Skip to main content

लताबाई, माज, बाणा, पंगा वगैरे

लेखक सन्जोप राव यांनी बुधवार, 03/02/2010 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
"लताबाईंबद्दल भलतंसलतं बोलशील तर सूर्यावर थुंकशील. लोक जोड्यानं हाणतील तुला धरुन." सिगारेट ओढणारा माझा मित्र म्हणाला. "भलतंसलतं म्हणजे?" "म्हणजे हेच तू आत्ता जे म्हणत होतास ते. त्या तिरुपतीला गेल्या होत्या तेंव्हा त्यांची राजेशाही बडदास्त ठेवली नाही म्हणून त्या आंध्र प्रदेश सरकारवर नाराज झाल्या वगैरे.." "अरे,मग ते खरं नाही का? पेपरमध्ये छापून आलंय तसं..." "कुठल्या पेपरमध्ये? सकाळमध्ये? सकाळवर किमान तू तरी विश्वास ठेऊ नयेस" तो धूर सोडत म्हणाला. "फक्त सकाळमध्ये नाही. बर्‍याच पेपरांत आलंय. बरं ते जाऊ दे. त्या अमिन सायानींना दिलेल्या मुलाखतीचं काय? "काय त्याचं?" "काय म्हणजे ...

गोभी मंचुरीयन - गोभी ६५

लेखक गणपा यांनी बुधवार, 03/02/2010 08:32 या दिवशी प्रकाशित केले.
काल अंगारिका संकष्टी चतुर्थी होती. ऑफिस मध्ये गेले २-४ दिवस बरच काम होत. त्यामुळे लंच टाइम मध्ये घरी येउन साबुडाण्याची खिचडी वगैरे करायला फुरसत नव्हती. त्यामुळे काल निर्जळी उपवासाच पुण्य आयतच पदरात पडल. संध्याकाळी घरात पाऊल ठेवल्यावर पोटातल्या कावळ्यांनी आवाज दिला. देवाला नैवेद्य तर ठेवायचा पण नेहमी सारख साग्रसंगीत ताट करण्याच त्राण नव्हत. त्यामुळे पटकन होणार चायनीज करायच ठरवल. म्हटल तेवढच देवालापण जरा चेंज ;) फ्रिज मधल्या कच्च्या मालाचा अंदाज घेतला. जास्त भाज्या नव्हत्या पण फ्लॉवर, भोपळी मिरची, पाती कांदा दिसला.

समुद्रकिनार्‍यावर

लेखक अश्विनीका यांनी बुधवार, 03/02/2010 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
जलपैंजण - एक छोटी मुलगी समुद्राच्या पाण्यात खेळत असताना पाण्याची लाट तिच्या पायावरून मागे जात असताना हा फोटो काढला. शंख

कोकणातली भटकंती...

लेखक विमुक्त यांनी मंगळवार, 02/02/2010 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
सोमवारची रजा टाकून मस्त ३ दिवस सुट्टी मिळवली आणि दुचाकीवर कोकणात भटकून आलो... मी आणि रव्या असे आम्ही दोघेच होतो... काहीच प्लान नव्हता... "मिळेल ते खायचं, पडेल तिथे रहायचं आणि निव्वळ भटकायचं" हा एकच हेतु होता... पहिल्या दिवशी पुणे - महबळेश्वर - पोलादपूर - खेड - चिपळूण - मार्गताम्हाणे - वेळणेश्वर असा साधारण २९० कि.मी. चा प्रवास केला... दुपारी २ वाजता वेळणेश्वरला पोहचलो... वेळणेश्वरच्या समुद्र-किनाऱ्या वरुन संध्याकाळी सुंदर सुर्यास्त अनुभवला... रात्री निवांतपणे पुळणीत बसलो...

आठवण...(२)

लेखक प्रभो यांनी मंगळवार, 02/02/2010 20:40 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस झाले तुला पाहून तुझा सुगंध माझ्या श्वासात भरून डोळ्यात साठवलेल्या त्या सुंदर चेहर्‍यावर अन तुझ्या फोनवरच्या आवाजावर समाधान मानतोय ऑफिसच्या जिन्यावरचा तो चहा ती शेअर केलेली कॅडबरी बस मधे बसून ऐकलेलं 'जरा जरा' नंतरच्या त्या फोनवरच्या गप्पा सगळ्याची आठवण येतेय आजही माझ्याकडे आहे तुझा तो पहिला मेसेज आणी पहिल्या शॉपिंगचा शर्ट आज तोच शर्ट घालून ऑफिसला जावे म्हणतोय
काव्यरस

कारे प्रिया दूर जाशी,

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
चिम्ब चिम्ब वाटा, चिम्ब चिम्ब झाडे, आसमंती मन होते, चिम्ब चिम्ब वेडे..... वरुण राजा आज कैसा, धरित्रिला कुरवाळितो सोडुनिया आकाश घरटे, प्रिये कड़े झेपावतो..... कारे प्रिया दूर जाशी, अश्या चिम्ब वेळी, दाट धुक्याचे कोंदण माझे, अंग अंग जाळी......... सागर लहरी

मराठी जुनी पुस्तकं 'डिजीटल ग्रंथालयात'

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 02/02/2010 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी भाषेत जुन्यातील जुनी पुस्तकं मिळणे दुर्मिळ झालेली आहेत. वेगवेगळ्या भारतीय भाषेतील जुनी पुस्तकं वाचकांना उपलब्द्ध व्हावीत म्हणून भारत सरकारने अशी जुनी पुस्तके स्कॅन करुन ती 'डिजीटल ग्रंथालयात' ठेवलेली आहेत. या कार्यात भारतातील नावाजलेल्या आणि दर्जेदार शैक्षणिक संस्थानी देखील मोलाची मदत केलेली आहे. जसे की Indian Institute of Technologies, Indian Institute of Science. पुस्तकांची संख्या इतकी आहे की एका वेळी कुठले वाचू.. हे की ते असे होते. तुम्हाला हे दुवे पाहून नक्कीच आनंद होईल.

हक्क

लेखक नीलांबरी यांनी मंगळवार, 02/02/2010 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. कोणत्याही क्षणी पाऊस बरसायला सुरुवात होणार होती. हा असा उदास दिवस वैदेहीला मुळीच आवडत नसे. त्यातून आज श्याम उशिराच घरी येणार होता. अन सुशांत त्याच्या मित्राकडेच रहाणार होता अभ्यासासाठी. काही प्रोजेक्ट्स पूर्ण करायचे होते दोघांना मिळून. म्हणजे रात्री दहा पर्यंत वैदेही एकटीच होती घरी. दुपारपासून कुठे कपाट आवर, कुठे पुस्तक वाच असं करून अंगावर येणारा वेळ कसा बसा काढला होता वैदेहीनं. पण आता फ़ारच कंटाळा यायला लागला होता तिला.स्वैपाक उरकला, डिशवॉशरही लावून झालं, आता मात्र ती पुरतीच वैतागली होती.