unicorn घोडा...
परवा औंध कडून डांगे चौकाकडे unicorn गाडीवर येत होतो. रस्ता पण साफ होता, नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो. पण रक्षक चौकात लाल सिग्नल आडवा आला आणि जरा हिरमोडच झाला. गाडीचे break दाबून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. फारसी वर्दळ नव्हती त्यामुळे मोजून ५-१० गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नल मोठा असल्यामुळे मी गाडी बंद करून इकडे तिकडे बघत होतो. अचानक मागून टप टप असा आवाज आला. घोड्याच्या टापांचा आवाज असल्यासारखा वाटत होता. आणि खरच तो तोच आवाज होता. मी मागे वळून बघितले. एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता.
मिसळपाव
कुणे धबधबा (पहिला टप्पा)
कुणे धबधबा (दुसरा टप्पा)