Skip to main content

"महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?"

लेखक बट्ट्याबोळ यांनी बुधवार, 20/01/2010 21:30 या दिवशी प्रकाशित केले.
http://timesofindia.indiatimes.com/pollslist/2238809.cms वरिल पोल मधे तुमच मत द्या .. पोल असा आहे : "महाराष्ट्रा मधे बाकिच्यांना taxi परमिट न देण्याचा निर्णय नैतिक अधोगतिचा आहे काय ?" नाही म्हणून उत्तर द्यावे !!

(कुठे भास होतो मला 'कोंकणाचा')

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 20/01/2010 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञानेश यांची अप्रतीम गजल 'कुठे भास होतो तुझ्या कंकणांचा' वाचली आणि सगळे भास खरे वाटायला लागले! ;) कुठे भास होतो मला 'कोंकणा'चा, 'रिया' रोज स्वप्नी बुलावे कुठे... हजारो दिशांनी मला हाक येते, कलत्रास सोडून जावे कुठे? 'पमी'ची, 'निशे'ची, 'नितू'ची, कधीची जरी लाख आलीत आमंत्रणे.. रमेनेच ज्याला असे वात अणला, अशा दादल्याने पहावे कुठे? तसे झाकले खूप काही परंतु, तरी राहिले खूप झाकायचे मिळाले तिला फोन माझे अरेरे, कळेना अता मी लपावे कुठे? लपावे जरासे अशी रूम नाही.. करी तात वेडा पहारा खडा असे बंधुही ज्या मुलीचा घिसाडी..
काव्यरस

पंजाबी समोसा

लेखक गणपा यांनी बुधवार, 20/01/2010 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंडळी चहाची चेळ झालीये. वाफाळणार्‍या चहा सोबत मस्त गरमा गरम समोसे हाणु. साहित्यः ३-४ मध्यम आकाराचे बटाटे उकडुन, थोडेसे कुस्करुन. १/२ वाटी हिरवे वाटाणे /मटार.

वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती

लेखक सुहास यांनी बुधवार, 20/01/2010 05:33 या दिवशी प्रकाशित केले.
वेगळे विदर्भ राज्य आणि महाराष्ट्रातील वीजनिर्मिती आज २० जानेवारीला विदर्भात वेगळ्या विदर्भ राज्यासाठी हरताळ पाळण्यात येत आहे. काही राजकीय पक्षांनी आणि संघटनांनी त्याला पाठींबा दिलाय (यात काँग्रेस आणि (पश्चिम महा)राष्ट्रवादी काँग्रेस देखील सामील आहेत). फक्त स्वतःसाठी एक वेगळे राजकीय कुरण मिळावे हाच या राजकीय पक्षांचा हेतू आहे हे स्पष्ट आहे. मला स्वतःला वेगळे विदर्भ झाल्यानेच तेथील समस्या सुटणार असतील तरच ते वेगळे राज्य व्हावे असे वाटते.. असो.

हे चित्र पहा आणि ते चित्र पहा"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 20/01/2010 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
"हे चित्र पहा आणि ते चित्र पहा" चिंतन करताना.शेक्स पीअर च्या नाटकातल वाक्य आठवल."हे चित्र पहा आणि ते चित्र पहा" स्विमिंग पुल मधें, लहान मुलीं, कोवळ्या कळ्या पोहण्याचा ड्रेस घालुन पाण्यात पोहत होत्या.. पाणि एकमेकांच्या अंगावर उडवत होत्या.. निळ्याभोर पाण्यांत मासोळ्या पोहतात असे वाटत होते.... गावात लहान मुलि डोक्यावर हंडा घेउन झपाझप चालल्या होत्या. झोपडीत प्यायला पाण्याचा थेंब नव्हता. नदिच पाणी आटल होत.. आत पात्राजवळ खोल खड्डा खणुन झीरपलेल पाणी करवंटीन हंड्यात भरायच होते पीण्यासाठी, झोपडीत प्यायला पाण्याचा थेंब नव्हता सोसायटीच्या आवारात मुल उभी होती. इस्त्रीचा कडक शाळेचा ड्रेस चकाचक शुज,मोजे,

एक मुलाकात... संदीप कुलकर्णीशी.

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 19/01/2010 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर महिन्यातील एक शुक्रवार, स्थळ- ग्रँड सिनेप्लेक्स दुबई. दुबईत प्रथमच एका मराठी चित्रपटाचा प्रिमियर शो होत होता. 'गैर' हे त्या चित्रपटाचे नाव. दुबईतल्या एका प्रतिष्ठीत मल्टीप्लेक्स मधे हिंदी आणि इंग्लिश चित्रपटाच्या बरोबरीने एक मराठी चित्रपट दिमाखाने झळकत होता. हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीलेल्या मराठी माणसाचे उर अभिमानाने भरुन येत होते आणि कारण हि तसेच होते की. ३ हॉल्समधे एकाच वेळी ह्या चित्रपटाचे स्क्रीनींग होत होते. एकुण वातावरण प्रचंड उत्साही होते आणि त्याला एका उत्सवाचे स्वरुप प्राप्त झाले होते.

सध्याचे वाचन ...

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 19/01/2010 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच पुणे फेरी मधे काही पुस्तके विकत घेउन आलो. तु.मा.सा. इथे डाकवत आहे: १. चर्चबेल लेखकः ग्रेस ललित लघुनिबंध आहेत ग्रेस यांचे. सुंदर भाषा, कधी कधी दुर्बोध वाटणारे ग्रेस यातही तसाच वावर करतात. वाचताना त्यांच्या भावविश्वाची, विविध गोष्टींकडे बघण्याची त्यांची कवी-द्रुष्टी यांची अनुभुती येते. एका निळ्या जगात, जेथे आपण एकटे असतो, तेथे हे पुस्तक आपल्याला घेउन जाते. सुंदर लेखन !! जरूर वाचा. २. पांगिरा. विश्वास पाटिल यांची सुंदर कादंबरी. एका गावाची ही कथा आहे.

नटरंग ने किति पैसे कमवले ?

लेखक बट्ट्याबोळ यांनी मंगळवार, 19/01/2010 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
नटरंग ने किति पैसे कमवले ? कोणाला काही अंदाज ? "३ मुर्खांनी" ५०० करोड कमवले म्हणतात .. अधिक्रुत माहिती असेल तर डाकवावी. किंवा अंदाज बांधावा ...

वाट चुकवेल वाट

लेखक क्रान्ति यांनी मंगळवार, 19/01/2010 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा नवी धून छेड, जुने राग गाऊ नको वाट चुकवेल वाट, वळणांनी जाऊ नको रानवारा अंगणात, गुणगुणेल कानात, तुला वेळूच्या बनात बोलावेल; जाऊ नको धुंद केवड्याचे रान, गंधमुग्ध पान पान, हरपून गेले भान, असे वेड लावू नको माझ्या भाळी गोंदले तू गर्द पळसाचे ऋतू भावबंधाचे हे सेतू ओलांडून जाऊ नको येता सांज अंधारून, कशी निघू रे घरून? काळवेळ विसरून आर्त साद देऊ नको नको घाई, जरा थांब; पावसात चिंब चिंब ओंजळीत चार थेंब, टिपून ते घेऊ नको
काव्यरस