(सहा) हजार चौरासी की मां!
तसा नेहमीचाच रविवार. सकाळी उशिरा उठल्यानंतर चहा कुणी करायचा यावरून भांड्याला भांडं (चहाच्या नव्हे!) लागलेलं. नंतर नाश्त्याला काट मारून थेट पावभाजीच्या जेवणाचाच बेत. पाव किती आणायचे, कुणी आणायचे, मीच का आणायचे, यावरून पुन्हा एक `लडिवाळ' संवाद! शेवटी घरचा कर्ता (आणि आठवडाभर नाकर्ता) पुरुष म्हणून जबाबदारी अस्मादिकांवरच! वर "फुकटचं गिळायला मिळतंय, हे नशीब समजा!' हा कृपाप्रसाद!!
झक् मारत पाव आणायला नि बाकी कचरापट्टी जमवायला बाजारात रवानगी. मग `जातोच आहेस, तर माझ्या बॅंकेतून पैसेही काढ' ही एक प्रेमाची गळ. मुंडी हलवून संमती देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही!
मिसळपाव