगळ्यांचा वचपा काढायची सुवर्णसंधी म्हणजे चौक न्हाण.

अजून एक ब्रेड पुडिंग

लेखक शोनू यांनी शुक्रवार, 03/04/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या ऑफिसजवळ एक शेरेटन आहे. आमच्या बर्‍याच मीटिंग तिथे होत असतात. कधी कधी जेवण पण तिथेच असतं. त्यांच्या जेवणात हमखास ब्रेड पुडिंग असतं अन ते एकदम 'फिंगर्लिकिंगडेलिशस' असतं. ऑफिसमधल्या दोन चार लोकांना त्यांच्या रेसिपीज विचारून , ट्रायल ऍन्ड टेरर करून शेवटी या पाककृतीपर्यंत आलंय गाडं. हे घरच्या सगळ्यांना आवडतं. एका स्टिलच्या पातेल्यात अर्धा कप साखर करपवून घ्यावी व हे करपलेले मिश्रण ( कॅरमेल ) एका ९ इंच व्यासाच्या ओव्हनप्रूफ भांड्याच्या तळाला व कडांना एक इंच पर्यंत पसरवून घ्यावे. हे गोल भांडे थोडावेळ ( ३० मिनिटे पुरतील ) फ्रीझमधे ठेवावे.

पहावं ते नवलंच..

लेखक अनामिक यांनी शुक्रवार, 03/04/2009 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका कंस्ट्रक्शन कंपनीत काम करतो, आणि थोडक्यात सांगायचे तर सध्या माझे कामाचे स्वरूप नवीन प्रोजेक्ट्स मिळवण्याकरता त्यांचे एस्टीमेट आणि प्रपोजल तयार करणे असे आहे. तर, असाच एक संभाव्य प्रोजेक्ट म्हणजे ऍटलांटा एरियात होणाऱ्या एका प्राथमिक शाळेचे रिनोवेशन. इमारतीची सद्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी सोमवारी या शाळेत गेलो होतो. शाळेभोवती चक्कर मारत असताना शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर असणारा, आणि बाहेरच्या दिशेने उघडणारा, एक दरवाजा दिसला (खालचा फोटो बघा) आणि हसतच सुटलो .... फोटो बघा तुम्हीसुद्धा हसत सुटाल... दरवाज्या बाहेर खाली उतरण्यासाठी ना जीना ना अजून काही व्यवस्था...

चारोळी पूर्ण करा

लेखक धनंजय यांनी शुक्रवार, 03/04/2009 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वीच्या कवींच्या कथांमध्ये "समस्यापूर्ती" प्रकाराच्या कथा खूप आहेत. त्यात राजा, किंवा कोणी नवा पंडित, कवितेची एक ओळ सांगतो. तिचा अर्थ इतका विचित्र असतो, की श्लोक पूर्ण करायला कोणाला जमत नाही. पण आपल्या हिरो (कालिदास वगैरे, कोणीतरी) अशी काही दुसरी ओळ सुचवतो, की पहिली बेकार ओळही अर्थपूर्ण होते.

देवानी मुलींना असं का बनवलं?

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/04/2009 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
(विडंबनाच्या विडंबनाचं विडंबन) एका (म्हातार्‍या) कवी कडून प्रेरणेतून प्रेरणा देवाने मुलींना असं का बनवलं? की बघताच ती मला आई सारखं वाटावं सगळ्याच स्त्रीया मला आई सारख्या वाटतात पण तिने कुणाही बाळाला मिठीत का घ्यावं? कुणाचे डोळे,तर कुणाचे ओठ प्रत्येकीचा काहीतरी वेगळाच गुण प्रेमळ माझं मन,नाही आई म्हणत नाही पहाताच तिला मन येतं भरून कुणी हसून आपलंसं करतं कुणी लाडावून हृदयाजवळ घेतं प्रत्येकाची खूबी निराळीच असते मग आपली आई कुठे आपलाजवळ उरते कुणी अंगाई म्हणून झोपवतं कुणी मांडीवर घेऊन शांत करतं किती तर्‍हा झोपवण्याच्या असतात मन हे वेडं प्रत्येक चेहर्‍यात फसतं सगळ्याच आया कमाल करतात नको नको म्हण
Taxonomy upgrade extras