Skip to main content

जालिंदर महिमा

लेखक मराठमोळा यांनी शुक्रवार, 10/04/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी सगळीकडे जालिंदर बाबा चमत्कारी यांची माया (स्त्री नव्हे) नाना रुपात प्रकट होत आहे. त्यांची भक्तगण संख्या सुद्धा वाढत आहे. यापासुन मी तरी किती दिवस वंचित राहणार होतो.
Taxonomy upgrade extras

शर्यत

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:34 या दिवशी प्रकाशित केले.
आताशा तुझी काळजी वाटते मला. तु म्हणतेस की बराच शांत झालो आहे. खरे तर खुप अस्वस्थ आहे. लग्नानंतरचे १ ले वर्ष सोडले तर तु स्वःतला मुलाभोवती केंद्रीत केलेस. तुझ्या आयुष्याच्या वर्तुळाचा केंद्रबिंदु होता तो. अर्थात बाकीच्या जबाबदार्‍या पण समर्थपणे पेलल्यास. बायको, सुन, काकी, मामी, मावशी ही नाती सांभाळताना कुठेही कमी पडली नाहीस. सर्व कुटुंबात तुझा उदो उदो आहे. ही कर्तव्य पार पाडताना कुठे गुंतली नाहीस. माझ्यात सुद्धा नाही. अर्थात त्या बाबत आज माझी काहीही तक्रार नाही. फारसे सख्य नसलेल्या जावेच्या नातीत गुंतायला का लागली आहेस? तुम्ही दोघी जीवाभावाच्या मैत्रीणी कशा काय होत आहात? का चाहुल लागली आहे तुला

(बुरुंडीतला जालिंदर) - विडंबन

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 10/04/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
(आधार : दिव्यातला राक्षस ) आणखी एक जाळिंदरली मिसळपावावरती वावरतांना, जुना प्रसिद्ध दुवा मिळाला काळजीपुर्वक बघता दुव्यामधुनी जालिंदरजी हो निघाला लिही लिही लिही.... पिवळे हास्य करुन म्हणाला बोल मेरे बगलबच्चे, कोण बनवू तुला फुटकळ लेखक कधीच झालो शोधतो संस्थळात नव्या कंपुला कंपु शोधणे झाले मुश्किल 'जाज' जी, आता तुमचा हवाला बेरकी हसले, हळुच म्हणाले ले(ख)को, जुना जमाना गेला असते जर सोपे शोधणे आजकाल प्रामाणिक कंपुला गुरु तुझा हा असा असता का अफ़्रिकातील बुरुंडीत राहीला मुंबै, पुणे नाहीतर गेलाबाजार एखादा ठा

पाववाल्याचे गाणे

लेखक अमृतांजन यांनी शुक्रवार, 10/04/2009 15:40 या दिवशी प्रकाशित केले.
एक खूप गरीब माणूस सायकलवरुन पाव (ब्रेड) विकत असे. टोकाच्या गरीबीमुळे त्याच्याकडील पाव ठेवण्याची पिशवी अगदी फाटलेली असते व त्यातुन पाव जमीनीवर कधी पडून जात हे त्याला बिचाऱ्याला सायकल चालवतांना कळतही नसे. त्याची दया येऊन एकजण त्याला एक नवी कोरीकरकरीत पिशवी देतो. त्यामुळे त्यापिशवीतुन पाव घेऊन विकतांना साहजिकच त्याचे नुकसान टळते व तो खुशीत येऊन गाणे म्हणू लागतो- "आज कल पाव जमींपर नही पडते मेरे".. असे प्रसंग व त्यावरुन आधारलेली गाणी तुम्हाला माहित असतील तर सांगा!

पुढील टप्पा--IIM अहमदाबाद

लेखक क्लिंटन यांनी शुक्रवार, 10/04/2009 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मला आपणास कळवायला अत्यंत आनंद होत आहे की मला जून २००९ मध्ये सुरू होणार्‍या अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (IIM Ahmedabad) या संस्थेच्या प्रबंधनातील पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाला आहे.निकाल थोड्या वेळापूर्वी जाहिर झाला.माझा अभ्यासक्रम जून महिन्यात सुरू होईल आणि त्यापुढील दोन वर्षे चालेल.दरम्यानच्या काळात मिपावर कधी आणि किती वेळा येणे होईल हे सांगता येत नाही तरीही मिपा हेच माझे आंतरजालावरील मराठी घर असेल यात मला कसलीच शंका वाटत नाही. मी या लेखात म्हटल्याप्रमाणे चांगला निकाल लागताच मिपावर जाहिर करत आहे.

तुझे नि माझे नाते.......

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी शुक्रवार, 10/04/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुझे नि माझे नाते.. ! तुझे नि माझे नाते कसले?.. मजला उमगत नाही.. या जन्मीचे की गत जन्मीचे?.. काही समजत नाही... काय नाव मी देऊ याला? सखे तुला तरी कळेल का? गूढ-गहन प्रश्नाचे उत्तर.. सांग कधि ग मिळेल का ? अवचित एका वळणावरती.. गाठ आपुली ही पड्ली... निमिषा मध्ये क्षणाक्षणाची.. रेशीमनाती बघ जुळली.. सत्य प्रेम.. शिव ही प्रेम.. प्रेमच सुंदर आहे.. क्षणीक नश्वर जगती अंति.. प्रेमच अमर आहे.... प्रीत असे या अवनी वरती.. कोरिव सुंदर लेणे.. शिल्पी याचा ईश्वर.. हे तर.. परमेषाचे देणे... त्याच्या मर्जी शिवाय जगती.. पान ही हालत नाही.. त्याच्या इच्छेपुढ्ती आपुले..
Taxonomy upgrade extras

तुम्हाला माहिती आहेत का ही.... चिन्हे <>?:;',.

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 10/04/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला एक प्रयोग सांगतो. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांवर (म्हणजे आत्ताचे नोकरदार, व्यावसायिक, गृहीणी इत्यादी, पण पुर्वी मराठी माध्यमातुल शिकलेले सर्वजण किंवा आत्ताही मराठी माध्यमातून शिकत असणारे) प्रयत्न केल्यास प्रयोगाला हमखास यश! प्रयोग काय तर व > अशी जी दोन चिन्हे आहेत त्याबद्दल विचारायचे. प्रश्न इंग्रजीत विचारलात की काम फत्ते. म्हणजे यातले लेस दॅन कोणते व ग्रेटर दॅन कोणते? मराठी माध्यमात शिकलेल्यांना च्या पेक्षा लहान व च्यापेक्षा मोठे अशी ही चित्रे माहिती आहेत.

शाण्णवशुन्य अंकसंख्या परिमाण (मुळ पानाचे छायाचित्र टाकले आहे)

लेखक मिलिंद यांनी शुक्रवार, 10/04/2009 10:07 या दिवशी प्रकाशित केले.
खालील संख्या तुम्हाला मोजता येईल? आणी हो १००० कोटी (एक हजार कोटी) असं वापरायचं नाही तर एकच परिमाण वापरुन मोजा. १०,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००,००० मी सांगू का? वरील संख्या आहे - दशअनंत. तुम्ही म्हणाल मला कशी कळली? मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की कोटी पर्यंत मोजल्यानंतर पुढे किती पर्यंत मोजता येईल? याचे उत्तर कित्येकजण खर्व, निखर्व, अमाप अशी नांवे सांगायचे. पण यांची स्थिती (म्हणजे एकं, दहं प्रमाणे) विचारल्यास मात्र ती कोणालाही सांगता यायची नाही.

कांद्दाची भजी.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शुक्रवार, 10/04/2009 09:57 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला आपण कांद्दाची भजी म्हणतो त्याची रुचिदार चव कुणाला माहित नसेल असं वाटत नाही.एव्हडं काय आहे त्या भज्यात?असं कुणी विचारलं तर काय सांगणार?.कुणी विचारतं की ही भजी क्षुधावर्धक आहेत का?की कुणी विचारतं ही भजी खाऊन पोट भरता येतं का?