Skip to main content

(आय विश)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 09/06/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सुवर्णमयीताईंची 'आय विश' ही कविता! ;) मराठी जालावर मोजक्या वर्षांचे नवकाव्य मागे मी वाचत वाचत. पद्यविभागात दिसणार्‍या नवकविता पाहून 'कर्म, कर्म' म्हणत होतो मी. वाचकांना वाचवण्याकरता दिल्या ढुशा मी त्या नवकवितांना ..कित्येकदा त्याने उंचावर दिसणार्‍या गोमट्या कविता बघितल्या..चढला वरती एक कल्पना घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश मर्ढेकर, आरती प्रभू , ग्रेस, धामणस्कर' डोक्यात आणखी एक कल्पना घेऊन गुळगुळीत कागदावर सुसाट पुढे लिहीत गेला.. मी वाचेस्तोवर एका वाचकावर नवकविता ठेवून ..गेला पुढे . मी धास्तावलो..

आय विश

लेखक सुवर्णमयी यांनी मंगळवार, 09/06/2009 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
तीनचाकीवर तीन वर्षाचा मुलगा मागे मी चालत चालत. रस्त्यावर दिसणारी गांडुळे पाहून 'वर्म, वर्म' मोजत होता तो. गांडूळांना वाचवण्याकरता दिली दिशा मी त्याच्या सायकलीला ..एक दोनदा त्याने कडेला दिसणारी रानटी फुले बघितली..उतरला खाली एक फूल घेऊन म्हणाला, "आय विश, आय विश माय मॉम , डॅड, ताई, आज्जी' हातात आणखी एक फूल घेऊन उतारावर सुसाट पुढे निघून गेला.. मी जाईस्तोवर एका गांडुळावर बूट ठेवून ..गेला पुढे . मी रागावले.. बोलले त्याला.. तो मागे फिरला, वाटेत अनेक मेलेली गांडुळे होती..
Taxonomy upgrade extras

मथुरानगरपती काहे तुम...

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 09/06/2009 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
टीप - ह्या विरहिणीच्या शब्दांबद्दल, अर्थाबद्दल, मी मिपाकर धनंजयला काही भाष्य करण्यास सांगितले आहे.

ओनामा

लेखक प्रसन्न केसकर यांनी मंगळवार, 09/06/2009 15:28 या दिवशी प्रकाशित केले.
मायबापहो, मिसळपाववर गेले बरेच महिने येवून आस्वाद घेत होतो. काहीतरी आपणही करावे असे बरेच दिवस वाटत होते पण धाडस होत नव्हते. जरी व्यवसाय लिहिण्याचा असला तरी ललित अक्कल नाही ना कधी लिहिण्याची शैली तयार केली. आज मुलाची शाळा सुरु झाली आणी गेले काही दिवस डोक्यात घोळत होते ते काळ्यावर उतरावे अशी ऊर्मी आली. त्यामुळे हे लिहिले. ओनामा तर केलाय पण भट्टी जमली आहे असे काहि वाटत नाही पण चुका पोटात घाला आणी जर लिहून अजून छळू नये असे वाट्ले तर तसेही कळवा. पुनेरी आज नऊ जून..... गोटूची शाळा आज परत सुरु झाली.

दाखला

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/06/2009 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
ऐकताय ना .... तिकीटपण लावुन पाहिलं, तर मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातुन फोन आला .. बाईसाहेब येताहेत साहेबांच्या सोबत.. दोन 'पास' तयार ठेवा..! दुसर्‍या दिवशी समाधीशेजारी , तात्पुरते बंकर्स बांधण्यात आले , साहेब येणार दर्शनाला, सुरक्षा नको? जन्मभर बापुंची सोबत केलीत ..., मृत्युनंतर तात्पुरता का होईना ... मशिनगन्सचा शेजार ...(?) एवढी निर्घुण थट्टा..., कोणी केली होती का हो तुमची ...? त्या अशक्त वृद्धाबरोबर.. किती निर्धास्त, सुरक्षित होतात...! आता शस्त्रांच्या सोबतीत.. जाणवतेय ती सुरक्षा..तो निर्धास्तपणा ..? चला....., निदान मी तरी निर्धास्तपणे जावु शकेन जन्म - मृत्यु कार्यालयात.., माझ्याच जिवंतपणाचा

अंजीर मोदक (पेढा)

लेखक दिपाली पाटिल यांनी मंगळवार, 09/06/2009 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
पेढा साहित्यः १ कप दुध पावडर २ टे. स्पु . तुप वेलची पावडर १/२ कप अंजीर पेस्ट (५ अंजीर १/२ कप दुधात भिजवुन बारिक करावेत) १/२ डबा कंडेन्स्ड दुध (याच्या गोडपणा मुळे साखर लागत नाही सहसा..) कृती: वरिल सगळं साहित्य (वेलची पावडर सोडुन) एका पॅन मध्ये एकत्र करुन घ्या. कमी उष्ण्ते वर घट्ट होईपर्यंत ढवळत रहा. वेलची पुड टाकुन हलवा आणि हव्या त्या आकारात पेढे बनवा.

बरे नाही !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/06/2009 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हे असे पुन्हा, डोकावणे बरे नाही. चालताना उगाच, वेडावणे बरे नाही. मनी दाटले भाव, लपवणे बरे नाही. मज स्मरते ती वाट, थबकणे बरे नाही. आता तुझे चोरुन, मज वाचणे बरे नाही. तु चाल पुढे, मागे वळुन, उसासणे बरे नाही. हे माझे तुला आता, विसरणे सुरु झाले. तुझे असे मनात माझ्या, रेंगाळणे बरे नाही. विशाल कुलकर्णी

असे का?

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 09/06/2009 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या काही आठवड्यात पुण्या मधे पीएमपीएमएल (आपली लाडकी पीएमटी हो) ने प्रवास करण्याचा योग आला. या बस मधील डाव्या बाजुची आसने महीलांकरता राखीव असतात. तश्या प्रकारच्या सुचनासुध्दा स्पष्ट पणे लीहीलेल्या असतात. यासंर्दभातले माझे निरीक्षण असे की महीलांसाठी राखीव असलेल्या जागेवर जर पुरुष प्रवसी बसलेले असतील आणि दुसरी कडे बसायला जागा नसेल तर महीला उभे राहुन इतरांचे धक्के खात प्रवास करणे पसंत करतात. जर कोणी या नियमाची त्यांना आठ्वण करुन दीली तरी सुध्दा त्या अशा सुचनेकडे दुर्लक्ष करतात व उभ्यानेच प्रवास करणे पसंत करतात. मी हैदराबाद मधे असताना याच्या उलट अनुभव घेतला होता.

दलाल

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 09/06/2009 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
"काय मास्तर काय चाललय"? सकाळीच रामदासांचा फोन आला. "का, बाबा आम्हा गरीबांची आठवण काढली" मी "पैसे कमवायची असलेली अक्कल न वापरता गरीब राहायची हौस असलेल्यांना काय करायचे" रामदास " काय कळले नाय बॉ" मी त्याना काल एक कुठल्याशा शिक्षण संस्थेचे एक पत्र आले होते. १२ वी नंतर मेडिकल, इंजीनयरींग, फार्मसी मधे अ‍ॅडमिशन मिळवुन देण्यात मदत करतो अशा संदर्भाचे. तसेच त्यानी एक डॉक्टर युगुल मेडीकल अ‍ॅडमिशन बद्दल मार्गदर्शन करते ह्या बाबत एका वर्तमान पत्रात लेख वाचला होता.