हास्यमिसळ (१)
आया नव्या विनोद प्रकारात मी वेगवेगळ्या ठीकाणी लिहिलेल्या सुचना किंवा घोषवाक्ये किंवा वाक्ये एकत्र करून, तसेच त्यात आणखी मसाला टाकून त्यांची मिसळ करून तुम्हाला देणार... ती मिसळ खाल्ल्यावर तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा!
या वेळेस मी बसमध्ये लिहिलेल्या वाक्यांची मिसळ बनवणार आहे.
- ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीशिवाय बस मागे घेवू नये.
- सुरुवातीच्या स्थानका व्यतिरीक्त प्रौढ महिलांना मागच्या दरवाज्यातून उतरणास मनाई आहे.
- चालत्या बसमधून उतरू नका.
मिसळपाव
