Skip to main content

उन्हेरे - गरम पाण्याचे झरे

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 10/06/2010 05:19 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हेरे - गरम पाण्याचे झरे
"सुखोदकाने होई न्हाणे, दिले उन्हेरे देवाने"
सर्व ऋतुंमध्ये सर्वकाळ स्नानासाठी गरम पाण्याची योजना नियतीने उन्हेरे या गावी केली आहे. उन्हेरे हे गाव पाली (अष्टविनायक बल्लाळेश्वर- ता. सुघागड, जि. रायगड) येथून उत्तरेस २ किमी अंतरावर आहे.

वदनी कवळ घेता...

लेखक शिल्पा ब यांनी बुधवार, 09/06/2010 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
माझा छान छान फोटो असलेला धागा उडविण्यात आल्यामुळे फार्फार वाईट वाटत आहे...त्यामुळेच सगळे लक्ष खाण्यावर गेले आहे...मला बाकरवडी, जिलेबी, मेथीचे पराठे, मठ्ठा, मसाले भात, वांग्याची भाजी आणि कलिंगड खूप खूप आवडते....आता धागा उडविणार्यांचा जाहीर निषेध. असो, वदनी कवळ घेता...

धागा का उडाला ?

लेखक टारझन यांनी बुधवार, 09/06/2010 21:56 या दिवशी प्रकाशित केले.
संपादकांना व्यनि करण्यापेक्षा इथे धागा काढणे योग्य वाटले म्हणुन टाकला आहे. . माझा "आमचं यंदा कर्तव्य आहे " हा धागा का अप्रकाशित गेला ? ह्या पुर्वी सुद्धा आमचे धागे उडवले गेले आहेत , पण मी जाऊन दे म्हणालो ... पण हा धागा आमचा आवडता होता ... कोणाला मिर्‍या झोंबल्या ह्या धाग्या मुळे ? १. कोणताही धागा प्रत्येकाला आवडावा असा माझा कोणताही आग्रह नसतो (इनफॅक्ट कोणालाही आवडला नाही तरी काही खेद नाही) , त्यामुळे कोणाच्या "धागा आवडला नाही !! " म्हणुन कमेंट आल्या , आणि धागा उडाला हे उचित वाटत नाही. २.

इंग्रजी सिनेमातही घुमणार... शिवाजी महाराज की जय!

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी बुधवार, 09/06/2010 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
आताच मटा मध्ये वाचलेली बातमी येथे देत आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6026826.cms छत्रपती शिवाजी महाराजांवर आजवर अनेक पुस्तके लिहिली गेली, मालिका निघाल्या, मराठी सिनेमे आले. पण या जाणत्या राजाचे महत्त्व उभ्या जगाला कळावे यासाठी आता इंग्रजी सिनेमा येणार आहे. महत्वाकांक्षी कलादिग्दर्शक नितीन देसाई हा भव्यदिव्य प्रकल्प वास्तवात आणणार आहेत. महाराष्ट्राची अस्मिता असणा-या शिवाजी महाराजांबद्दल महाराष्ट्राबाहेर अनेक प्रवाद आहेत.

..पाऊस मोठा अस्सा यावा..

लेखक कानडाऊ योगेशु यांनी बुधवार, 09/06/2010 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मोठा अस्सा यावा! ---------------------------------- खोटा पैसा खरा व्हावा.. पाऊस मोठा अस्सा यावा. चिंबलेल्या पाण्यातुन मग.. लटका तुझा गुस्सा न्यावा. सोसाट्याचे वारे वहावे.. धूळ पाने उडवित जावे.. तुला पदरात लपेटून मग. वार्यालाही अडवित जावे.. स्वप्न सुंदर असे पडावे.. रागावलेली तू..खुशीत यावस.. रात्र बेचैन होताना मग.. मला अलगद कुशीत घ्यावस. थंडी अशी कडक पडावी.. घट्ट तुझी मिठ्ठी व्हावी.. खट्याळ तुझ्या डोळ्यात पाहुन.. मग कामावरही सुट्टी घ्यावी.. -- योगेश जोशी
काव्यरस

बोक्यांची काशीयात्रा...!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 09/06/2010 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर उंदीर खाऊन बोका चालला काशीला अशा अर्थाची हिँदी म्हण प्रसिद्ध आहेच. आमचे भिमाजी आप्पा साठीचे झाले तरी त्यांच्या हाती काठी न येता त्यांची तब्येत अजूनही तरणीताठी आहे याचं सर्वांना केवढं नवल! परंतु साठी पार करताच आप्पांनी चक्क अध्यात्मिक गप्पा मारायला सुरुवात केली. तसे पाहता तरूणपणीही ते कुणाच्या अध्यातमध्यात नसायचेच. त्याला कारणही तसं गोडसर होतं. त्यांचं कुटुंब जरा सैलसर होतं. म्हणजे जाडी-घेरानं नव्हे. संख्येनं मोठं होतं. मोठं म्हणजे फारही मोठ्ठं नाही. इन मिन तीन बायका अन् प्रत्येकीची चार चार पोरं. एवढाच काय तो त्यांचा गोतावळा.

लहानपणच्या आठवणी

लेखक वेदश्री यांनी बुधवार, 09/06/2010 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
"बेट्या, आता तू मोठा झालास. आता वेगळ्या ताटात जेवत जा." मी लहानपणी तिसरीत जाईतो बाबांच्या ताटात जेवायचे. यामुळे त्यांच्या तिखट खाण्याच्या प्रमाणाला आळा बसायचा त्यामुळे ते करवादायचे पण लहान लेकराला काय म्हणा म्हणून असा क्षीण प्रयत्न करायचे. "पुढच्या वर्षीपासून जेवत जाईन वेगळ्या ताटात. अजून मी छोटीच आहे." बागेत जाऊया, सर्कस बघायचीये, नवे बूट घ्यायचे वगैरे म्हटले की बाबांचे "पुढच्या वर्षी" हे उत्तर इतके ठरलेले असायचे की तेच उत्तर माझ्या तोंडून बाहेर पडल्यास नवल ते कसले? ~~~ बाबांच्या हापिसात बसून त्यांच्या कामात त्यांना मदत करण्याची मला कायम हौस.