Skip to main content

कोबडी ती कोंबडी

लेखक विनायक प्रभू यांनी सोमवार, 13/07/2009 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रतिकुल परिस्थीतीवर विजय मिळवण्याकरता लागणारे धैर्य , साहस आणि बुद्धी हा माणसाचा अंगभुत गुण असतो. युद्ध सदृश परिस्थितीत हा हाताला लागला तर विजय नक्की. १९९९ साली कुक्कुट पालन क्षेत्रात मला ३ वर्ष झाली होती. ह्या ३ वर्षात मी रस्त्यापेक्षा मी लीटर्(शिटवडा)वर जास्त फिरलेलो होतो. मी जमा केलेला विदा हा वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस मधे चर्चेचा विषय होता. हा विदा मी रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही शेतकर्‍याना वाटायचो. कोंबड्यानी खाल्लेले अन्न, प्राशन केलेले पाणी आणि बाहेरचे हवामान ह्यांची सांगड घातलेला विदा वापरल्यास शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ व्हायची.

स्वाक्षरीचा वापर

लेखक विकास यांनी सोमवार, 13/07/2009 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम एक प्रामाणिक डिसक्लेमरः खाली जे काही "प्रकटन" करत आहे ते कोणा एका व्यक्तीबद्दल नाही आहे आणि कृपया कोणी व्यक्तिगत घेऊ नये अशी विनंती. तरी आक्षेपार्ह वाटल्यास खव लिहा अथवा सगळ्यांनाच वाटले तर मी हे अप्रकाशित करायला पण तयार आहे. याहूमेल आणि जी मेल यातील एक मोठ्ठा फरक काय आहे असे विचारले तर काय सांगू शकाल (तेच हॉटमेल, एमएसएन, लाइव्ह मेल्स बद्दलही आहे)? तर जीमेल मधे इतर सर्व मोफत इमेल प्रमाणे खाली स्वाक्षरीप्रमाणे जाहीरात येत नाही. अर्थात आपण आपली एम्बेड जाहीरात, स्वाक्षरी वगैरे जीमेल मधे ठेवू शकतो पण तो आपला निवाडा (चॉईस) असतो.

निळूभाऊ गेले!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 13/07/2009 07:22 या दिवशी प्रकाशित केले.
nilu phule निळूभाऊ गेले! माझ्या अतिशय आवडत्या नटांपैकी एक! पण `पुढचं पाऊल', सिंहासन, पिंजरा, सामना, अशा अगदी मोजक्या चित्रपटांचा अपवाद वगळला, तर मराठी चित्रपटस्रुष्टीने त्यांना साच्यातच अडकवले. त्यामुळे त्यांच्यातल्या चतुरस्र अभिनेत्यावर अन्याय झाला. (अमरीश पुरींचेही हेच झाले!) त्यांचे नाटक कधी पाहण्याचा योग आला नाही.

विरंगुळा !!

लेखक अनिल हटेला यांनी सोमवार, 13/07/2009 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स !! चित्रपट हा साधारण सर्वाच्या विरंगुळ्याचं ,मनोरंजनाचं साधन आहे,(असावं) मग तो चित्रपट मराठी भाषेत असो अगर हींदी ! ईंग्रजी असो वा इतर कुठल्याही प्रादेशीक भाषेत.. आज काल तर अगदी जपानी,चीनीतसेच इतरही अनेक विदेशी भाषेतील चांगल्या कलाकॄती आपणास उपलब्ध आहेत. तर मंडळी चित्रपटाच्या नावांकडे कधी आपण लक्ष दिलय का?

प्रेमाची शिदोरी,प्रणयाचा मेवा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 12/07/2009 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज बे-एरियात अत्युतम हवा पडली होती.७०-७२ डि.-म्हणजे २१-२२ डि.सेंटीग्रेड- तापमान भर दुपारच्या उन्हात वाटायचं. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत.
काव्यरस

गराज सेल- लेखिका मीनल गद्रे- चतुरंग पुरवणी लोकसत्ता

लेखक सुवर्णमयी यांनी रविवार, 12/07/2009 01:07 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090711/chchou.htm या दुव्यावर मीनल गद्रे यांचा 'गराजसेल 'यावरील लेख लोकसत्ताच्या 'चतुरंग' पुरवणीत वाचला. लेखाबद्दल मीनलचे अभिनंदन. लेखाखालील पत्ता पाहून मिपाकर मीनल या लेखिका असाव्यात असे वाटले. संपादकांनी मिपावर याची दखल इतरत्र घेतलेली असेल तर हा नोड तिथे जोडावा. हा लेखावर प्रतिसाद, चर्चा करता यावी म्हणून दुवा दिलेला आहे.

((जुळ्या चिंबोर्‍या))

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 11/07/2009 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
सुनीलरावांचा जुळ्या चिंबोर्‍या हा धागा आणि नीधप यांची ही कविता ह्या वरून पुढील विडंबन स्फूरले. आधी प्रतिसादात दिले होते ते इथे (खास लोकाग्रहास्तव) स्वतंत्र धाग्यात देत आहे :) चल!

आठवणी पावसाळ्याच्या

लेखक विमुक्त यांनी शनिवार, 11/07/2009 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळ्यात, रेवदंड्याच्या पावसाची आणि लहानपण ची खुप आठवण येते. रेवदंड्यात असताना, विहीरीत पोहण्याची, शाळा सुटल्या वर छत्री असुन सुद्धा भिजत घरी येण्याची, पोखरण कीती भरलीय हे रोज बघण्याची आणि पावसात भीजत समुद्रावर हुंदडायची जाम मजा होती. आमचं घर नारळा-पोफळीच्या वाडीत होत. वाडीत एक बय्रापैकी मोठ्ठी विहीर होती. पावसाळा सुरु झाला की रोज विहीरत डोकवुन ती कीती भरलीय हे मी बघायचो. पाऊस पडत असताना विहीरीतल्या पाण्याला एक वेगळाच रंग आलेला असायचा, गढुळ नाही पण एकदम गुढ असा रंग असायचा.