Skip to main content

टनेल व्हिजन V/S पेरिफेरल व्हिजन किंवा टनेल व्हिजन व पेरिफेरल व्हिजन चर्चा

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 26/06/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/8342#comment-128443 विप्र सरांनी ''टनेलवर चर्चा करायला आवडेल' असे सांगीतल्याने या धाग्याचा उदय झाला आहे. आता काहीजण म्हणतील की फुटकळ चर्चा आहे, हात धुवुन घेण्याचा केवीलवाणा प्रयत्न आहे वगैरे वगैरे. किंवा माननीय संपादकांपैकी काही जण या धाग्याला आक्षेप घेवून हा धागाच गायब करु शकतात. (माझी त्यांना तसे न करण्याची विनंती आहे. (परत्येकाचा ईगो सांबाळाया लागतू.

अपचन

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 26/06/2009 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीप्रमाणे चौपाटीवरची मजा पाहुन मी परत चाललो होतो. एका कोप-यात एक माणुस तळमळत बसलेला दिसला. सारखा पोटाला हात लावुन तोंडाने खुर्क खुर्क आवाज काढत होता. जवळ जावुन पाहिले तर आपला नाना! 'नाना? काय रे काय झाले ?' 'काही नाही यार ! त्या समोरच्या भेळवाल्याकडची भेळ खावुन पोटात दुखत आहे... सारखे करपट ढेकर येत आहेत.... साला काय बकवास भेळ बनवतो.. अग आईग...खुर्क' 'छ्या ! नाना ! काहीतरीच काय बोलतोस? बघ किती गर्दी आहे त्याच्या दुकानात... कुणाचेही काही पोट दुखत नाही अन तुझेच कसे काय दुखते?' 'अरे खोटारडे आहेत ते...

एका प्रशिक्षणार्थी पत्रकाराची डायरी - भाग १४

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 26/06/2009 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
(ही डायरी पूर्णपणे कल्पित आहे पण सत्य आणि कल्पित यातली सीमारेषा खूपच धूसर असते म्हणे. जरी तसे असले तरी या डायरीत लिहीलेले नक्कीच अर्धसत्य आहे. काही पत्रकार या डायरीतल्याप्रमाणे वागत असले तरी बरेचसे तसे नसतात.

लगाम

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 26/06/2009 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा आणि माझा संवाद तसा जुनाच आहे संवाद तरी कसे म्हणायचे बर्‍याचदा फक्त तोच बोलतो मी नेहेमीच फक्त श्रोता असतो नाही म्हणायला शंका असतात माझ्या परवाच विचारले त्याला हा कॅनव्हास बघितलास? पांढराशुभ्र ..... रंगवायचाय मला ! हंसला ..... हळुवारपणे म्हणाला वेड्या ....! अरे आत्माच तो जणु ...! निर्लेप असतो .... निर्विकार ना रंग, ना रुप, ना कसल्या अभिलाषा त्या फलकाची चौकट आहे ना... तो देह रे ! कुठलेतरी बंधन हवेच ना? हा ...

अण्णांचा आशीर्वाद

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 26/06/2009 09:09 या दिवशी प्रकाशित केले.
शिर्डीहून संगमनेरकडे परतताना निमगाव जाळीजवळ आमच्या लाल-पिवळ्या मारुती ओम्नीनं झटका घेतला आणि मी एकदम जागा झालो. गाडी पट्टी सोडून रस्त्याच्या कडेला आली होती. ड्रायव्हर भेदरलेला दिसत होता. थोडेसे सैलावलेले दहा-बारा प्रवासीही झटक्‍यात जागे झाले होते. एक अवजड ट्रक आम्हाला हूल देऊन भन्नाट वेगानं पुढे गेला होता...

मायकेल जॅक्सन गेला

लेखक पक्या यांनी शुक्रवार, 26/06/2009 06:48 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच (गुरुवार दुपार ) समजले की पॉप संगीताचा बादशाह समजला जाणारा मायकेल जॅक्सन गेला. राहत्या घरीच श्वास बंद पडून त्याचे निधन झाले. http://news.yahoo.com/s/ap/us_obit_michael_jackson

मृगजळ - १

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 25/06/2009 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
"आबाऽऽऽऽऽ... लवकर चल!!!!!!!!! माय कशी तरीच करतीया... चल रं.. चल लवकर..." राणीनं गळा काढला. "ए... सटवे... चल जा इथून. तुज्याशी आणि तुझ्या मायशी काय बी संबंद न्हाय माझा..! **** ची औलाद!!! चल चालती हो..." आबा करवादून म्हणाला. तिच्याकडे एक जळजळीत कटाक्ष टाकत स्वतःच्या मिठीत असलेल्या चंदाला तो आणखीनच बिलगला. त्याला तशा आवस्थेत पाहणे राणीसाठी नविन नव्हते. तिला समजायला लागल्यापासून ती बहुतेक रोज दुपारी म्हणजे ज्यावेळी दारू पिण्यार्‍यांची अड्ड्यावर गर्दी कमी असायची तेव्हा दारूच्या भट्टीच्या मागं असलेल्या एका अडगळीच्या खोलीत, ती हेच दृष्य पहात आली होती.

विशिष्ट ओळख योजना

लेखक चिरोटा यांनी गुरुवार, 25/06/2009 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज केंद्र सरकारने विशिष्ट ओळख योजनेचे(Unique Identification Scheme) मुख्य म्हणुन इन्फोसिसचे नंदन निलेकणी ह्यांची नियुक्ती केली आहे. या योजनेप्रमाणे प्रत्येक भारतियाला विशिष्ट ओळख अंक दिला जाईल्.बर्‍याचश्या प्रगत देशात प्रत्येक नागरिकाला असा अंक दिला जातो.ओळखपत्र कार्ड स्वरुपात दिले जाणार असुन त्यावर फोटो,बायोमेट्रिक माहिती असेल. हा अंक मग स्थानिक्,राज्य्,राष्ट्र स्तरावरच्या सर्व सरकारी विभागाना जोडला जाईल.

व्हाय मेन डोन्ट लिसन अ‍ॅण्ड विमेन कान्ट रीड मॅप्स

लेखक शितल यांनी गुरुवार, 25/06/2009 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
अ‍ॅलन आणि बार्बरा पीस यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे जगातील अनेक भाषेत अनुवादन झाले आहे. मराठीत त्याचे अनुवादन अ‍ॅड.शुभदा विव्दांस यांनी केले आहे. पुस्तकातील माहिती अचूक व परिपुर्ण असावी यासाठी अ‍ॅलन आणि बार्बरा पीस दोघे ही भरपूर मेहनत घेतात. त्यासाठी ते देशोदेशीच्या एक्स्पर्टसना भेटतात, लोकांच्या मुलाखती घेतात, सेमिनार्स घडवुन आणतात. या पुस्तक निर्मीतीसाठी त्यांनी घेतलेली मेहनत पुस्तक वाचताना वाचकांच्या लक्षात येते. या पुस्तकात अनेक स्त्रीयांच्या मनात असलेले पुरूषां बद्दल प्रश्न जसे, पुरूष असे का वागतात ? मनातील गोष्टी बोलुन का दाखवत नाहीत?