हडसर ऊर्फ पर्वतगड
१० दिवस आधी ठरलेली २ दिवसांची नागाव-काशिद-दिवेआगर सहल मित्रांच्या काही अपरिहार्य कारणांमुळे रद्द झाली. पण घेतलेली सुट्टी तर रद्द करता येत नाही मग त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी आणी माझा आत्येभाऊ असे दोघे जण शनिवार दि. १३ ला पहाटे ५.४५ वाजता हडसर उर्फ पर्वतगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालो. अर्थात रात्रीच सगळे जाण्याचे नियोजन करुन ठेवले होते.
सकाळी ६.२० ला नाशिकफाट्यावरुन एसटी बस मिळाली. ७.४५ पर्यंत नारायणगाव व तिथून जीपने ८.१५ पर्यंत जुन्नर. वाटेत मानमोडीची लेणी लक्ष वेधून घेत होती. जुन्नरला महाराजांच्या जन्मस्थानाला खालुनच अभिवादन करून आम्ही ९.१५ च्या राजूर नं. १ च्या एसटी बसने निघालो.
मिसळपाव