Skip to main content

प्रेम म्हणजे ..

लेखक jenie यांनी बुधवार, 15/04/2009 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम म्हणजे .. प्रेम म्हणजे जीव लावणं फुला सारखा तुझा चेहरा हातांच्या ओंजळीत घ्यावा भेटित आपल्या प्रीतीचा मधुगंध दरवळावा... तुझ्या भेटित ह्रुदयाची या पाकळी पाकळी फुलून यावी परस्परांना जीव लावणं जीवाला जीव देणं जीवात जीव आसेतोवर जीवलग राहाणं विश्वासाने हातामध्ये आपला हात देणं निर्धाराने प्रेमाची शतजन्माची साथ करणं..

संसार एक घर

लेखक जागु यांनी बुधवार, 15/04/2009 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
संसार, म्हणजे एक घर थोड गुपितच ठेवावं आरपार दिसू नये म्हणून पडद्यांनी सजवावं संसार, म्हणजे एक घर भावनांना हळूवार टिपावं अश्रूच्या धारांना पागोळ्यांत साठवावं संसार म्हणजे एक घर प्रेमाच्या पायावर बांधावं उन्हाच्या झळा साहण्यास सोशिकतेच छप्पर असावं संसार म्हणजे एक घर काचेच्या खि़डक्यांचं असावं तडा जाऊ नये म्हणून विश्वासाच कुंपण असावं संसार म्हणजे एक घर प्राजक्ताने अंगणी फुलाव टाकाऊ वस्तुंनाही तडजोडीने सजवावं.
Taxonomy upgrade extras

चवदार, चटकदार जवळा!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 15/04/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : सुका जवळा (या नावाची सुकी मासळी बाजारात वाट्यावर मिळते. साधारण १० रुपायाचा एक वाटा असतो) तेल, कांदा, गरम मसाला, २-४ कोकमं, मीठ चवीप्रमाणे. दोन माणसांकरता. बाजारातून छानपैकी तीन वाटे सुका जवळा आणावा. थोडा निवडावा. काही खडेबिडे असतील तर काढून टाकावेत. नंतर तो जवळा तव्यावर थोडा भाजून घ्यावा व त्यानंतर स्वच्छ धुवावा. पाणी निपटून टाकावे. पातेल्यात तेल घेऊन झकासपैकी कांद्याची फोडणी करावी. कांदा छान लालसर परतून घ्यावा व त्यात सुका जवळा टाकावा. मिश्रण थोडा वेळ चांगले परतून घ्यावे, जवळा शिजू द्यावा.

एंट्री

लेखक विनायक प्रभू यांनी बुधवार, 15/04/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
असाच एक मुंबईमधला नाका. सकाळची १० ची वेळ. मी थांबलो होतो बस करता. इतक्यात एक टेंपो येताना दिसला. लक्षात राहायचे कारण असे की त्यात ड्राईवरच्या बाजुला एक पन्नाशीचे गृहस्थ कोंबुन बसले होते. ड्राईवरने टोल भरला. जरा पुढे आल्यावर ऑक्ट्रॉयच्या शिपायाने टेंपो अडवला. गृहस्थ खाली उतरले. त्यांनी शिपायाला एक पत्र दाखवले. पण शिपाई काही टेंपो सोडेना. साधारण बोलण्यावरुन गृहस्थ मास्तर असावेत असे वाटले. ही जात कुठुनही ओळखता येते. थोड्या वेळ्याने मास्तर रागारागाने मोठ्या साहेबाला भेटायला ऑफिसमधे गेले.

राज ठाकरेंनी नाशिक मुक्कामी मराठी माणसांसाठी हाक मारली

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 15/04/2009 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
राज ठाकरेंनी नाशिक मुक्कमी मराठी माणसांसाठी हाक मारली
raaj in nashik नाशिक दि. १३ एप्रिल ०९ (मि.पा. विशेष प्रतिनिधी ) : तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा करण्यासाठी मनसे ला आपले मत द्या असे अवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी केले. मनसेच्या नाशकातील उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पवननगर - नाशिक येथील मैदानावर राज ठाकरे यांची सभा झाली. यावेळी त्यांनी शिवसेनेवरही टीकास्र सोडले. शरद पवारांना हि निवडणुक लढवायची नव्हती.

माझी भटकंती - ओहाय (Ojai)

लेखक भाग्यश्री यांनी बुधवार, 15/04/2009 12:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी निवांत वेळ मिळाला.. म्हटलं आज काहीतरी छान , वेळ काढून, नीट लिहावे.. आता ते छान झालं की नाही माहीत नाही..! पण मन लावून लिहीतीय.. नेहेमी लिहीताना इतका विचार, इतकी तयारी मी एरवी नक्कीच करत नाही! तर मी आज सुरवात करतीय "माझी भटकंती" लिहायला.. जसं जमेल तसे इथे पाहीलेल्या गोष्टी, ठीकाणं इत्यादींवर लिहायचे ठरवत आहे.. ते प्रवास वर्णन असेल की अजुन काय ते माहीत नाही..

पोह्याचे कटलेट

लेखक ऋचा यांनी बुधवार, 15/04/2009 11:05 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्यः- उकडलेले बटाटे २,जाडे पोहे २ वाट्या,तिखट,मीठ्,साखर्,टोस्टचा चुरा किंवा बिस्कीटाचा चुरा कृती :- पोहे भिजवुन घ्यावेत त्यात उकडलेले बटाटे कुस्करुन घालावेत त्यात तिखट-मीठ-साखर घालावी. हे सगळं एकत्र मिक्स करुन त्यांना चपटा आकार द्यायचा(रगडा पॅटीसच्या पॅटीसचा असतो तसा). तव्याला अगदी थोडे तेल लावुन त्यावर वरील केलेल्या चकत्या टोस्ट्च्या किंवा बिस्कीटाच्या चुर्‍यात घोळवुन फ्राय कराव्या.

शीत गोडाऊन..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 14/04/2009 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काय!!!! समजलं नाही ना, नक्की काय नाव आहे लेखाचं?? सांगते. मित्रहो, बर्‍याच वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण ३० एक वर्षापूर्वी, दूध नासण्याचे प्रकार फार होत होते. मग गृहीणी, बाया-बापड्या, नोकरदार स्त्रीया दूधाचं विरझण लावायच्या आणि मग नंतर त्याचं ताक, लोणी शेवटी तूप. घरात माणसंही भरपूर होती.. आणि डायटींगची ओझी नसल्याने "अरे घे रे भरपूर तूप" असं सर्वसाधारण प्रकृतीच्या माणसाला आग्रहाने सांगितलं जायचं. केवळ दूधाचंच नव्हे.. तर भाज्या, फळे, आमटी.. तोंडीलावणी. या सगळ्याचीच सांगता कामवालीला देऊन, नाहीतर थलीपीठात बेमालूम पणे घालून नवा पदार्थ बनवण्यात व्हायची. ..