Skip to main content

'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

लेखक पाषाणभेद यांनी शनिवार, 27/02/2010 03:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज २७ फेब्रुवारी. वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) यांचा जन्मदिन म्हणजेच आपला मराठी भाषा दिन. तमाम मराठी बांधवांना 'मिसळपाव' परिवाराकडून 'मराठी भाषा दिनाच्या' शुभेच्छा!

हे श्लील की अश्लील?

लेखक युयुत्सु यांनी शुक्रवार, 26/02/2010 23:13 या दिवशी प्रकाशित केले.
याज्ञवल्क्य स्मृती मध्ये असलेल्या याज्ञवल्क्य-मैत्रेयी संवादात एक वाक्य आहे. ते असे - सर्वेषामानन्दानामुपस्थमेव निधानम् | अर्थ - जननेन्द्रीये ही सर्व आनन्दाचे मूळ स्थान आहेत. आता हे मला सांगा की हे विधान श्लील की अश्लील?

नवीन मराठी संस्थळ- http://thinkmaharashtra.in/

लेखक रामदास यांनी शुक्रवार, 26/02/2010 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकर, येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे. मी आणि तात्या याप्रसंगी होणार्‍या चर्चेत सहभागी होणार आहोत. मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे. सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे. समस्त मिपाकर आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती. आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.) आमंत्रणाची प्रत देत आहे. धन्यवाद. ************************************************************************ मा.

Ted .com चा वापर व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी

लेखक शनआत्तार यांनी शुक्रवार, 26/02/2010 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, आपण मला माझ्या लेखनाला चांगली दाद दीली त्या मुळे मला माझे प्रकल्प सर्वांपर्यंत पोचवण्यास नवा हुरूप आला. मित्रांनो मी या वर्षी राबवीत असलेल्या एका प्रकल्पा बाबत आपणास थोडक्यात माहीती करून देणार आहे. माझा हा प्रकल्प मी शिरगाव हायस्कूल शिरगाव, ता देवगड या ग्रामिण भागात असणा-या शाळेतील इयत्ता ९ वी व १० वी मध्ये शिकणा-या मुलांवर मी राबवत आहे. मित्रांनो माझ्या या प्रकल्पासाठी मी २२ विद्यार्थी व १२ विद्यार्थीनी अशी एकूण ३४ विद्यार्थी सहभागी आहेत. हा माझा प्रकल्प शाळा सुटल्यावर व सुट्टीच्या दिवशी आम्ही राबवत असतो.

हुसेन, हिंदू, त्यांच्या दुखावणार्‍या भावना आणि आमचं (अर्थात) शंकेखोर मन...

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 26/02/2010 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
मकबूल फिदा हुसेन यांना कतारचे नागरिकत्व बहाल झाल्याने जो उत्स्फूर्त भावनांचा अविष्कार भवताल व्यापून राहिला आहे, त्यामुळे आमचे शंकाखोर मन पुन्हा उसळी खाऊ लागले. भावनाविष्काररूपी अमृताच्या मंथनातून उत्पन्न झालेल्या काही शंका:
  • परकीय नागरिकत्व घेतल्याने अशा त्रासदायक, हरामी इसमाची आपसूकच आपल्या पवित्र देशातून मरेस्तोवर हकालपट्टी झाली, तर आम्हांस किंचितसा आनंद का बरे होत नाही? सभोवार इतका क्षोभ का?
  • या प्रकाराने आपल्या पवित्र देशाची नालस्ती कशी होते?

अरे हे काय चाललंय तरी काय?

लेखक राजेश घासकडवी यांनी शुक्रवार, 26/02/2010 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
विनाशकाले विपरीत बुद्धी ही म्हण जर खरी असेल तर माझा विनाशकाल जवळ आला असावा कारण नुकतीच मला कशी कोण जाणे पण विपरीत बुद्धी झाली. त्याचे परिणाम इतके वाईट झाले आहेत की मी त्या विनाशकाळाची आतुरतेने वाट पाहातो आहे. त्याचं असं झालं की मी म्हटलं भारतातून काही पुस्तकं मागवण्याची सोय आहे - तर मिपाकरांनाच विचारू, कुठची पुस्तकं वाचण्याजोगी आहेत ते. साधासुधा विचार पण एक साधी चूक कशी भोवू शकते याचा हा उत्तम नमुना आहे. मी सरळ मागचापुढचा विचार न करता काथ्या कुटायला टाकला. नव्वदोत्तरीतील वाचनीय/संग्रहणीय साहित्य. हळुहळू एकेक प्रतिसाद यायला लागले.

भट्कंती फोटो

लेखक विनोदबाण़खेले यांनी शुक्रवार, 26/02/2010 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
(|: खुप कंटाळा आला म्हणुन जरा............. इथे फिरुन यावेसे वाट्तेय्,परत एकदा , हे आहे अनट्च भिमाशंकर ,थोडा पाऊस पड्ला कि असे मस्त वातावरण

दिल्लीकरांचे प्रायवेट न्यूज चंनेल्स................ (भाग - २)

लेखक मंगेशपावसकर यांनी शुक्रवार, 26/02/2010 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो, सर्वप्रथम आपणास सांगू इच्छितो कि कृपया या लेखा कडे अर्थपूर्ण (प्रक्टीकल) कटाक्ष टाकावा व नंतर आपला अभिप्राय कळवावा. दिल्लीकरांचे हिंदी न्यूज चंनेल्स स्वत;ची मनमानी करत हवी ती टिप्पणी करतात. मला माहित आहे कि वाचकांना उदाहरण अपेक्षित आहे. खालील निदर्शनास आणलेल्या बातम्याकडे ह्यांचे साफ त्यांना सोयीस्कर दुर्लक्ष असते. १. उदा. रेल्वे अर्थसंकल्प, फक्त बिहार ते मुंबई व पुणे , यु.पी. ते मुंबई व पुणे , गोवाहाटी ते मुंबई व पुणे(कर्म भूमी एक्स्प्रेस परवाच लौंच झाली ), हे दिल्लीकर न्यूज चांनेल ह्या सर्व बातम्या फारच चवीने दाखवीत होते. पण मुंबई ची उपेक्षा उदा.