Skip to main content

कातरवेळ

लेखक दत्ता काळे यांनी गुरुवार, 10/06/2010 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
पडवीत सांजअंधारी कवडसा मनाचा श्वास तुळशीच्या पणतीभवती मिणमिणतो मंद प्रकाश तु काय अवेळी येशी भासांत पैंजणी घुमती विटलेल्या उबेसाठी भरजरी शाल एकांती ? डोळ्यांच्या काठावरती तरळते तुझे बघ नांव पण हाय, नदीच्या काठी डोंबांचा अवघा गांव लसलसत्या काळोखात क्षीण जीव एकटा बसला विझणार्‍या टेंभ्यावरती वाघुळ करीतसे हल्ला
काव्यरस

दिसू लागले स्पष्ट जसे हे

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 10/06/2010 16:52 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा चित्त यांची नित्तांत सुंदर गझल दिसू लागले स्पष्ट जेवढे आणि मिपावरच्या गेल्या काही दिवसातील घटना दिसू लागले स्पष्ट जसे हे पैसे सगळे धूसर झाले सर्व निवासी परदेशी मग एक एक दृग्गोचर झाले चुकली त्याची वाट म्हणूनच कमावलेले नाव गमवले तोवर होता उशीर झाला आणिक मग हस्तांतर झाले संपादक झाल्यावर शिकला विनायास प्रतिसाद खरडणे अधी बरा तो लेखक होता, त्याचे माकड नंतर झाले वाचन करता-करता इतका लख्ख देखणा प्रकाश फुटला शरदिनितैंची पाटी फुटली अन् त्यांचे भडकमकर झाले पवार थत्ते धाग्यामध्ये इतिहासाचा चोथा कुटला जितके जितके वादळ उठले शांत कुठे सावरक

प्यार हुआ इकरार हुआ...

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/06/2010 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी अचानक रेडीओवर म्हणा किंवा येता जाता कुठे अवचित काही जुनी हिंदी गाणी अचानक कानावर पडतात. सुमधुर संगीत आणि तितकेच अर्थवाही शब्द यांचा सुंदर मिलाफ होतो. कधी कधी एखादे गाणे आपल्यावरच लिहिले आहे असाच भास होतो. काही गाणी मनाला आनंद देतात, दिलासा देतात. जगण्यासाठी कारण देतात. रागदारी, सा रे ग म यातलं काही मला कळत नाही. उगाच लै भारी असा भाव खाण्यासाठी एकुलता एक कळणारा राग पन्नास ठिकाणी लिहुन भास का मारायचा? नाही कळत म्हणजे नाही कळत. सगळ्याच गोष्टी आपल्याला कळल्याच पाहिजेत असे जरुरी नाही. फुलाचा वास येतो, अत्तराचा वास मोहवितो. बास.

नाच गं घुमा!!!

लेखक मस्त कलंदर यांनी गुरुवार, 10/06/2010 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच च उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्‍या आमच्या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री ९:३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण..

ड्रिबल, टॅकल, किक & सेव्ह : अध्याय पहिला ...

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 10/06/2010 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
इंग्लंडच्या लिव्हरपुल ह्या क्लबचा लिजंडरी मॅनेजर 'बिल शाँक्ली' म्हणतो "Some people believe football is a matter of life and death. I'm very disappointed with that attitude. I can assure you it is much, much more important than that". काय खोटे आहे त्यात ? ह्यावेळच्या चॅम्पीयन्स लीगच्या वेळी मॅन्चेस्टर युनायटेडचा सुपरस्टार व इंग्लंडचा मुख्य आधारस्तंभ असलेला 'वेन रुनी' हा बायर्नच्या पहिल्या मॅचच्यावेळी अतिताणामुळे पायाच्या मसल्स फाटल्याने जखमी झाला व त्याला त्या रात्री अक्षरशः पायाला फ्रॅक्चर करुन बाहेर पडावे लागले.
विशेष

हल्ली

लेखक तिमा यांनी गुरुवार, 10/06/2010 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली मिसळपाव खायला आलो की जुने दिवस आठवतात. झणझणीत, तोंडाला पाणी सुटणार्‍या किती डिशेस खाल्या त्याची आठवण येते. हली मिसळ खाताना बर्‍याचवेळा खडा लागून रसभंग होतो. एक चमचमीत डिश खाऊन 'रिपीट' ऑर्डर द्यावी तर पाणी वाढवलेली डिश समोर येते. कधीकधी डिश खूप आवडलेली असते पण ती खात असतानाच कुठूनतरी पारंबीला लोंबकाळून खराखुरा टारझन येतो आणि काय होताय हे कळायच्या आत आपल्या समोरची डिश घेऊन गायब होतो. आजुबाजूची अनेक गिर्‍हाईके एकाच डिशची फर्माईश करत आहेत म्हणून तीच मागवावी तर ती इतकी सपक निघते की आपली टेस्ट बिघडली आहे की पब्लिकची, असे वाटायला लागते. असो, "म्हातारपण वाईट" हेच खरे!!!

सॉरी शक्तिमान

लेखक टारझन यांनी गुरुवार, 10/06/2010 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
णमस्कार्स लोक्स , मला बालपणापासुन (म्हणजे कुबड्या खविस असल्यापासुन) संपादकांचा आदर आहे , त्यांनी वेळोवेळी कापाकापी करुन शांतता ठेवण्याचा जो प्रयास केलाय , त्याचाही मला आदर आहे . पण बिका म्हणतात तसा हल्ली टारझन नुसताच बकवास पणा करतो , आणि तोचतोचपणा आलाय त्याच्यात असा काहीसा अपेक्षावजा सुर लावला होता , म्हणुन म्हंटलं सगळ्यांना एकदा लेखण्या शिरियसली हातात घ्यायला लाऊ. आता परत परत बिकांची कमेंट वाचतांना हसु आवरत नाहीये. संपादकांच्या णिर्णयक्षमतेवर आपला पुर्ण म्हणजे पुर्ण म्हणजे पुर्ण विश्वास आहे. "धागा का उडाला ?" च्या गोंधळात जे जे बाजुने उभे होते त्यांचा पुर्ण आदर करत हा खुलासा करत आहे.