Skip to main content

थोडीशी फुल,थोडेसे मोती

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 10/09/2009 15:54 या दिवशी प्रकाशित केले.
सहज एक दिवस विचारल तिला सखे मी तुला काय आणु ? थोडीशी फुल,थोडेसे मोती आणि चांदण आण ओंजळ्भरून मनात म्हणालो स्वतालाच प्रेम भलतच महाग असत जमल तर वार्‍याची झुळुक नाहीतर जाळणारी आग असत ओंजळभरून फुल एक दिवस तिला नेउन दिली काय सांगू आनंदाने सखी मझी हरकून गेली आज फुल दिली उद्या मोती देइल ओंजळ्भरून चांदण माझ्यासाठी घेउन येइल शेवटी एक दिवस सांगितल तिला चांदण तर खूप दूर आहे मी तुला मोतीही देउ शकत नाही तुझी एवढीशी इच्छा माझ्याकडून पूर्ण होउ शकत नाही क्षणभराच्या शांततेनंतर सार आभाळ भरून आल माझ चांदण माझ्या समोर रीमझीम रीमझीम बरसून गेल किती
काव्यरस

माझेच ग्रह तारे

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 10/09/2009 15:06 या दिवशी प्रकाशित केले.
तोंडी लावायला चंद्र अन चांदण्याची चटणी मिरचीची गरज नाही, डाळीला सुर्याची फोडणी राहु अन केतु जरा जास्तच तिखट गडे राहुचे करु भजे अन त्या केतुचे वडे शनी जाणारच नाही कधी आपल्या वाटेला जिलेबीसारखी त्याची कडीच लावु आपण ताटाला बाकीच्या लघुग्रहांना श्रीखंडात टाकु अन मग जोडीने श्रीखंड पुरी चाखु आख्खी पृथ्वी ठेवली असती तुझ्या हातावर पण मग काय ठेवणार शेषनागाच्या डोक्यावर जरी असतील आपल्या घराला पत्रे तुझ्या दिमतीला ठेविन सगळी नक्षत्रे बाकीचे ग्रह असुदे ना सये आकाशात रातीला एखादा तरी चमकेल ना तुझ्या डोळ्यात माझ्या परिवलानाचे कारण पण तुच अन परिभ्रमणाचा केंद्रबिंदु पण तुच कळतय ना तुझ्या-माझ्यातले आकर

पुन्हा पावसाला..

लेखक अनिरुध्द यांनी गुरुवार, 10/09/2009 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
(हि कविता हे मला सुचलेलं एक विडंबन आहे. मिलींद इंगळे यांच्या "गारवा" या अल्बम मधील 'पुन्हा पावसाला सांगायचे' यावरुन सुचलेले. मिलींद इंगळे यांची माफी मागून हे सद्य परीस्थिती दाखवणारं विडंबन टाकत आहे) पुन्हा पावसाला सांगायचे किती वेळ असे दडून रहायचे तुझ्या लांबण्याने दरी सुकली हिरवी वनराई जळू लागली ढगांनी किती दूर धावायचे पुन्हा पावसाला सांगायचे किती वेळ असे दडून रहायचे तेव्हढ्यात मला पाऊस दिसला जमीनीवर बरसण्यास होता आसुसला मला बघून खिन्न हसला....

(मिसळपावीय स्वयंभोचक संघ )

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/09/2009 18:29 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव स्वयंभोचक संघ या संघटनेत सध्या बरीच खळबळ माजली आहे. ३०% मध्ये विलीन व्हायचे/अनिवासींवर वर अंकुश ठेवायचे/ अनिवासींचे चे गोडवे गायचे / तसे गोडवे गाणारांचा निषेध करायचा यावर बरेच मंथन चालू आहे. मिसळपाव स्वयंभोचक संघाची भुमीका बरेच वेळा बदलत असते. पूर्वी शेकडा खेकडा नावाने स्वतःचे राजकीय आस्तित्व ठेवणारी ही संघटना आणीबाणीनन्तर बरीच बदलली. हिन आणी हिणकस पक्षाच्या अवांतर सरकारच्या काळात संघाने सत्तेची चव चाखली.

बिटाच ऊतप्पा

लेखक कन्चनरनदे यांनी बुधवार, 09/09/2009 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य:- उकडून किस्लेले बिट १ वाटी, आल्+लसुन्+मिर्चि पेस्ट १ चमचा, जाड रवा २ वाटी, मिट्ट चविपुरते,१ कान्न्दा गोल कापलेला, २१/२ वाटया पानि ॠति:- प्रथम उकद्लेले बिट किसुन घेने. किस्लेल्या बिटात जाड रवा आणी पानी घालाणॅ. नोन स्टीक तव्यावर उत्तप्पा घालाने. वरुन कन्द्यच्या चक्त्या लावने. बाजुने तेल सोड्ने.

द बर्निन्ग ट्रेन

लेखक फारएन्ड यांनी बुधवार, 09/09/2009 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
यालाच (टायटल प्रमाणे) 'धी बरनिन्ग ट्रैन' किंवा सुरूवातीला बराच वेळ रेल्वे न दाखवता इतर बर्‍याच गोष्टी दाखवून लोकांची डोकी फिरवल्याने काही लोक याला The Turning Brain असेही म्हणत फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जेव्हा डब्यात कारणाशिवाय साखळी ओढण्याला २५० रू. दंड होत असे तेव्हाची. कदाचित त्याही आधीची. एन्ट्रीलाच तीन पोरे नासिर हुसेन बरोबर एका नॅरोगेज यार्डात गप्पा मारत असतात. नासिर त्यांना एकेका इंजिनाकडे बोट दाखवून 'हे खुद्द महाराजा म्हैसूर यांचे आहे...' वगैरे माहिती पुरवत असतो.

करायचं ते करून टाक

लेखक गोगट्यांचा समीर यांनी बुधवार, 09/09/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनाला नाही पटंत तिला नसेल ना हे रुचत सगळ्या जगाचं तुला कळतं दुस-याचं मन बरं दिसतं मग बसतो रडत कुथत किति झाले अंक मोजत, मग रडत बसण्यापेक्षा आणि अंक मोजण्यापेक्षा करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ ती फक्त छान आहे, हे काय महान आहे, रूप वगैरे झूठ आहे पुस्तकी ग्यान पाठ आहे खरं , तू एक माठ आहे न संपणारी ही वाट आहे कधी , त्या रुपाच्या धुंदीत, सुंदर , एका गाण्याच्या गुंगीत करायचं ते करून टाक , विचार तुझा चुलीत टाक ॥ दैवावर तुझा प्रचंड विश्वास स्व्प्ने असती केवळ भास अरे आव्हान दे कधी दैवास घेउन बघ एक मोठा चान्स प्रेम सजवेल मग तुझी आरास चालु होइल एक अध्याय खास अशाच कवितेने प्

जहाल व मादक

लेखक सहज यांनी बुधवार, 09/09/2009 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिखट खायला आवडते तसे तिखट प्यायला आवडणार्‍यांसाठी हे स्पायसी कॉकटेल! ह्या कॉकटेलचे नाव आहे "शिवास बीच" (Chivas B*tch) साहीत्य एक काकडी एक किंवा दोन तुमच्या जवळच्या बाजारात मिळणार्‍या जहाल मिरच्या (लवंगी मिरची) ३० मिली शिवास रीगल ग्रेपफ्रुट ज्युस - एकदम गारेगार (पर्याय म्हणून ऑरेंज-लिंबू मिश्र पण जादा साखर नसलेले) सजावटी करता काकडीचा काप शेकर बनवायची कृती अगदी सोपी आहे. काकडी व मिरचीचे बारीक काप करुन एकत्र करा. ते शेकर मधे टाका व त्यात ३० मिली शिवास रीगल व्हिस्की घाला. शेकर मस्तपैकी घुसळा. मग ग्लासमधे गाळून तो रस भरा.

आणि पाय माझा घसरतो !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 09/09/2009 10:36 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल कुठेही, कसाही...; पण पाय माझा घसरतो........... सोकावलेला सहकारी नेहमी सांगतो अंडर द टेबल व्यवहार करायला शिक आदर्श, नितीमत्ता आणि सोकॉल्ड संस्कार अलगद वेशीवर टांगायला शिक मी कसाबसा स्वत: ला तयार करतो संस्कारांना मनाच्या अंधार्‍या कोपर्‍यात कोंबतो नेमकं तेव्हाच माझाच आरशातला चेहरा ... माझ्याकडे पाहून खुदकन हसतो ..... .........................आणि पाय माझा घसरतो ! चालता चालता मी हजारवेळा थबकतो रस्त्यावरची चालती-बोलती सौंदर्यस्थळे पाहून नकळत जिव माझा कसानुसा होतो त्यांच्याकडे पाहत मी स्वतःलाच समजावतो परस्त्री मातेसमान हे आता विसरायला हवं असं म्हणत स्वतःलाच फसवायला बघतो नजरा चुकवत मान वळवून