Skip to main content

उचललेस तू मीठ मुठभर

लेखक भोचक यांनी गुरुवार, 12/11/2009 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते. 'उचललेस तू मीठ मुठभर, साम्राज्याचा खचला पाया' या वाक्याच्या उत्तरार्धाविषयी मनात का कुणास ठाऊक खिल्लीच दाटून येते. पण या लेखातून या सत्याग्रहामागची गांधीजींची व्यापक भूमिका समजायला मदत होते. आणि खरोखरच या साध्याशा वाटणार्‍या सत्याग्रहातून ब्रिटिश साम्राज्याचा पाया गांधींनी कसा हादरवला हेही कळते.

ऑनलाइन प्रेम

लेखक फ्रॅक्चर बंड्या यांनी गुरुवार, 12/11/2009 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
ऑफिसात नसलीस की हिरमुसतो मी सध्या तर गम्मतच ऑनलाइन झुरतो मी कधी तु बिझी, कधी तु अवे तुझ्याभोवतीच ऑनलाइन पिंगा घालतो मी असलीस ऑनलाइन की तासनतास तुझ्याच फोटोकड़े बघतो मी डेरिंग नाही होत पिंग करायची नावावर उगाच माउस नेतो मी तु नसतेस ऑनलाइन, तरी उगाच तुला ऑफलाइन पिंगतो मी कम्युनिकेटरवर गप्पांचा पाउस समोर आलीस की मात्र गप्प बसतो मी बीसीसी मध्ये तुला एकटीलाच ठेउन प्रेम कवितांचा ईमेल धाडतो मी काय अन कसे सांगु मी चॅटिंग करता करता ब्लशतो (लाजतो) मी काहीतरी शोधायची ओढ आहे मनात हजार वेळा जुनेच चॅट लॉग रिडतो (वाचतो) मी सध्या कामात लक्ष कुठे आहे आजकाल ऑनलाइन कविता पाडतो मी ज़रा विचित्रच आहे ना मी प

शोध विचारवंताचा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 12/11/2009 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो, हॅ हॅ हॅ परा आहे का ? नाना बोलतोय." "बोल रे नॅन्स, आज एकदम फोन वगैरे ??" "अरे बाबा परा, तुझी मंडईत ओळख आहे ना ? स्वस्त दरात भरपुर बटाटे खरेदी करायचे आहेत. कधी भेटतोस ?" "तेज्यायला... नान्या, काय 'बटाट्याची भाजी' वाचुन अंमळ पेटलास का काय ?" "आमचे कडे कशाचाही कशाला बादरायण संबंध लावुन विनोदी लिहुन मिळेल. चिल्लर मधे बसेस फोडुन मिळतील. अधिक माहिती व्यनीमधुन" "*ट काही कळले नाही बे नान्या, निट समजावुन सांग जरा मला !" "ते विचारवंताना विचार" इती नाना. "अरे पण नान्या हे विचारवंत कुठे असतात ? त्यांना ओळखायचे कसे ?

प्रकाशाच्या उंबरठ्यावर - एक ढकलपत्र

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी गुरुवार, 12/11/2009 10:59 या दिवशी प्रकाशित केले.
एका ढकलपत्रातून आलेला मजकूर, अनेकांना माहिती व्हावी असं वाटलं म्हणून इथे चढवत आहे. "प्रकाशाच्या उंबरठ्यावर" या भाऊ गावंडे लिखित आणि "ग्रंथालीने" प्रकाशित पुस्तकावर आधारित १४ नोव्हेंबर, बालदिनानिमित्य "जिंकी रे जिंकी" या सिनेमाचे "झी टॉकिज" या वहिनीवर खास प्रसारण अत्यंत वाया गेलेलं मूल, खूपच खोडकर उपद्रवी असं. त्याच्या परित्यक्ता मजूर असलेल्या आईलाही नकोसं झालेलं. आपली उपजिविका तुटपुंज्या मजुरित एक हे असं मूल आणि एक मुलगी यासह पुरी करतांना नाकी नऊ आलेली आई. या मुलाने रोज कुणाची ना कुणाची खोडी काढल्याने अत्यंत त्रासून गेली.

प्रश्न

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 12/11/2009 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
महाभारत वाचल्यावर एक प्रश्न मनात आला कोण आईबाप आपल्या मुलान्ची नावे वाईट ठेवेल? कोरवान्ची नावे दुर्योधन, दु:शासन अशी होती. त्यान्च्या बहिणीचे नाव तर दु:शला का दु:शीला होते. बर त्या काळात अशी नावे ठेवण्याची पध्दत होती असे म्हणावे तर युधिष्ठिर त्याला दुर्योधन न म्हणता सुयोधन म्हणत असे. म्हणजे ह्या नावान्चा अर्थ वाइटच होता तुम्हाला काय वाटते?

गोष्ट

लेखक अरभाट आणि चिल्लर यांनी गुरुवार, 12/11/2009 02:02 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला प्रत्येकाला लहानपणी २ गोष्टी सान्गितल्या होत्या. त्यातली एक छोटी आणि दुसरी न सम्पणारी. छोटी गोष्ट म्हणजे एक होत गाव, त्या गावात होत एक पोस्ट, सम्पली आमची गोष्ट. दुसरी न सम्पणारी गोष्ट म्हणजे एक धान्याच कोठार होत, तिथे एक चिमणी आली, एक दाणा घेतला आणि उडून गेली. दुसरी चिमणी आली एक दाणा घेतला आणि उडून गेली. तिसरी चिमणी आली......... या गोष्टीचा आपल्याला लहानपणी खूप राग यायचा पण आता अस नाही का वाटत की आयुष्यात बर्‍याच गोष्टी रिपीट होत असतात, मग ते रोजच जीवन असो, पिक्चर असो किन्वा इतर काही.

मेक्सिकन हॉट चॉकलेट

लेखक स्वाती२ यांनी गुरुवार, 12/11/2009 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
गणपा यांच्या कोल्ड कॉफी मुळे जीभ तर चाळवली पण बाहेर थंडी. तेव्हा कोल्ड कॉफी एवढेच मला प्रिय असलेले हॉट चॉकोलेट केले. या वेळचे चॉकोलेट मिक्स थोडे वेगळे. घरी बनवलेले, मेक्सिकन चवीचे. ही पाकृ आहे इझाबेलाज कॅंटिना मधली. बघा आवडतेय का. चॉकोलेट मिक्स साहित्य १ कप सेमीस्वीट चॉकलेट चिप्स १/२ कप साखर १ टे. स्पून दालचिनी पावडर कृती सर्व एकत्र करुन ग्राइंडर मधून बारीक पावडर करुन घ्या. हवाबंद डब्यात भरून ठेवा. हॉट चॉकोलेट साहित्य १ कप दूध २ टे.

(रिप्लाय /प्रतिसाद)

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 11/11/2009 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
कच्च्या मालाचे पुरवठादार एक धागा काढायचा योग आला होता...धाग्यात लिहीले होते कि रिप्लाय /प्रतिसाद देवु नेये. स्मायली, +१ पण लिहु नये... हि पध्धत रुढ होत चालली आहे....आपणास काय वाटते? असे असावे कि नको..?..मला वाटते कि प्रतिसाद न घेणे व न देणे योग्य आहे....आपणास काय वाटते? यावर असेहि एक मत आहे कि प्रतिसाद न देता धागावाचनास गेले कि लोक म्हणतात "आले फुकट वाचायला.." काहि ठिकाणी तर किति प्रतिसाद आले हे वेगळा धागा काढून सांगीतले जाते..रिप्लाय च्या मालकावरून काय ठरते? सामाजिक मत?