Skip to main content

राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

लेखक कशिद यांनी सोमवार, 14/06/2010 09:55 या दिवशी प्रकाशित केले.
"तशीच भाषा, तशीच शैली, तोच करारी बाणा. महाराष्ट्राच्या उदयासाठी पुन्हा जन्मला राणा.. मराठ्याची कधी कुणा कलली नव्हती किंमत... महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी साहेब, तुम्हीच दाखवली हिंमत.... उठ मराठ्या, जागा हो..अशी जेव्हा साद दिली..... मन सैनिकांनी...तेव्हा सर्वप्रथम दाद दिली...... आता आम्हा मराठ्यांमध्ये दिसणार नाही घबराट....... कारण या महाराष्ट्राला लाभलेत आता "मराठी ह्रदयसम्राट" मा. राजसाहेब ठाकरे याना वाढदिवसाच्या शुभेच्छा...अगदी मनापासून..!! आणि या महाराष्ट्रसाठी आपल्याला उदंड आयुष्य लाभों..हीच आई एकवीरा चरणी प्रार्थना..!! !! मनसे जय महाराष्ट्र !!

(गाडीवरचा तो हात!)

लेखक विकास यांनी सोमवार, 14/06/2010 05:23 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या लेखाची प्रेरणा ही चतुरंगचा "पाठीवरचा तो हात" हा खर्‍या अर्थाने हृद्य अनुभव आहे. त्यावरून जरी खालील अनुभव लिहीत असलो आणि म्हणून कंसात शिर्षक दिले असले तरी, ते चतुरंगच्या लेखाचे हे कृपया विडंबन समजू नये ही विनंती. त्याच्या लेखात महाराष्ट्रातील न भूतो न भविष्यती अशा निखळ व्यक्तीमत्वाचा जसा अनुभव आहे, तसाच ह्या लेखात अजून एक व्यक्तीमत्व जे कुणाला आवड न आवडो, त्याच्या शिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होणार नाही अशा व्यक्तीचा जाता जाता अनुभव आहे. इतकेच काय ते साम्य... माझी राजकीय विषयातील आवड लहानपणापासूनची. मी साधारण सातवीत, फार तर आठवीत होतो.

भेट तिची माझी

लेखक अरुंधती यांनी रविवार, 13/06/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
ती येईल का नक्की सांगितल्याप्रमाणे? की आयत्या वेळेस नवेच खेंगट काढेल? तिचा नवरा वैतागणार तर नाही ना, बायको सकाळी सकाळी तयार होऊन एवढी कोणाला भेटायला चालली आहे म्हणून? मी असेच काहीसे विचार करत घरातून निघाले तेव्हा सकाळचे सव्वा आठ झाले होते. कोपऱ्यावरच रिक्षा मिळाली. रिक्षावाल्याला ''रुपाली हॉटेल, एफ्. सी. रोड'' सांगितले आणि मी निवांत झाले. आज बऱ्याच वर्षांनी कॉलेजमधील दूर परराज्यात राहायला गेलेल्या एका मैत्रिणीला भेटायचा योग जुळून आला होता. गेला आठवडाभर आमचे वेळापत्रक एकमेकींशी लपंडाव खेळत होते. ज्या दिवशी तिला वेळ असे त्या दिवशी नेमके मला काम असे.

डाळिंब सोलण्याची कला

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी रविवार, 13/06/2010 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
डाळिंब व्यवस्थित सोलणे हे मनीचं गूज खोलण्याइतकंच कठीण काम असतं. मधुमिठास बोलणे काय किंवा इच्छित निसरगाठी खोलणे काय दोन्ही गोष्टी एकाच पाटातून वाहणाऱ्‍या! त्या वाहत्या, खळाळत्या प्रेमजलात (किंवा जालात म्हणा हवं तर) संबंधित प्रेमीजन कसे-किती-कोठवर वहावत जातील याचा अंदाज भल्याभल्यांनाही येत नसतो. पाटाने वहिवाट मोडल्यावरच भानावर येणं होतं! तद्वत डाळिंब सोलण्याअगोदर आत काय दडलंय? टिप्पूर दाणे आहेत की नुसताच भुललासी वरलिया रंगा असा प्रकार आहे, याचा अदमास ना चाकूला असतो ना काकूला. डाळिंब विक्रेती काकू कितीही म्हटली की ते झाडावरच टचकन् फुटलंय, यावर पटकन विश्वास ठेऊ नये बंधूंनो.