Skip to main content

मासे - कालव

लेखक जागु यांनी बुधवार, 07/07/2010 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
कालवाचे सुक्याचे साहित्य : कालव १ ते दोन वाटे १ मोठा कांदा ७-८ लसुण पाकळ्या ठेचुन हिंग, हळ्द मसाला १ ते २ चमचे चविपुरते मिठ १टोमॅटो किंवा ३-४ कोकम थोडी कोथिंबीर चिरुन तेल कालवांच्या सुक्याची पाककृती: प्रथम कालव साफ करायची. कालवांमध्ये दगडी कच असतात ते कालव हातात घेतली की हाताला लागतात. ते काढायचे. कालव धुवायची आणि कढईत तेलावर लसणाची फोडणी देऊन त्यावर कांदा गुलाबी रंगावर तळावा. आता त्यावर हिंग, हळद, मसाला घालून कालव घालावी वाफेवर थोडावेळ शिजु द्यावी.

जपान चित्रसफ़र - ३ ( कामाकुरा )

लेखक डोमकावळा यांनी बुधवार, 07/07/2010 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
या आधी जपान चित्रसफ़र - १ (असाकुसा मंदिर) जपान चित्रसफ़र - २ (ओदायबा) उंच इमारती , गजबजलेल्या मेट्रो आणि माणसांची प्रचंड गर्दी असलेल्या टोकियो पासून दूर गेलं की जपानचं बदलतं रूप पहायला मिळतं. उंच इमारतींच्या जागी पसरट टुमदार छोटी छोटी घरं, घरांच्या आजूबाजूला असलेली झाडे असलेलं कामाकुरा हे एक छोटस पण आकर्षक शहर. आणि टोकियो जवळच्या काही प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक.

काय बोलणे

लेखक सागरलहरी यांनी बुधवार, 07/07/2010 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
काय बोलणे, उगा रहाणे, गोंधळ चाले, शांत पहाणे ... उगा कसे मी अवचित काढू , बोलायाचे नवे बहाणे ? ओळख माझी मला पटेना, मी पणाचा अंत मिळेना .. तुजसाठी मी कुठून आणू , नवे सूर अन नवे तराणे ? वर वर सारे हसरे दिसती , काटे झेलून फुले दाविती, कोणा ठाउक कुठे ठेविती, कोम्ब व्यथांचे जुने पुराणे ? - सागर लहरी ०९-०६-२०१०

अ विंडमिल (अर्थात पाटा-वरवंटा!)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 07/07/2010 08:16 या दिवशी प्रकाशित केले.
परवा आंतरजालावरती बुद्धीबळासंबंधी एक लेख वाचत असताना कार्लो टोर्रे-रेपेट्टो ह्या मेक्सिकन खेळाडूबद्दल वाचले. ह्याचे नाव मी पहिल्यांदाच वाचले असल्याने उत्सुकता ताणली गेल्याने आणखीन थोडा धांडोळा घेतला असता एक अफलातून डाव हाती लागला! विंडमिल म्हणजे पवनचक्की. वार्‍याने पाती क्रमाक्रमाने फिरुन आवर्तन पूर्ण होते.

नेदरलँड अंतिम फेरित....

लेखक बबलु यांनी बुधवार, 07/07/2010 03:40 या दिवशी प्रकाशित केले.
उरुग्वे ला ३-२ ने मारून नेदरलँड अंतिम फेरित पोहोचली आहे. [माझ्या मते नाहितरी उरुग्वे किंचीत रडीचा डाव खेळून उपांत्य फेरीत पोहोचली होती (आठवा... घाना विरुद्धचा 'तो' हँडबॉल). त्यामुळे उरुग्वे हरल्यामुळे मला थोडा आनंदच झाला नियमाप्रमाणे त्यात चुकिचं काही नाही, पण खिलाडूपणाही नाही म्हणता येणार. हे माझं वैयक्तिक मत आहे]. असो. नेदरलँड - उरुग्वे सामना मस्तच झाला. सर्वच गोल अफलातून होते.
विशेष

हळूहळू हा व्यापच झाले संपादन...

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 07/07/2010 02:54 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा हळूहळू त्या व्यापत गेल्या सगळे मन... हळूहळू हा व्यापच झाले संपादन अवांतर प्रतिसाद जणू, व्हायरस ट्रोजन. येतो कंपू 'तो' जसा जसा हा जाली वेगाने प्रतिसादांचे होते वर्धन. जीव घेतला त्यांनी सगळ्या धाग्यांचा करती केवळ नियमांचे ते उलंघन! हेडफोन लावुन कानी, मी शांतपणे- अवांतराचे रोज अता करतो कर्तन. उगाच नाही ओठ निळे झाले नार्‍या चौपाटी पाध्यांचे का घ्यावे चुंबन? अजून नाही प्रसिद्ध का झाले धोरण .. अजून चालु ड्रूपल सहाचे संशोधन... कधी अरे तू सुधाणार "केश्या" मेल्या कधी बंद करणार सांग कविता मुंडन - केशवसुमार