Skip to main content

आठवणींची निर्मिती.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 07/06/2009 08:45 या दिवशी प्रकाशित केले.
आज आमच्या शेजारांच्या घरात खूपच गडबड आणि आवाज होत होता.त्यांना दरवाजा खटखटून चौकशी करण्याचा माझा मानस नव्हता.पण काही वेळाने माझाच दरवाजा खटखटून गडकर्‍यांची भारती आली आणि मला म्हणाली, "काका,एकदोन खूर्च्या कमी पडतायत,तुमच्या खुर्च्या मिळतील काय?" मी म्हणालो, "त्यात विचारायचं काय घे तुला हव्या तेव्हड्या. पण काय गं भारती कसली गडबड चालली आहे बर्‍यांच बायकांचा आवाज येतोय." मला म्हणाली, "आज आमच्या घरी "पॉटलक" आहे." "म्हणजे ग काय?" ह्या माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता हात करीत म्हणाली "मग सांगते.

राधिका

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 07/06/2009 04:35 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णसख्याची प्रीत राधिका सूर कन्हैया, गीत राधिका श्यामल करि अलगूज होउनी स्वरपुष्पे उधळीत राधिका नंदनंदनासंगतीत जणु रासरंगसंगीत राधिका श्रावणघन घननीळ बरसतो कदंबतळि झेलीत राधिका चंद्रसजण मुरलीधर गगनी, चांदणकण वेचीत राधिका मुकुंदकंठी वैजयंति, शिरी मोरमुकुट निरखीत राधिका देवकिनंदन झुलवित झूला, रोमांचित, पुलकीत राधिका देह श्याम अन् प्राणहि श्यामच, जणु अद्वैत, पुनीत राधिका जन्मजन्मिची सखी, हरीचे पूर्वजन्मसंचीत राधिका
Taxonomy upgrade extras

पद्मसिंह पाटलांना अटक

लेखक टायगर यांनी शनिवार, 06/06/2009 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणी खासदार पद्मसिंह पाटील यांनी सीबीआयने ताब्यात घेतले आहे. पद्मसिंह पाटील हे केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. निंबाळकर यांची हत्या झाल्यानंतर काही दिवसातच पद्मसिंह पाटील यांच्याकडे संशयाने पाहिले जात होते. आता त्यांना केव्हाही अटक होण्याची शक्‍यता आहे.

पाककृती हवी आहे..

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 06/06/2009 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
सध्याचा रिकामपणाचा नवीन उद्योग स्वतःच्या नि दुसर्‍यांच्या पोटावर प्रयोग करणे हा आहे.. जालावरच्या पाककृती वाचून दोन तीन वेळा कोल्ड कॉफी बनवली.. पण एकदा खूपच कडक नि कडवट झाली... सोबतच्या गिनिपिगने कशीबशी नरड्याखाली उतरवली.. दुसर्‍यावेळेस तिची बासुंदी झाली होती.. दूरदृष्टी ठेवून यावेळी गिनिपिग बदलला होता.. :D तर कृपया कुणी कॉफी, साखर, पाणी, दुध यांचे नेमके प्रमाण सांगेल का? त्याचबरोबर.. घरच्या घरी क्रीम बनवण्याचा काही सोपा उपाय आहे?? झालंय काय, तर मी एक नवीन चित्रफीत पाहिलीय, कॉफी आर्टची.. थोडी सांड-लवंड अपरिहार्य आहे.. पण पाककौशल्यात मी दगड आहे की वीट आहे.. हे जरा तपासून पाहायचंय.. आणखी एक..

नारायणगावचा थरार!!! अन्तिम भाग

लेखक मस्त कलंदर यांनी शनिवार, 06/06/2009 16:33 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर: हे जनातलं मनातलं आहे.. काथ्याकूट नाही.. मी अंधश्रध्द नाही तशीच अश्रद्ध ही नाही..त्यामुळे या अनुभवावरून मी व्यक्तिशः कोणतेही निष्कर्ष काढलेले नाहीत..पण एक अविस्मरणीय प्रसंग म्हणून तो आजवर बर्‍याचजणांना सांगून झालाय.. आज इथे त्याचं आणखी एक पारायण!! बाकी नारायणगांव, जुन्नर, खोडद..ला मी एकदाच गेले, तिथे आमची अशी वाट लागली.. की पुन्हा म्हणून त्यांच्या वाटेला गेले नाहीये..त्यामुळे तिथला भौगौलिक परिसर.. मार्ग, अंतरं, ती कापायला लागणारा वेळ याबद्दलचे तपशील चुकीचे असू शकतील. कारण हे ही असेल की काही माहिती ऐकीव होती अन काही गोष्टी तितक्या अचूकपणे लक्षात नाहीत... नि .. तेव्हा चू.भू. दे.

(बँकेतील बॉलपेन)

लेखक विकास यांनी शनिवार, 06/06/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याचदा बँकेत ग्राहकांच्या सेवेसाठी काउंटरवर जी बॉलपेन्स ठेवलेली असतात ती आकाराने लहान, टोपण नसलेली आणि लहानशा साखळीने बांधलेली असतात. बर्‍याचदा चेकवर सहीसाठी अथवा डिपॉझीट फॉर्मवर सही करायला अशा लहान, टोपण नसलेल्या साखळीने बांधलेल्या पेनाचा ग्राहक वापर करतात. तर अशी ही लहान, टोपण नसलेली साखळीने बांधलेली बॉलपेन्स काउंटरवर ठेवण्यामागे आणि स्वतःचे पेन न वापरता तेच पेन (कधी कधी थोडेसे झटकून) वापरण्यामागे आर्थिक कारण काय असू शकेल? ;)