Skip to main content

विलोभनीय नायगरा!

लेखक मीली यांनी शुक्रवार, 04/06/2010 03:25 या दिवशी प्रकाशित केले.
यंदा नायगरा ला जाण्याचा योग आला ,मेमोरिअल डे ची सुट्टी असल्याने लाँग वीकेंड मिळाला होता.खरे तर खूप लांब चा प्रवास होता पण नवरापण स्वखुशीने तयार होता ! शनिवारी खायचे ,प्यायचे घेवून डिकी भरून घेतली ,गाडी बरोबर आपल्याला पण पेट्रोल हवे ना!

सचिनचा अजून एक विक्रम...

लेखक विकास यांनी शुक्रवार, 04/06/2010 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
क्रिकेटमधला विक्रमादित्य सचिनने आज अजून एक वेगळा विक्रम केला आहे: वास्तवीक रेनवॉटर हार्वेस्टींग / पर्जन्य संचय हे आता नवीन बांधकामासाठी मुंबई महापालीकेने सक्तीचे केले आहे. पण, "शेजारी करतील मी कशाला करू?" अथवा "असले नियम सामान्यांसाठी असतात, व्हिव्हिआयपींना नसतात" असे गृहीत धरले जाते... मात्र नुकताच बांद्र्याला नवीन बंगला घेत असताना तेंडूलकर दांपत्याने पर्जन्य संचय करण्यासाठी टाकी बांधून अतिरीक्त वापरासाठी १० लाख लीटर्स पाणी पावसातून गोळा करायचे ठरवले आहे. अर्थात त्यामुळे एकट्या सचिनच्या कुटूंबाकडून मुंबईचे १० लाख लिटर्सचे पाणी वाचणार आहे!

शिवाजी महाराज-एक धीरोदात्त राजा.

लेखक चिन्या१९८५ यांनी गुरुवार, 03/06/2010 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
शिवजयंतीनिमित्त्य शिवरायांवर मी लिहिलेले एक भाषण येथे लिहित आहे.अर्थातच श्रोते मंडळी इतिहासाची अभ्यासक नसल्याने फार खोलात जाउन लिहिलेले नाही.
  • गंगा-सिंधू-यमुना-गोदा कलशातुन आल्या
  • शिवरायाला स्नान घालुनी धन्य धन्य झाल्या
  • धिमी पाउले टाकीत येता रुद्राचा अवतार
  • अधीर हृदयातुनी उमटला हर्षे जयजयकार
छत्रपती शिवाजी महाराज हे तीन शब्द नुसते उच्चारले की सर्रकन अंगावर काटा उभा रहातो.महाराष्ट्रातच नाही,भारत देशातच नाही तर संपुर्ण विश्वात अतुलनीय्,अद्वितीय्,अलौकीक असा दुसरा शिवाजी राजा सापडण अवघड आहे.जगातल्या साहसी,पराक्रमी आणि सफल अशा राजांमध्ये शिवाजी महा

महिन्याचे वाढदिवस

लेखक आर्य यांनी गुरुवार, 03/06/2010 22:55 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याकडे लहान बाळाचे - दर महिन्याला (एक वर्षापर्यंत) वाढदिवस साजरे करण्याची प्रथा आहे. दर महिन्याला वेगवेगळे पदार्थ करुन हे साजरे केले जातात, हे पदार्थ बाळाची वाढ-दर्शवणारे असतात. उदा: १ महिना -घावन / धिरडे, महिना २ - जिलेबी / कडबोळी - रिंगण घातल्यावर / गोल फिरल्यावर महिना ३ - करंजी (कुशीवर झाल्यावर) असे आणि या पुढील वाढदिवस कसे साजरे केले जातात याविषयी माहिती हवी आहे !

भोचकपणा नुसता.....

लेखक भानस यांनी गुरुवार, 03/06/2010 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी आपण सहजच खूश असतो. म्हणजे खास काही कारण नसतेच. आतून अगदी छान, उमलून आल्यासारखे वाटत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीही अशावेळी आपला आनंद वाढवत राहतात. नेहमीसारखाच गजर टाहो फोडून आक्रंदतो.... एरवी त्याचा गळा दाबणारी मी आज आधीच जागी झालेली असते. मिटल्या डोळ्यांनी अंथरुणाची न सोडवणारी उब अनुभवत पडून असते. आज झोपही पूर्ण झाल्यासारखी ..... तृप्त. गजर हलकेच बंद करते. खिडकीतून तुकड्यातुकड्याने दिसणाऱ्या आभाळाकडे टक लावून पाहत खुदकन हसते. तेही लगेच प्रतिसाद देते. " अरे वा! आज मूडमे हो क्या....... चक्क माझ्याकडे तुझे लक्ष गेले.... तेही पहाटे पहाटे.....

गारांचा पाऊस

लेखक अरुंधती यांनी गुरुवार, 03/06/2010 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बऱ्याच काळानंतर मी गारांचा पाऊस अनुभवला. खूप मस्त वाटले. विजांचा कडकडाट, जोरदार वारे वगैरे वातावरण निर्मिती तर अगोदरच झाली होती. आभाळातून सपसप काही थेंब वानगीदाखल बरसूनही झाले होते. मग अचानक पुन्हा एकदा एक जोरदार वावटळ आली. सगळीकडे नुसती धूळच धूळ! कोंदलेल्या आभाळाकडे एक कटाक्ष टाकत मी खिडक्यांवरचे वाळ्याचे पडदे वर गुंडाळू लागले. पण वाऱ्याला कुठे चैन पडत होते! त्या पाचेक मिनिटांत त्याने भरपूर खोडसाळपणा करून मला पार त्रस्त करून सोडले! कधी डोळ्यांमध्ये धूळ उडवून, कधी खिडक्यांच्या तावदानांना हीव भरल्यागत थडथडा आपटवून तर कधी आपल्या द्रुतगतीवर वाळ्याच्या पडद्यांना जोरदार हेलकावे देऊन!

कविता होताना!

लेखक नीधप यांनी गुरुवार, 03/06/2010 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
"कविता येत्ये, बाहेर काढ तिला" मैत्रिणीने फर्मान सोडलं. मला कविता होतेय आणि मलाच माहीत नाही हे कसं काय घडलं बुवा आणि हिला कुठून समजलं हे? खरंतर खूप खूप दिवस वाट बघत होते काहीतरी बरं लिहिलं जाईल हातून याची पण 'क्रिएटिव्हिटीच्या भुताला' शिव्या घालण्यापलिकडे काही घडत नव्हतं... मग मैत्रिणीने कोडंच घातलं... "परवापासून बघत्ये; नुस्त्याच ओळी ओळी.... कधी पूर्ण होणार कवितेची रांगोळी?" असं आहे होय.. अतीव कंटाळलेल्या घामट आणि सरभरीत अवस्थेत फेबुवर माझा संचार चालू होता. अचानक काहीतरी चुकीच्या टिचक्या पडल्या बहुतेक आणि सगळं काही एकाखाली एक दिसायला लागलं. जामच वैतागले.

मिसळपाव आणि अमेरिकन कायदा ...

लेखक sagarparadkar यांनी गुरुवार, 03/06/2010 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावला भेट देणार्या माननीय सभसदांना एक प्रश्नं आहे. अमेरिकेतील कायदे-कानू मिसळ्पाव वरील साहित्याला लागू होतात का? तसे असेल तर जगाच्या दुसर्या टोकाला राहणार्या एखाद्या सभासदाने काही आक्षेपार्ह लिहिल्यास त्यांस अमेरिकन कायद्याद्वारे अमेरिकेच्या खामगाव खुर्द च्या कोर्टात खेचता येते का? हे शक्य असेल तर त्याचाच दुसरा अर्थ असा काढता येइल कि अमेरिकेचा कायदा सर्व जगात लागू होतो.

मायभूमीची नवी मराठी वेबसाईट

लेखक मड्डम यांनी गुरुवार, 03/06/2010 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
मायभूमी.कॉम महाराष्‍ट्राच्‍या कडेकपा-या आणि दगड-मातीतून इथला इतिहास दरवळतो. आपल्‍या तलवारीच्‍या बळावर इतिहास घडविणारी पोलादी मनगटाची नररत्ने जशी या भूमीत जन्‍माला आली तशीच आपल्‍या अनुभव विश्‍वाच्‍या आणि शिक‍वणुकीच्‍या बळावर पोलादी समाज मन घडवणा-या संत विभूतींनीही या भूमीला आपल्‍या अस्तित्‍वाने पावन केले आहे.