दत्तकविधान-८
एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरांकडे जाण्याची औपचारिकताच बाकी आहे, असा आमचा समज होता.
...पण प्रत्यक्षात तो खोटा आहे, हे कळायला पुढचे चार दिवस जावे लागले.
बाळाला डॉक्टरांकडे घेऊन जाण्यासाठी मी
संस्थेत गेलो, तेव्हा तर मोठी धमालच झाली! बाळाला न्यायचं, त्याला
पहिल्यांदाच छातीशी धरायचं, उन्हातान्हाचा त्रास नको, म्हणून मारे कार
घेऊन गेलो होतो. सोबत सासूबाई होत्या. त्याला पाहून त्या त्यांच्या
कामासाठी दापोडीला जाणार होत्या. गाडी पार्क करून उतरताना नेमका एका
कुठल्याशा पीआरचा फोन आला. त्याला त्याचं कसलंतरी "दुकान' छापून आणायचं
होतं. फोनवर बोलता बोलता मी गाडीतून उतरलो आणि अगदी आठवणीनं दार लॉक करून
टाकलं.
मिसळपाव