Skip to main content

नल सरोवर

लेखक Manish Mohile यांनी मंगळवार, 02/03/2010 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
दिनान्क ७ फेब्रुवारी २०१० - रविवार. सकाळी ६:१५ वाजता आम्ही घरून निघालो - नल सरोवर ला जाण्यासाठी. नल सरोवर पक्षी अभयारण्य - अहमदाबाद पासून साधारण ६० किलोमीटर दूर असलेले एक सरोवर. क्षेत्रफळ ११६ चौ. कि. या सरोवराच्या मध्ये छोटी छोटी बेटे आहेत . त्या बेटान्वर आणि सरोवराच्या पाण्यामध्ये पक्षी निरीक्षण करायचे. गुजरातमधले हे सगळ्यात प्रसिद्ध पक्षी अभयारण्य. दर हिवाळ्यात येथे खूप वेगवेगळे परदेशी पक्षी स्थलान्तर करून येतात. आम्हालाही काही दुर्मिळ पक्षी बघायला मिळतील अशी आशा मनात धरून आम्ही निघालो. साधरण तासा सव्वा तासाचे अन्तर. सकाळचा प्रसन्न करणारा गारवा वातावरणात होता.

सोहम

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी मंगळवार, 02/03/2010 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
आता रोजच यावसं वाटतं तुझ्याकडे, तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला, पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते, माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तुझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली. तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे पण तरिही वेडं मन तूला माणसात शोधायला जाते तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते आणि धावुन धावुन थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तुझी शितल छाया आणि अथांग प्रेम
काव्यरस

पायनॅपल कस्टर्ड

लेखक साईली यांनी मंगळवार, 02/03/2010 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
पायनॅपल कस्टर्ड साहित्य : १ अननस, १ चमचे कस्टर्ड पावडर, १/२ लिटर दूध, २ चमचे साखर, १ चमचा वेलची पावडर, २ चमचे व्हॅनिला आईस्क्रीम कृती : मंद आचेवर दूध आटवून घ्या. त्यानंतर १/४ कप वेगळं दूध घेऊन ते गरम करुन घ्या. या दुधात कस्टर्ड पावडर घालून नीट ढवळा. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्या. कस्टर्ड घातलेल्या दुधात आटवलेलं दूध घाला. मिश्रण ढवळत रहा. २-३ मिनिटे मिश्रण उकळू द्या. नंतर त्यात वेलची पावडर घाला. अननस चिरुन त्यात साखर घाला व फ्रीजमध्ये ठेवा. काही वेळाने हे तुकडे मिश्रणात घाला. सव्‍‌र्ह करताना त्यात व्हॅनिला आईस्क्रीम घाला.

उभ्या उभ्या विनोदः नॉर्थ कॅरोलिना

लेखक संदीप चित्रे यांनी मंगळवार, 02/03/2010 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, शनिवार -- ६ मार्च ह्या दिवशी नॉर्थ कॅरोलिनाच्या मराठी मंडळात आम्ही 'उभ्या उभ्या विनोद' (स्टँड अप कॉमेडी !) सादर करणार आहोत. अधिक माहितीसाठी हा दुवा बघा. http://rtpmm.org/sites/default/files/imagecache/Thumbnil/Holi2010.html त्या भागातले कुणी मिपाकर कार्यक्रमाला येणार असतील तर भेटायला खूप आवडेल.

फुलांच्या थव्यांनी..

लेखक प्राजु यांनी सोमवार, 01/03/2010 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ़ुलांच्या थव्यांनी तुला गं पहावे तुझा गंध लेऊन गंधीत व्हावे.. तुझे पाहुनी लाजणे गोजिरे हे वसंतास वाटे, 'पुन्हा मीच यावे' जसा चंद्र अवनीस बिलगून जावा तुझ्या सोबतीनेच मी ही जगावे सुरांना तुझा साज मंजूर व्हावा तुझे गीत ओठावरी या सजावे तुझ्या लोचनी स्वप्न रंगून जावे नि साकार ते, जीवनी मी करावे निशाणी तुझी गे प्रिये आज दे तू जगी सर्व, मी आज श्रीमंत व्हावे.. - प्राजु वृत्त : भुजंगप्रयात लगागा, लगागा , लगागा, लगागा
काव्यरस

भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....

लेखक मंगेशपावसकर यांनी सोमवार, 01/03/2010 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला .... भैया आला, भैया आला आणि येताना लोनढे घेऊन आला ....अशी जी मगां पासून आर्त चालवली आहे. पण उत्तर मुंबई मधील निग्रो आणि अवैध बांगलादेशी मध्य मुंबईतील नेपाळी,गड्वाली त्यांचाबद्दल नेते काय मिसळपाव वाले देखील सगळे मुग गिळून गप्प बसले आहेत कि काय असे वाटते........... मंगेश पावसकर

आमचा देश

लेखक सचिन थमके यांनी सोमवार, 01/03/2010 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
तुमच्या सारख आष्यभर एकिवर आम्हि नाहि थांबत आणि थांबनार पण नाहि कारण आमच्या देशात असं काहिं करण नाहि आम्हि एक ना दोन ना तिन लग्न करु शकतो कारण आमच्या देशात अट एकच तिघिना सर्व काहि समान अगदि नवरा सुधा समान समजा नहिच, पट्ल तर तिन वेळा तलाख तलाख तलाख कारण आमच्या देशात पाच हजार फेकावे आणि म्हणावे तलाख तलाख तलाख कारण आमच्या देशात तलाख नंतर, तिचा मार्ग वेगळा माझा मार्ग वेगळा मि दुसरीच्या शोधात ति दुसरयाच्या शोधात कारण आमच्या देशात बायकोचा शोध, बस थांब्यावर कार्याल्यात, क्लबमधे आणि महिविधालात मला एक ति मिळालि, ति सुधा अगोदरचाचि गरोदर कसा आहे आमचा देश आहो जगात आम्हि आहोत अगेसर तलाख देण्या