Skip to main content

थांब राजसा..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 21/07/2009 06:20 या दिवशी प्रकाशित केले.
रात मधुमती, चांद संगती थांब राजसा जाऊ नको.. स्पर्श अमृती, रे तुझी मिठी दूर उभा तू राहू नको.. धरेस बिलगुन, गगन झोपले गळा चांदण्-मणी गुंफले दूधाळ होई , अकाश गंगा क्षितिज माखले , जांभूळ रंगा रंग मिलनी पुसटू नको.. थांब राजसा जाऊ नको.. रूणझुण वाजे पुन्हा पाऊल नव्या उषेची नवी चाहूल आर्त स्वरांनी रात पुकारे मनी मिलनी, नवे धुमारे स्वप्न टिपेला नेऊ नको.. थांब राजसा जाऊ नको.. मिठीत ओल्या, मला राहु दे मधुमिलनी, मला न्हाऊ दे कुशित तुझा गंध घेऊ दे उरांत तुझा छंद लेऊ दे रात सुनी ही ठेऊ नको थांब राजसा जाऊ नको.. - प्राजु
काव्यरस

ह्याचा देव

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 21/07/2009 00:57 या दिवशी प्रकाशित केले.
त्या देशांत आता त्यांचे राज्य आहे हे ह्याला कळले.. हा शहारला.. ज्या रस्त्यावर ते गप्पा मारत होते ... त्या रस्त्याच्या वर्णाशी स्पर्धा करणार्‍या वर्णाचा तो पाहूणा... त्याच्या नवस्वातंत्र्याचा ह्याला हेवा वाटला. मग आपणही कमी नाहि असे वाटून हा बोलू लागला आमच्याकडेही असाच एक नेता होऊन गेला... तो काळच असा होता.. देवाच्या सेवकांनी देवाला घेरला होता.. देवाचा व्यापारी करून भक्ताला गिर्‍हाईक केले होतं... तो व्यापार एका माणसाला दुसर्‍यापासून तोडत होता... आमची वेस गावाबाहेर सुरू व्हायची.. गाव येताच संपायची... आम्हाला गावात नेऊन त्यानं सीमोल्लंघनच केलं... तो म्हणला "देव झूट आहे..

`पग' घुंगरू...

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 20/07/2009 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
मूळ प्रेरणा : ही पाहा pug "गद्दारांना शिवसेना भवनात स्थान नाही!'' उद्धव ठाकरे गरजले, तशी सर्वांचीच पळापळ झाली. विधानसभेच्या निवडणुकीला अवकाश असताना कोण गद्दार शिवसेनेत पुन्हा घुसण्याचा किंवा शिवसेनेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतोय, हे काही कळेना.

आपण भ्रष्टाचारात सहभागी होतो का?

लेखक विकास यांनी सोमवार, 20/07/2009 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
राजे साहेबांच्या आपण देशासाठी काय करतो या संदर्भातील चर्चा वाचताना, एक बर्‍यापैकी समान धागाअसा आहे की आपण कर भरत असलो, आपले काम नीट करत असलो वगैरे, तर नागरीक म्हणून आपण आपले काम करतच असतो. हा १००% पटणाराच मुद्दा आहे. आता भारताची सद्यस्थिती पहाता कोणीही मान्य करेल की त्याच्या मुळाशी भ्रष्टाचार आहे.

वाटेवर मी तिच्या ठेवली--

लेखक पुष्कराज यांनी सोमवार, 20/07/2009 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाटेवर मी तिच्या ठेवली प्राजक्ताची दोन फुले ह्रदयातून मग लक्ष लागले प्राजक्तातून प्रीत फुले ? उगीच ठेवला प्राजक्त तिथे मी मनात रुजलो आहे किती ? मधल्या दिवसांमधील अंतर जाणून घेण्या आहे किती ? हळवी लागे ओढ अनामिक मनास हुरुहूर सले खुळी प्राजक्तातून प्रीत पाहतो विसरली का मज प्रीतकळी ? आनंदाने तिने उचलली रस्त्यावरची दोन फुले गंध घेउनी प्रेमभराने मला शोधण्या नजर फिरे फुले नव्हे ती आमुची प्रीती प्राजक्तातून फुलली होती तशीच ताजी तशीच नि॑मळ प्राजक्तासम उरली होती

इतिहासाचे एक पान...

लेखक दशानन यांनी सोमवार, 20/07/2009 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
२० जुलै १९६९ ! आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली, अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली...

त्रस्त काका शांत व्हा!

लेखक सहज यांनी सोमवार, 20/07/2009 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी शीर्षक वाचून चक्रावलात ना? मीही असाच चक्रावलोय. मिपाचेच एक जेष्ठ सभासद आपल्या संस्थळावर येऊन कोणती तक्रार करुन गेलेत ते पाहा. त्यासोबत मी त्यांना दिलेले उत्तरही पाहा. त्याचा पुरावा खाली वाचा...... ____________________________________________________ प्रमोद देव म्हणाले ... ...हा कोण त्रस्त समंध आहे? ह्याचे नेमके दुखणे काय आहे?... "बाबा रे, तुला असा प्रतिसाद का द्यावासा वाटला? जरा सविस्तरपणे सांगशील काय?" July १९, 2009 ११.२३(भारतीय प्रमाणवेळ) आम्ही म्हणजे देवकाकांच्या चमच्यांनी विचार केला जाउ दे काय बोलायचे.

"लहाने"पण देगा देवा !

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 20/07/2009 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"लहाने"पण देगा देवा ! रविवार दिनांक १९ जुलै २००९, स्थळ सहयोग मंदीर , ठाणे (पश्चिम) आणि व्यास पौर्णिमेनिमित्त : व्यास क्रिएशन्स चा व्यास स्नेह महोत्सव. सूर सप्तकांचे-हा श्री.संदीप वैद्य संकल्पित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि श्री मधुकर मंडलेकर यांनी मराठीमधे अनुवाद केलेले (रोझेलीन पर्लमन यांचे मूळ इंग्रजी पुस्तक : द ब्लाईंड डॉ.जेकब बोलेटीन - ऑटोबायोग्राफी ) "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हे निमित्त. कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने झाली, आणि कार्यक्रम फुलत गेला.साधारण ५ गाणी झाली आणि सभागृहात "त्यां"चे आगमन झाले - ज्यांच्या हस्ते "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हो

स्ट्रीट लाईट्स ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी सोमवार, 20/07/2009 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत ! आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही.