Skip to main content

शिवसेनेचा गुन्हा काय?

लेखक नील_गंधार यांनी गुरुवार, 11/03/2010 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम मी येथे हे नमुद करु इच्छितो कि मी शिवसेना ह्या पक्षाचा समर्थक/सदस्य वगैरे नाहि. गेले काहि दिवस हवतर काहि महिनेच म्हणा,शिवसेनेवर चहुबाजुने हल्ले होताना दिसतात. प्रसारमाध्यमे त्यातहि हिंदि/इंग्रजी माध्यमे,इतर राजकीय पक्ष,काहि मराठी वृत्तपत्रे,आयबीन नेटवर्कच्या सर्व वृत्तवाहिन्या वगैरे मंडळि शिवसेनेच्या हात धुवुन पाठिशी लागल्याचे चित्र दिसतेय. मुद्दा महाराष्ट्राच्या विकासाचा असो,मुंबईतील मराठी माणसाचा असो,हिंदुत्वाचा असो वा मराठीचा असो ह्या सर्वाच्या अधोगतीला शिवसेनाच जबाबदार आहे असा सुर ही मंडळि लावत असतात. निखिल वागळे,हेमंत देसाई,राजदीप सरदेसाई,प्रताब आसबे,राजीव खांडेकर,राजु परुळेक

..... पुन्हा पुन्हा !

लेखक जयवी यांनी गुरुवार, 11/03/2010 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
दाव तोच जीवना लावतो पुन्हा पुन्हा मृत्युला जगायला शिकवतो पुन्हा पुन्हा चांदणी कधी कुण्या अंबरास भार ना चंद्र मग उगाच का हरवतो पुन्हा पुन्हा आसवे न ढाळली मी कधीच पांगळी का तिच्यापुढेच मी भेकतो पुन्हा पुन्हा माज ही जुनाच शिरजोर आज ती पुन्हा आग तीच मी परी पोळतो पुन्हा पुन्हा हां...कबूल दुश्मनी जन्मजात लाभली बांध घालुनी दुवा सांधतो पुन्हा पुन्हा हात जोडुनी उभे सौख्य मजपुढे सदा व्यर्थ दशदिशात मी शोधतो पुन्हा पुन्हा जयश्री

पहिला पाउस

लेखक नाद्खुळा यांनी गुरुवार, 11/03/2010 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
पहिला पाउस .. शीघ्र कविता' रिमझिम धून ...आभाळ भरुनं (मूळ कवीची माफी मागून ) आला गार वारा सरताना फाल्गुन अशा एका सांजवेळी सरी ओसर ओसर पावसाच्या थेम्बालाही मग फुटतो पाझर थेंब थेंबाला मिळतो ,मग वारा मंद होतो क्षणापुर्वीचा पाउस क्षणामध्ये बंद होतो... कधी अक्राळ गर्जना कधी धरा चिंब चिंब रस्त्यामध्ये मधोमध एक भिजणारा खांब उना वारयासंगे मग पुन्हा प्रकाश प्रकाश फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश (मूळ कवीची माफी मागून ) -के गा

महदाश्चर्यम्!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 11/03/2010 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
महदाश्चर्यम्! मी या व इतर फोरम्सवर नेहमीच लिहीत आलोय् कीं लोकशाहीमध्ये आपण श्रेष्ठींना त्यांच्या धोरणांबद्दल व निर्णयांबद्दल आपला संतोष, राग-संताप त्यांच्यापर्यंत पोचवला पाहिजे व मी हे काम करत असतो, अगदी मनमोहन सिंग-जी, प्रतिभाताई, बराकसाहेब यांच्यापर्यंत!

MISALPAV CHAT

लेखक मंगेशपावसकर यांनी गुरुवार, 11/03/2010 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
मागील काही दिवस मला लेखकांशी व्यक्तिगत बोलायचे आहे असे त्यांचा प्रतिक्रियेमध्ये दर्शवले असता, चुकीचा समज करून घेण्यात आला. मला वाटत मिपा वरही ऑर्कुट प्रमाणे गप्पा करण्याची सोय असावी. कारण त्यामुळे लेखकाच्या लेखनाबद्दल आणखी जाणून घेता येते. त्याचा व्यक्तिमत्वाचा कानोसा घेता येतो. त्याची विचारसरणी कळते. आणि सर्वात महत्वाची गोष्ट तो लेख त्याच व्यक्ती ने लिहिला आहे कि नाही याची देखील प्रचीती येते, ह्याने नवोदित लेखकांना मदतच होईल असे मला तरी वाटते. जर वाचक सहमत असतील तर नक्कीच प्रतिक्रिया द्याव्यात.

नजर

लेखक प्रभो यांनी गुरुवार, 11/03/2010 09:21 या दिवशी प्रकाशित केले.

प्रिये तुझ्या नजरेत झाकू दे मला | प्रेमाचा एक संदेश सांगू दे मला ||

बोलूया नजरेनेच आज आपण | फूल आज प्रेमाचे फुलवू दे मला ||

नजरेच्या मोगर्‍यांचे वार हे सुगंधी | जखमेची ह्या तू दवा दे मला ||

खेळाची नजरेच्या मजा ही न्यारी | सुखासाठी आज त्या जगू दे मला ||

काव्यरस

ढोकळा

लेखक वैशाली हसमनीस यांनी गुरुवार, 11/03/2010 07:02 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य-----दोन वाट्या थोडेसे आंबट ताक,एक वाटी बेसन्,एक चमचा खण्याचा सोडा,मिरची कोथिंबीर्,मोहोरी,हिंग्,तेल,मीठ कृति---सुमारे चार तास ताकात बेसन भिजवून ठेवावे,नंतर पीठ थोडे फुगलेले दिसल्यावर त्यात मिरची वाटून ,चवीपुरते मीठ,खायचा सोडा घालावा.कुकरमधील एका भांड्याला तेल लावून त्यात मिश्रण ओतावे,कुकरची शिट्टी न लावता भांडे १० ते १५ मिनिटे कुकरमध्ये वाफवावे,सुमारे एक तासाने गार झाल्यावर वड्या पाडाव्यात व वरून मोहरी,हिंगाची फोडणी द्यावी.

वीजेची गायब-जादू!

लेखक अरुंधती यांनी बुधवार, 10/03/2010 21:45 या दिवशी प्रकाशित केले.
लहान असताना जादूच्या समस्त प्रयोगांनी मला जबरदस्त मोहिनी घातली होती. माणसाचे कबूतर होते, कबुतराची फुले होतात, फुलांचे रंगीबेरंगी रूमाल होतात.... आणि ह्या सगळ्या भरात मूळ कोणती वस्तू गायब झाली हेच तुम्ही विसरून जाता. जादूगार खूष, तुम्हीही खूष! पैसा वसूल!! पण गायब झालेली वस्तू मिळते का हो परत? अहो, ती जादू असते.... त्यात सर्व काही शक्य असते. जादूच्या ह्या नियमाला शिरोधार्थ मानणारी मी.... त्यामुळे एखादी वस्तू जादूने गायब झाली असे कोणी सांगितले तर त्यावर माझा लगेच विश्वास बसत असे. आजही परिस्थिती फारशी वेगळी नाही.